शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

तीन पर्यटनस्थळांना दीड कोटीचा निधी

By admin | Updated: September 27, 2015 01:04 IST

जागतिक पर्याटन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने पुणे जिल्ह्यातील वनक्षेत्रातील तीन पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी इको टुरिझम योजनेंतर्गत तब्बल

पुणे : जागतिक पर्याटन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने पुणे जिल्ह्यातील वनक्षेत्रातील तीन पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी इको टुरिझम योजनेंतर्गत तब्बल १ कोटी २१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. वन क्षेत्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्या शासनाने प्रथमच जिल्ह्यासाठी असा निधी दिला आहे.राज्यशासनाने धार्मिक स्थळांच्या विकासासह गेल्या काही वर्षांपासून पर्यटनस्थळांच्या विकासासाठी विविध योजना सुरूकेल्या आहेत. यामध्ये इको टुरिझम योजनेंतर्गत वेगवेगळ्या वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे भोलावडे येथे बालोद्यान, बोपगाव येथील कानिफनाथ देवस्थान व सासवड येथील मौजे वाघ डोंगर यांच्या विकासासाठी एकूण १ काटी २१ लाख ८७ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून निसर्ग पिरक्रमा पथ, हिरवळ, चेनलिंक कुंपण, कचरा कुंडी, बालोद्यानासाठी खेळणी, प्राण्यांचे मॉडेल, सिंचन व्यवस्था, बाकडी खरेदी, सौर दिवे खरेदी, पाणवठे तयार करणे, झाडांना ओटे बांधणे, फायबर शौचालय युनिट खरेदी करणे आदी विविध कामे करणार आहेत. विकासकामे करताना बांधण्यात येणारी पॅगोडा, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, पर्यटकांना बसण्यासाठी बाक, लोखंडी साहित्य एवढी निसर्गपूरक असलेल्या साहित्यातून बांबूचा जास्तीतजास्त वापर करावा, याकडे लक्ष देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)