शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षक, वनपालांच्या वेतनश्रेणीच्या मागणीला बगल

By admin | Updated: September 4, 2014 00:51 IST

मागील ११ दिवसांपासून वेतनश्रेणीच्या मुद्यावरुन राज्यभरातील वनपाल, वनरक्षकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात सचिवांची बैठक पार पडली. यात वेतनश्रेणीच्या

मंत्रालयात बैठक : बेमुदत संप सुरुचगणेश वासनिक - अमरावतीमागील ११ दिवसांपासून वेतनश्रेणीच्या मुद्यावरुन राज्यभरातील वनपाल, वनरक्षकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात सचिवांची बैठक पार पडली. यात वेतनश्रेणीच्या मागणीला बगल देण्यात आली. मात्र वनरक्षक, वनपालांच्या पदनामात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संपकरी वनरक्षक, वनपालांमध्ये प्रचंड रोष पहावयास मिळत आहे.मुंबई येथे मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत प्रधान वनसचिव प्रवीण परदेशी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) मुंडे, वनपाल संघटनेचे अध्यक्ष विजय मेहेर, वनपाल, वनरक्षक संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील, सुधीर हाते आदी उपस्थित होते. या बैठकीत वनपाल, वनरक्षकांच्या वेतनश्रेणीचा मुद्दा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरकसपणे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र शासन वेतनश्रेणीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याची बाब या बैठकीत स्पष्ट झाली. वेतनश्रेणी व्यतिरीक्त अन्य प्रश्नांवर त्वरेने तोडगा काढण्याची तयारी प्रधान वनसचिव प्रवीण परदेशी यांनी दर्शविली. वनपाल, वनरक्षकांच्या वेतनश्रेणींचा मुद्दा न्यायिक असला तरी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याचे संकेत बघता हा प्रश्न लवकर सोडविणे शक्य नाही. परंतु वनरक्षक, वनपालांच्या सुधारित वेतनश्रेणीचा प्रस्ताव शासनाच्या सामान्य प्रशासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. ११ दिवसांपासून राज्यातील २५ हजार वनपाल, वनरक्षक बेमुदत संपावर आहेत. या संपावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेतला असल्याची माहिती आहे. त्यामुळे शासन आणि संपकऱ्यांमध्ये संघर्षाची ठिगणी पडण्याची शक्यता आहे. सचिवांनी हा बेमुदत संप मागे घेण्यासाठी वनपाल, वनरक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. मात्र वेतनश्रेणीचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय ते शक्य नाही, या भूमिकेवर पदाधिकारी कायम असल्याने चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याचे दिसून येते.