शहरं
Join us  
Trending Stories
1
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
2
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
3
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
4
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
5
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
6
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
7
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
8
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
11
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
12
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
13
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
14
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
15
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
16
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
17
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
18
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
19
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
20
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

नाही कसे... समाजाचे, देशाचे नेतृत्व करणाऱ्यांना प्रश्न विचारलेच पाहिजेत! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:20 IST

सध्याच्या सामाजिक - राजकीय - सांस्कृतिक वर्तमानात साहित्य संमेलनाची भूमिका काय? वैचारिक दिशा देऊ शकतात का ही संमेलनं, की ती फक्त इव्हेंटपुरती मर्यादित राहतात?

दुर्गेश सोनार -

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना कोणती जबाबदारी सर्वाधिक जाणवते?
पाटील : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एक प्रकारचं वेगळं महत्त्व आहे. ही वर्षातून एकदा भरणारी शब्दांची पंढरी आहे.  सेवाभावानं मराठीची सेवा करायला मिळतेय, याचा मला आनंद आहे.

सध्याच्या सामाजिक - राजकीय - सांस्कृतिक वर्तमानात साहित्य संमेलनाची भूमिका काय? वैचारिक दिशा देऊ शकतात का ही संमेलनं, की ती फक्त इव्हेंटपुरती मर्यादित राहतात?
पाटील : इव्हेंटची घुसखोरी मलाही फारशी आवडत नाही. साहित्य संमेलनात  रात्री इतके मनोरंजनाचे कार्यक्रम असतात, की दिवसा लोक संमेलनाकडे फिरकतच नाहीत. याला काही अर्थ नाही. दुधामध्ये साखर घाला, साखरेमध्ये दूध ओतू नका; इतके मी नक्की सांगेन.  मराठी साहित्य संमेलनाचे काम आणि उद्दिष्ट विचाराला दिशा देणे हे आहे. तो उद्देश सफल झाला पाहिजे.  

ऐतिहासिक कादंबरी हा तुमचा प्रांत. या लेखनात सत्य, वस्तुनिष्ठता आणि साहित्यिक स्वातंत्र्य यांचा तोल कसा साधावा?
पाटील : ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय… असा काही फरक नसतो. प्रत्येक गोष्ट ही माणसाची गोष्ट असते. मग ती त्याच्या लढाईची असेल, संघर्षाची असेल, दुःख, खेद, हर्ष यांची असेल… ही त्या त्या व्यक्तिरेखेशी तादात्म्य पावून किंवा त्या प्रसंगांशी एकरूप होऊन मांडता येते. ग्रंथालयांच्या वर्गवारीसाठी ऐतिहासिक, सामाजिक असे भाग असावेत. पण, मला ऐतिहासिक आणि ग्रामीण किंवा सामाजिक… हा फरकच वाटत नाही. 

ज्यावेळेला मी ‘झाडाझडती’ लिहितो, त्या वेळेला धरणांचा अभ्यास, धरणग्रस्तांच्या लढ्यांचा अभ्यास महत्त्वाचा! ‘लस्ट फॉर मुंबई…’ या कादंबरीसाठी मुंबईच्या  कामगार चळवळी, त्याच्या नंतर हिंसाजनक आंदोलने, टोळीयुध्दे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला.  कुठलंही काम जबाबदारीनं करताना आणि ते उठून दिसावं, लोकांना जिवंत वाटावं किंवा ते वाङ्मयीनदृष्ट्याही आपल्या फॉर्मच्या ताकदीनं उभं राहावं, असं वाटत असेल तर अभ्यासाला पर्याय नसतो, संशोधनाला पर्याय नसतो… मग ते ग्रामीण लेखक असोत नाही तर ऐतिहासिक असोत!

आजचं मराठी साहित्य तुम्हाला अधिक प्रयोगशील वाटतं की वैचारिक गोंधळलेलं?
पाटील : असं काही म्हणता येणार नाही. प्रत्येक जण आपापल्या प्रकृतीप्रमाणे लिहित राहतो. काही प्रयोगशील असतात, काही चाकोरीतून जाणारे असतात. पण एक नक्की. जीवनामध्ये उलथापालथी होतात, मोठी अरिष्टं येतात किंवा समाजामध्ये घालमेल चालू असते, असा काळ नाटक आणि कादंबरीला खूप पोषक असतो. तसं महाराष्ट्राचं वातावरण आहे सध्या. पण, त्या मानाने इथले कादंबरीकार आणि नाटककार तेवढ्या धाडसानं पुढे येताना दिसत नाहीत.

सोशल मीडियाच्या प्रभावामुळे लेखक आणि वाचक या नात्यामध्ये काही बदल झाला आहे असं वाटतं का?
पाटील : सोशल मीडिया साहित्याच्या तोंडओळखीपुरता पुरेसा असतो. सोशल मीडियावर तुम्ही कळवू शकता की, नवीन सिनेमा आला, नवीन पुस्तक आलं… पण, सखोल संशोधन, सखोल दृष्टी किंवा परिपूर्ण अभ्यास ही मानवी मनाची भूक सोशल मीडिया अजिबात भागवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ग्रंथांच्याच गावाला जायला हवं... शिवाय सोशल मीडियावर बुद्धिभेदाचा धोका मोठा. जी सखोलता पाहिजे ती नाही सोशल मीडियामध्ये. 

लेखकाने राजकीय भूमिका घ्यावी का, की अलिप्त असावं?
पाटील :  राजकीय भूमिका घ्यायची किंवा नाही, हे ज्याच्या-त्याच्या प्रकृतीधर्मावर अवलंबून असतं… पण, लेखकाने भूमिका घ्यावी एवढं नक्की.  मग ती राजकारण्यांसाठीच पाहिजे, चळवळीसाठीच पाहिजे असं नाही. पण, आपली एखादी भूमिका असावी!

व्यवस्थेला जेव्हा प्रश्न विचारतात साहित्यिक तेव्हा त्यांच्यावर एखाद्या विशिष्ट विचारधारेचा ठपका ठेवला जातो, कधी या बाजूचे, कधी त्या बाजूचे… मग प्रश्न विचारूच नयेत का?
पाटील : प्रश्न विचारलेच पाहिजेत नां… समजा, आपण मोटारीने निघालो तर आपण ड्रायव्हरला विचारतोच ना; की बाबा, कुठे घेऊन चालला आहेस? जे समाजाचं आणि देशाचं नेतृत्व करतात, त्यांना अधनंमधनं प्रश्न विचारलेच पाहिजेत! रोखलं पाहिजे असं नव्हे. पण, प्रश्न विचारण्याचा चौकसपणा तर दाखवलाच पाहिजे नां?

English
हिंदी सारांश
Web Title : Question Leaders: Literary Meet President Believes Inquiry is Essential for Society.

Web Summary : Questioning leaders is vital for society, emphasizes Vishwas Patil, President of the Marathi Literary Meet. He advocates for thoughtful inquiry, urging writers to fearlessly address social issues through their work, balancing artistic freedom with factual accuracy. Patil also noted the superficiality of social media.
टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील