शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

एखादा घाबरट व्यक्तीच असं करू शकतो; शिवसैनिकांच्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 10:37 IST

कायदा-सुव्यवस्था खराब करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Shiv Sena Aditya Thackeray: कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या एका गाण्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कामरा याचा कॉमेडी शो जिथे झाला त्या सेटची या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. कायदा-सुव्यवस्था खराब करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

एकनाथ शिंदेंवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, "कॉमेडियन कुणाल कामरा याने जिथं गाणं सादर केलं होतं त्या कॉमेडी शोच्या सेटची मिंधेंच्या घाबरट गँगने तोडफोड केली. मुळात हे गाणं १०० टक्के सत्य होतं. फक्त एखादा घाबरट व्यक्तीच एखाद्याच्या गाण्यावर अशा पद्धतीचे कृत्य करू शकतो.  महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचं काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, "ही तोडफोड म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा एकनाथ शिंदेंनी केलेला हा आणखी एक प्रयत्न आहे," असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

कुणाल कामरा गायब?

एकनाथ शिंदेंवरील गाण्याने वादंग निर्माण झाल्यानंतर काल रात्रीपासून कुणाल कामरा याचा फोन बंद आहे. युवासेनेच्या राहुल कनाल यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून कामरा याचा शोध सुरू असल्याचे समजते.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाKunal Kamraकुणाल कामरा