शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

आता आॅनलाइन अर्जाचे धडे

By admin | Updated: October 9, 2015 01:08 IST

केडीएमसी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या तीन दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही. पितृपक्ष असल्याने आणि आॅनलाइन

डोंबिवली : केडीएमसी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. पहिल्या तीन दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही. पितृपक्ष असल्याने आणि आॅनलाइन अर्ज भरावा लागणार असल्याने अनेक उमेदवारांनी अद्याप अर्ज भरलेला नाही. ही बाब महापालिकेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आता ९ व १० आॅक्टोबर रोजी आॅनलाइन अर्ज भरण्यासंदर्भातले प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महापालिकेच्या या घोषणेमुळे ‘वरातीमागून घोडे’ अशी टीका यंत्रणेवर होत आहे.डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात तर कल्याणमध्ये अत्रे रंगमंदिरात हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे जनसंपर्क विभागाने जाहीर केले. संध्याकाळी ५च्या सुमारास त्याला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. ही सुविधा महापालिकेच्या संबंधित विभागाने आधीच दिली असती तर अधिक सोईचे झाले असते, अशी चर्चा इच्छुकांमध्ये सुरू होती. आॅनलाइन अर्ज भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याने काही चुकले तर अर्ज रद्द होईल, अशी भीती उमेदवारांमध्ये असल्याने अर्ज भरण्यासाठी कोणी तज्ज्ञ आहे का? याच्या शोधातही अनेक जण आहेत. तशी तज्ज्ञ व्यक्ती असल्यास अर्ज भरण्याचा मोबदलाही मिळेल, असेही सांगण्यात येत आहे.सहारियांनी घेतली रवींद्रन यांची भेटराज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे.एस. सहारिया यांनी गुरुवारी कल्याणमध्ये केडीएमसी निवडणूकप्रमुख ई. रवींद्रन यांची भेट घेतली आणि तयारीचा आढावा घेतला. रवींद्रन यांनी त्यांना नियोजनासंदर्भात माहिती दिली. तसेच व्होटर स्लीप ही बीएलओंमार्फत दिली जाणार असल्याचे सांगितले. जास्तीतजास्त मतदानासाठी मतदार जागृती करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. सहारिया यांनी आचारसंहिता भंग होतो की नाही, याची पाहणी केली. कोणती विशेष काळजी घेतली आहे, याचा आढावा घेतला. कल्याणमध्ये बिर्ला कॉलेज, मुरबाड रोड, बैलबाजार, स्टेशन परिसर आदी ठिकाणी; तर डोंबिवलीत टंडन रोड, कल्याण रोड, पश्चिमेचा काही भाग, रेतीबंदर रोड, गोपी सिनेमा, सुभाष रोड, डोंबिवली विभागीय कार्यालयाला भेट दिली. मतदान केंद्रांची पाहणीअतिसंवेदनशील-संवेदनशील क्षेत्रच २००५, २०१०च्या निवडणुकांत घोषित नसल्याने त्याबाबतची या वेळी काय स्थिती आहे, याची विचारणा केली; तसेच या वेळेस मतदान अधिक होण्याची शक्यता असल्याने काही मतदान केंद्रांचीही त्यांनी पाहणी केली. निलंबित सचिन पोटे यांची आता पत्रकबाजीकेडीएमसी निवडणुकीच्या धामधुमीत सत्तेचे वर्चस्व दाखवण्यासाठी भाजपाने जे षड्यंत्र सुरू केले आहे, ते योग्य नाही. त्यातच, ते राजकीय दबावतंत्र वापरून साम, दाम, दंड, भेद या अनुषंगाने राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नाही. माझा न्यायालयीन लढा मी देईनच, पण ही तर माझी राजकीय हत्या असल्याची टीका निलंबित नगरसेवक सचिन पोटे यांनी केली. मुख्यमंत्र्यांविरोधात मी आचारसंहितेचा भंगाची तक्रार केली. त्याचा सूड म्हणून तातडीने कारवाई करण्यात आल्याचेही मत त्यांनी मांडले. पत्रक काढत ‘मी निवडून येण्याचा धसका त्यांनी घेतला. जनप्रक्षोभानंतर कारवाई करण्यास सांगतात, हे किती योग्य आहे, असे पत्रक काढून त्यांनी निषेध केला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.