शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

नदीत निर्माल्य टाकण्यास बंदी!

By admin | Updated: July 4, 2014 06:08 IST

महाराष्ट्रातील नद्यांमध्ये गाडी धुणे, घाण व निर्माल्य टाकणे यावर उच्च न्यायालयाने निर्बंध आणले आहेत़

मुंबई : महाराष्ट्रातील नद्यांमध्ये गाडी धुणे, घाण व निर्माल्य टाकणे यावर उच्च न्यायालयाने निर्बंध आणले आहेत़ तसेच असे करणाऱ्यांवर थेट गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने सर्व नगरपालिका व नगर परिषदांना दिले आहेत़
निर्माल्य टाकण्यासाठी नदीकाठावर निर्माल्य कलश ठेवा़ उत्सवाच्या दिवशी या कलशांची संख्या वाढवा़ नदीत वरील प्रकार होऊ नयेत यासाठी संबंधित विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एक पथक नेमावे़ हे पथक सतत नदीजवळ गस्त घालेल. यात कोणी नदीत घाण करताना आढळल्यास त्याच्यावर या पथकाने बॉम्बे पोलीस अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई करावी़ तसेच याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करायची असल्यास शासनाने ती करावीत, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे़
या प्रकरणी मानवी विष्ठा वाहतूकविरोधी संघटनेचे अध्यक्ष संदीप जेठे यांनी अ‍ॅड़ असिम सरोदे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे़ मानवी विष्ठा वाहतूक प्रतिबंधक कायदा १९९३मध्ये मंजूर झाला़ त्याअंतर्गत हे काम करणाऱ्यांसाठी घरकुलासह विविध योजना राबवणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते व हे काम मानवाकडून न करता अत्याधुनिक तंत्राद्वारे केले जाणार होते़
मात्र पंढरपूर मंदिरात येणारे भाविक चंद्रभागा नदीपात्रातच प्रात:कालीन विधी करतात व त्यांची विष्ठा मानवाकडूनच उचलली जाते़ हे बंद करावे व राज्यात वरील कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयानेच शासनाला द्यावेत,
अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ याची दखल घेत न्यायालयाने हे आदेश दिले़ तसेच पंढरपूर येथे हे काम करणाऱ्यांचे पुनर्वसन कसे करणार याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने तेथील स्थानिक प्रशासनाला दिले आहेत़