शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आवाज तपासणीसाठी नवीन ‘तासी’ प्रयोगशाळा

By admin | Updated: August 1, 2015 02:12 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रेकॉर्ड केलेला आवाज लाचखोराचाच आहे की नाही, याची शहानिशा आता राज्यातील सर्व विभागीय मुख्यालयी होऊ शकेल. प्रादेशिक न्याय साहाय्यक वैज्ञानिक

- राजेश निस्ताने,  यवतमाळलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रेकॉर्ड केलेला आवाज लाचखोराचाच आहे की नाही, याची शहानिशा आता राज्यातील सर्व विभागीय मुख्यालयी होऊ शकेल. प्रादेशिक न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत ही ‘तासी’ (टेप आॅथेंटिकेशन अ‍ॅण्ड स्पीकर आयडेन्टीफिकेशन) सिस्टीम उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईवर पडणारा याचा ताण कमी होणार आहे. १ आॅगस्टपासून विभागीय मुख्यालयी आवाज तपासणीची प्रकरणे पाठवावी, अशा सूचना राज्य शासनाच्या न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे प्रभारी संचालक तथा शासकीय रासायनिक विश्लेषक बा.ब. दौंडकर यांनी केल्या आहेत. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना यासंबंधीचे आदेश २० जुलै रोजी देण्यात आले आहेत. एसीबीकडे लाच मागितल्याची तक्रार आल्यानंतर पंचांसमक्ष त्याची खात्री केली जाते. अनेकदा आवश्यकतेनुसार लाचेच्या मागणीचे गुप्तपणे रेकॉर्डिंग केले जाते. त्यानंतर त्याला रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल करून तपास केला जातो. त्यादरम्यान रेकॉर्डिंग केलेला आवाज लाचखोराचाच आहे की नाही, याची तपासणी केली जाते. रेकॉर्डिंग अहवालाला लागणाऱ्या विलंबामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यास, खटल्याचा निकाल लागण्यास विलंब होत होता. ही अडचण लक्षात घेऊन राज्यातील सर्वच विभागीय मुख्यालयी उपलब्ध असलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. - सायबर गुन्ह्यांचा तपास करतानासुद्धा अशाच अडचणी होत्या. केवळ मुंबईत तपासणीची सोय होती. परंतु आता विदर्भासाठी नागपुरात आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुण्यात स्वतंत्र संगणक-सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा, खान्देश व उत्तर महाराष्ट्राला मुंबईशी जोडण्यात आले आहे.पश्चिम विदर्भातील यवतमाळसह पाच जिल्ह्यांसाठी अमरावतीमध्ये ‘तासी’ सुविधा उपलब्ध झाली आहे. या लॅबमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे खटले वेगाने निकाली निघण्यास मदत होणार आहे.- विजय ठाकरे, प्रादेशिक न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, अमरावती