शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
4
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
5
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
6
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
7
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
8
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
9
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
10
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
11
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
12
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
13
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
14
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
15
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
16
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
17
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
18
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
19
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
20
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

Onion Price: अवकाळीचा शेतीला फटका, कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 15:56 IST

Maharashtra Unseasonal Rains: राज्यात मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे फळबागातदारांसह कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातच कांदा साठवून ठेवला. मात्र, आता झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा सडला असून उत्पादकांना मोठा फटका बसला. त्यामुळे येत्या काही दिवसांत कांद्याची आवक कमी होऊन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना फटकाकोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती आणि नागपूर ६ मे पासूनच सतत पाऊस पडत आहे, हे जिल्हे कांदा उत्पादनासाठी ओळखले जातात.  याशिवाय, धुळे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिव, अकोला, जालना, बुलढाणा आणि जळगाव येथील शेतकऱ्यांनीही पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याची नोंद केली.

कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यतामार्चपूर्वी कापणी केलेल्या शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले. परंतु एप्रिल किंवा मे पर्यंत वाट पाहणाऱ्यांच्या पिकांवर आधी अति उष्णतेचा आणि नंतर पावसाचा परिणाम झाला. दरम्यान,२० मे पर्यंत लासलगाव बाजारात कांद्याची सरासरी किंमत प्रति क्विंटल १ हजार १५० रुपये इतकी होती. मात्र, अवकाळी पावसामुळे कांद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, बाजारात कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यतामहाराष्ट्र हा देशातील आघाडीचा कांदा निर्यातदार आहे. नाशिक हे देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक क्षेत्र आहे. दरम्यान, २०२४-२५ मध्ये २ लाख ९० हजार १३६ हेक्टरवर कांदा पिकाची लागवड करण्यात आल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे, कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार निर्यात शुल्क, किमान निर्यात किंमत आणि निर्यातीवर बंदी घालून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.

टॅग्स :onionकांदाMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसNashikनाशिकPuneपुणे