शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी रिंग रोड नको; बीआरटीएस पाहिजे!

By admin | Updated: December 17, 2014 03:18 IST

मुंबईच्या वाहतूक प्रणालीला विकसित करण्यासाठी केंद्राने भुयारी रिंग रोड उभारण्याबाबत पावले उचलली असतानाच वाहतूक तज्ज्ञांनी मात्र यावर टीका केली आहे.

मुंबई : मुंबईच्या वाहतूक प्रणालीला विकसित करण्यासाठी केंद्राने भुयारी रिंग रोड उभारण्याबाबत पावले उचलली असतानाच वाहतूक तज्ज्ञांनी मात्र यावर टीका केली आहे. मुंबईची वाहतूक प्रणाली विकसित करायची असेल आणि सर्वसामान्यांसाठी त्याचा फायदा होणे गरजेचे असेल, तर मुंबईत बस रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम (बीआरटीएस) उभारण्यात यावी, असा सूर त्यांनी लावला आहे.वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ब्रिज इंजिनीअर्सच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत भुयारी रिंग रोडचे जाळे उभारण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. वाहतूक तज्ज्ञ सुधीर बदामी यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईच्या लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता केवळ तीन टक्के लोकांनाच अशा प्रकल्पांचा फायदा होईल. मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरासाठी भुयारी रिंग रोडसारखे प्रकल्प फायदेशीर ठरत नाहीत, तर ७५ लाख लोकांना वाहून नेणारे रेल्वेसारखे प्रकल्प फायदेशीर ठरतात. शहरी वाहतुकीला पर्याय आहेत. हे पर्याय म्हणजे बीआरटीएस, सार्वजनिक वाहतूक प्रणाली होय. असे प्रकल्प उभारण्यावर सरकारने भर दिला पाहिजे. शिवाय मोटारगाड्यांचा वापर कमी करून लोकांनी सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर दिला तर साहजिकच भुयारी रिंग रोडसारखे प्रकल्प उभारण्याची गरज भासणार नाही आणि पर्यावरणाची हानीदेखील होणार नाही.दरम्यान, सार्वजनिक वाहतूक प्रणालीसाठी केवळ वाहतूक तज्ज्ञांनी आवाज उठवून चालणार नाही, तर येथील प्रवाशांनी आवाज उठवायला पाहिजे, असेही बदामी यांनी आवर्जून नमूद केले. (प्रतिनिधी)