शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक म्हणाले, कामांचा हिशेब द्या!

By admin | Updated: July 17, 2014 01:11 IST

महापालिकेतील सत्ताधारी जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवितात. आश्वासने देतात. मात्र, प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्ती होत नाही. गेल्या पाच वर्षात घोषणा केलेले प्रकल्प अजूनही साकारलेले नाही.

मनपा सभागृहात झळकला लोकमत : सत्ताधाऱ्यांनी सभा गुंडाळली
नागपूर : महापालिकेतील सत्ताधारी जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवितात. आश्वासने देतात. मात्र, प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्ती होत नाही. गेल्या पाच वर्षात घोषणा केलेले प्रकल्प अजूनही साकारलेले नाही. ‘लोकमत’ वृत्तपत्राने याचा लेखाजोखाच सादर केला, असे सांगत विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी महापालिका सभागृहात ‘लोकमत’ झळकविला. लोकमतमध्ये प्रकाशित विषयांवर चर्चा घेण्याची मागणी करीत ठाकरे यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीचे नगरसेवक हातात लोकमत घेऊन महापौरांच्या आसनासमोर आले. भाजप विरोधात नारेबाजी सुरू झाली. या गोंधळाचा फायदा घेत महापौर अनिल सोले यांनी पटापट विषय पुकारून मंजूर केले व सभा गुंडाळली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकीकडे नागपूर शहरात विकासाची गंगा आणण्यासाठी धडपड करीत आहेत. पण नागपुरात महापालिकेतील त्यांच्या शिलेदारांचे शहर विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे.
एक मिनिटात १४ विषय मंजूर
लोकमतने प्रकाशित केलेल्या विषयावर जाब विचारण्यासाठी विरोधक महापौरांच्या आसनासमोर जमले. नारेबाजी सुरू केली. या संधीचा फायदा घेत गणिताचे ‘प्राध्यापक’ राहिलेले महापौर अनिल सोले यांनी पाढे म्हटल्यासारखे पटापट विषय क्रमांक वाचले. एका मिनिटात त्यांनी तब्बल १४ विषय कुठलीही चर्चा न करता मंजूर केले. विषय पत्रिकेवरील जुने प्रश्न निरस्त केल्यामुळे प्रश्नोत्तराच्या वेळेत महापौरांना चर्चा घेता आली असती पण तसे न करता त्यांनी सभा गुंडाळून लोकशाहीचा खून केला, अशी टीका विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी केली.
महापौरांच्या आसनासमोर विरोधकांची घोषणाबाजी
सत्ताधाऱ्यांनी न पेलणारी आश्वासने दिली. स्वप्ने दाखविली. प्रत्यक्षात एकही स्वप्न पूर्णपणे वास्तवात साकारले नाही. सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने व त्यावर झालेली कृती याचा परिपाक ‘लोकमत’ने ‘नो उल्लू बनाविंग’ या विशेष पानाद्वारे बुधवारच्या अंकात प्रकाशित केला. विरोधकांनी हाच विषय महापालिका सभागृहात उचलून धरला. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी लोकमत झळकवीत अपूर्ण राहिलेल्या घोषणांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. ठाकरे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी फक्त घोषणांवर भर दिला. जनतेची दिशाभूल केली. प्रत्यक्षात एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यात त्यांना अपयश आले आहे. लोकमतने प्रकाशित केलेले वृत्त चुकीचे आहे का, याचा खुलासा करून या सर्व विषयांवर चर्चा झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावर सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी वृत्तपत्राच्या बातम्यांवर सभागृहात विश्लेषण करता येणार नाही, असे मत मांडले. ठाकरे, गुडधे यांनी दटके यांच्या युक्तिवादाला जोरदार विरोध दर्शविला. सभागृहात चर्चा होणारच नसेल तर सभेला अर्थ काय, असा सवाल गुडधे यांनी केला. लोकमत उंचावत ठाकरे महापौरांच्या आसनासमोर आले. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल गुडधे हे देखील लोकमत उंचावत आले. त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस- राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक चर्चेची मागणी करीत समोर आले. महापौर सोले यांनी विरोधकांना प्रश्नकाळ सुरू असल्याचे सांगत जागेवर बसण्याची सूचना केली. मात्र, त्यानंतरही विरोधक नमले नाहीत. विरोधकांनी सत्ताधारी भाजप विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. एकच गोंधळ सुरू झाला. या गोंधळाचा फायदा घेत सत्तापक्ष नेते दटके यांनी विषय पत्रिकेला सुरुवात करण्याची सूचना केली. ही संधी साधत महापौरांनी पटापट एकएक विषय पुकारून मंजूर केले व सभा संपल्याची घोषणा केली. लोकमतने मांडलेल्या विषयामुळे १५ मिनिटात सत्ताधाऱ्यांना सभा गुंडाळावी लागली. (प्रतिनिधी)