रक्त हवे, २८०० रुपये मोजा!

By Admin | Updated: June 15, 2014 00:47 IST2014-06-15T00:47:07+5:302014-06-15T00:47:07+5:30

रुग्णाला जीवदान देण्यासाठी रक्त मिळविण्याची धडपड करणाऱ्या नातेवाइकांचा खिसा आता रिकामा होणार आहे. रुग्णांना १६०० रुपयांना मिळणारी रक्ताची पिशवी तब्बल २८०० रुपयांत मिळण्याची शक्यता आहे.

Need blood, count 2800! | रक्त हवे, २८०० रुपये मोजा!

रक्त हवे, २८०० रुपये मोजा!

७५ टक्के वाढ : एफएनबीबी वाढविणार किंमत
नागपूर : रुग्णाला जीवदान देण्यासाठी रक्त मिळविण्याची धडपड करणाऱ्या नातेवाइकांचा खिसा आता रिकामा होणार आहे. रुग्णांना १६०० रुपयांना मिळणारी रक्ताची पिशवी तब्बल २८०० रुपयांत मिळण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव तयार झाला असून तो लवकरच लागू होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. प्रोसेसिंग चार्ज आकारण्यासाठी रक्तपेढ्यांना दिलेली सवलत पेशंटच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय रक्त संक्र मण परिषदेने २००५ मध्ये सरकारी आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्तासाठी ८५० रु पये सेवाशुल्क आकारण्यास परवानगी दिली. पण वाढती महागाई, वीजदर, रक्तासाठीच्या पिशव्या, कर्मचारी व डॉक्टरांचे वाढलेले पगार आणि रक्तदान शिबिरांपासून रक्त चाचण्यापर्यंतचा खर्च परवडण्याजोगा नसल्याची कारणे दिल्याने या रक्तपेढ्यांनी रक्त सेवाशुल्काकरिता प्रस्तावित दर १९०५ ते १०५० इतके ठरवले होते. यामुळे मागील वर्षापर्यंत एका रक्ताच्या पिशवीचा दर १४०० रुपये होता. आता हाच दर १६०० रुपयांवर गेला आहे. फेडरेशन आॅफ नागपूर ब्लड बँकेने (एफएनबीबी) आता यात पुन्हा वाढ करण्याचे ठरविले आहे. तब्बल १२०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय रक्त संक्र मण परिषदेने (एनबीटीसी) फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत रक्ताच्या पिशवीच्या किमतीत वाढ केल्याचे या फेडरेशनचे म्हणणे आहे. परंतु एका पिशवीची किमत किती राहणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात विविध चॅरिटेबल ट्रस्टकडून लाईफ लाईन, जीवनज्योती, डॉ. हेडगेवार, रेनबो, आयुष, लता मंगेशकर हॉस्पिटल, अर्पण आणि साईनाथ रक्तपेढ्या चालविल्या जातात. या रक्तपेढ्यांची फेडरेशन आॅफ नागपूर ब्लड बँक (एफएनबीबी) ही संस्था आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या संस्थेने संपूर्ण रक्त (होल ब्लड) २८०० रुपये, पॅक्ड रेड सेल २२०० रुपये, प्लेटलेट कॉन्सस्ट्रेट ९००, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा ९००, क्र ायोप्रिसिप्लेट ७५० असे दर वाढविण्याच्या विचारात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Need blood, count 2800!