शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

‘दाभोळ’मध्ये मृतांची संख्या पाच

By admin | Updated: June 24, 2015 00:56 IST

चारही मृतदेह सापडले : मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत; घर बांधणीसाठी एक लाख

दापोली : तालुक्यातील दाभोळ टेमकरवाडीतील खचलेल्या डोंगराखाली गाडले गेलेले उर्वरित चारही मृतदेह मंगळवारी शोध पथकाच्या हाती लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थ, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, प्रशासकीय यंत्रणेच्या तब्बल ४0 तासांच्या अखंड शोध मोहिमेनंतर हे मृतदेह हाती लागले. या दुर्घटनेमुळे दाभोळ गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासन धोरणानुसार प्रत्येकी चार लाख रुपये मदत, तसेच घर बांधणीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास दाभोळ टेमकरवाडीत दरड कोसळून त्याखाली तीन घरे गाडली गेली. त्यातील एका घरामध्ये कोणीही राहत नव्हते. उर्वरित दोन घरांमधील पाचजण घरांसह मातीमध्ये गाडले गेले. त्यात कमलाकर सहदेव महाडिक, कमलाक्षी कमलाकर महाडिक, दिनकर सहदेव महाडिक, मधुकर गोपीनाथ महाडिक, मधुमालती मधुकर महाडिक यांचा समावेश होता. सोमवारी पहाटे पाच वाजल्यांपासूनच माती बाजूला करून शोधकार्य सुरू झाले होते. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास दिनकर महाडिक यांचा मृतदेह सापडला. मात्र, त्यानंतर बराच वेळ खूप मोठ्या प्रमाणात माती उपसूनही काहीच हाती लागत नव्हते.सोमवारी रात्रीही अजिबात न थांबता शोधमोहीम सुरू होती. सोमवारची पहाट थरकाप उडवणारी असल्यामुळे सोमवारी रात्री सगळी टेमकरवाडी जागीच होती. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कमलाकर महाडिक (वय ६२) आणि त्यांची पत्नी कमलाक्षी (५५) यांचे मृतदेह सापडले. आणखी दोघेजण मातीखाली अडकले असल्याने शोधमोहीम अखंड सुरू होती. सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मधुकर महाडिक यांचा आणि त्यानंतर दीड ते दोन तासांतच त्यांची पत्नी मधुमालती मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला. मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदतरत्नागिरी : दाभोळ टेमकरवाडीतील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना शासन धोरणानुसार प्रत्येकी चार लाख रुपये मदत, तसेच घर बांधणीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. २२ जून २०१५ रोजी पहाटे झालेल्या या दुर्घटनेत सहाजण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचा अंदाज होता. आतापर्यंत त्यातील पाच मृतदेह सापडले आहेत. या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येक मृत व्यक्तीमागे चार लाखांची शासकीय मदत दिली जाणार आहे. तसेच संपूर्ण घराचे नुकसान झालेल्यांना एक लाख एक हजार ९०० रुपयांची मदत दिली जाणार आहे. दाभोळ येथील घटनास्थळी अजूनही दरड उपसण्याचे काम सुरू आहे. त्याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे ३६ जवान, ३० पोलीस कर्मचारी तसेच दापोली नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते व नागरिक मदत कार्यात सहभागी झाले आहेत. शोध व बचाव कार्यासाठी घटनास्थळी चार पोकलेन, पाच जेसीबी, सहा ट्रॅक्टर व दोन रुग्णवाहिका कार्यरत आहेत. घटनास्थळी दापोलीचे प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मंडल अधिकारी, मंडळातील सर्व तलाठी उपस्थित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)