शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षी म्हाडाच्या ६,२०० घरांची लॉटरी

By admin | Updated: June 1, 2015 05:10 IST

म्हाडाच्या कोकण मंडळासह मुंबई मंडळाच्या सुमारे ६,२०० घरांची लॉटरी पुढच्या वर्षीच्या जानेवारी/फेब्रुवारी आणि मे महिन्यांत काढण्यात येणार आहे. परिणामी, आजच्या रविवारी ज्यांची संधी हुकली आहे

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळासह मुंबई मंडळाच्या सुमारे ६,२०० घरांची लॉटरी पुढच्या वर्षीच्या जानेवारी/फेब्रुवारी आणि मे महिन्यांत काढण्यात येणार आहे. परिणामी, आजच्या रविवारी ज्यांची संधी हुकली आहे; अशांना म्हाडा प्राधिकरणाने पुन्हा एकदा दिलासा दिला असून, नव्या लॉटरीमध्ये भाग्यवंतांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात रविवारी म्हाडाच्या कोकण आणि मुंबई मंडळाच्या १,0६३ घरांची लॉटरी काढण्यात आल्यानंतर म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. झेंडे यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. ते म्हणाले, पुढच्या वर्षी म्हाडाच्या कोकण मंडळ आणि मुंबई मंडळाच्या घरांची स्वतंत्र अशी लॉटरी काढण्यात येणार आहे. कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी विरार येथे ४,७०० घरे असणार आहेत. ही घरे अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. तर मुंबई मंडळाच्या १,५०० घरांचा समावेश लॉटरीमध्ये आहे. मुंबईमधील लॉटरीसाठीची घरे पवई, बोरीवली, गोरेगाव व मुलुंड येथे असणार असून, ती अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे म्हाडाच्या लॉटरीसाठीच्या घरांची किंमत सर्वसाधारण किमतीपेक्षा ६० टक्क्यांनी कमी असून, पुढील लॉटरीच्या घरांच्या किमतीमध्ये ४ ते ५ टक्क्यांचा फरक पडण्याची शक्यता आहे. लॉटरीच्या घरांसाठी ठाणे जिल्ह्यातील भूखंडाचाही शोध सुरू असल्याचे झेंडे यांनी या वेळी नमूद केले. (प्रतिनिधी)