विरोधक गलितगात्र, २०२४ पर्यंत चिंता नाही: रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 18:18 IST2019-08-03T18:11:26+5:302019-08-03T18:18:44+5:30
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सह सगळे विरोधक जरी एकत्र आले तरी फार काही फरक पडणार नाही..

विरोधक गलितगात्र, २०२४ पर्यंत चिंता नाही: रामदास आठवले
पुणे : घड्याळ काही चालत नाही व हात काही हलत नाही. त्यामुळे विरोधक हे गलितगात्र झाले असल्याचे चित्र आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी जरी ते एकत्र आले तरी फार काही होणार नाही. मोदी जातीधर्माच्या पलीकडे राजकारण करत असल्याने २०१४ पर्यंत तरी भाजपा प्रणित महायुतीला कुठल्याही प्रकारची चिंता नाही, असे मत केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आठवले म्हणाले, राज ठाकरेंना सध्या काही ऊद्योग नाही, कसले काम राहिलेले नाही. त्यामुळे इव्हीएमच्या ते मागे लागलेत. ममता बॅनर्जींचे भेट घेण्याऐवजी पक्ष वाढवण्याचे काम करावे तसेच विधानसभेला 1 कॅबिनेट , 1 राज्यमंत्री व 4, 5 महामंडळे मिळावीत. 22 जागांचे पत्र दिले आहे, 10 तरी मिळाल्याच पाहिजेत.