शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

महाविद्यालयांमध्येच मिळणार लर्निंग लायसन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 4:55 PM

लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे चित्र दररोज पहायला मिळते. यापार्श्वभुमीवर आता आरटीओचे अधिकारीच महाविद्यालयामध्ये येऊन विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स देणार आहेत.

  पुणे : लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे चित्र दररोज पहायला मिळते. या पार्श्वभुमीवर आता आरटीओचे अधिकारीच महाविद्यालयामध्ये येऊन विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स देणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयांनी स्थानिक आरटीओ अधिकाºयांशी संपर्क साधून त्याबाबतची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवावा असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.

       विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित वाहन चालविण्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, त्याचबरोबर आरटीओमध्ये फेºया मारण्याऐवजी त्यांना महाविद्यालयातच लर्निंग लायसन्स मिळावे यासाठी परिवहन विभागाच्यावतीने पुढाकार घेऊन योजना तयार करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या या योजनेला प्रतिसाद देऊन महाविद्यालयांनी हा उपक्रम राबवावा असे परिपत्रक विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी काढले आहे. 

        परिवहन विभागामार्फत महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन लर्निंग लायसन्स उपलब्ध करून देण्यासाठी एक धोरण निश्चित करण्यात येत आहे. महाविद्यालयांमध्ये लर्निंग लायसन्स उपलब्ध करून देताना परिवहन विभागाच्यावतीने काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. शिक्षणसंस्था मान्यताप्राप्त असावी, केवळ महाविद्यालयाच्या हजेरी पटावरील विद्यार्थ्यांनाच लर्निंग लायसन्स देण्यात यावे, महाविद्यालयांनी चाचणीची व्यवस्था महाविद्यालयने नि:शुल्क करावी, कागदपत्रांच्या पडताळणीचे काम महाविद्यालयाने करावे, महाविद्यालयात आॅनलाइन चाचणी घेण्यासाठी कॉम्प्युटर लॅब उपलब्ध असावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी परिवहन विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये दुचाकी वाहनांचा वापर मोठया प्रमाणावर होत आहे. पंरतु या विद्यार्थ्यांना अनेकदा वाहन सुरक्षित चालविण्याची नियम, वाहतूक चिन्हे याची माहिती नसते. त्याचबरोबर त्यांच्याकडे नियमानुसार वाहनचालक लायसेन्स नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा अनेकदा धोक्यात येते. त्यामुळे अनेक महाविद्यालयीन तरूण-तरूणी अपघातग्रस्त होण्याच्या घटना घडत आहेत. या रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

आरटीओवरील ताण होईल कमी

लर्निंग लायसन्स काढण्यासाठी विद्यार्थ्यांची आरटीओ कार्यालयामध्ये मोठयाप्रमाणात गर्दी होते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना आॅनलाइन अपॉइन्मेंट मिळण्यातही अडचणी येत आहेत. यापार्श्वभुमीवर त्यांच्या महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स मिळण्यास त्यांची मोठी सोय होणार आहे. विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम व त्रास यामुळे वाचेल त्याचबरोबर आरटीओवरील कामाचा ताणही कमी होऊ शकणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयRto officeआरटीओ ऑफीस