शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 18:42 IST

घरवापसीच्या मुद्यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला अनेक नेते इच्छुक आहेत. मात्र, सर्व बाबी विचारात घेऊनच यावर निर्णय घेतला जाईल. याबाबत बोलणी सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देशरद पवार यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले होते.उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ हे पक्षात नाराज असल्याची चर्चाही सुरू झाली होती.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादावर नितेश राणे यांनीही भाष्य केले आहे.

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले होते. एवढेच नाही, तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ हे पक्षात नाराज असल्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र आता, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर मोठा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी घरवापसीवरही भाष्य केले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चेवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पडदा टाकला आहे. अजित पवार अथवा पार्थ पवार हे दोघेही नाराज नाहीत. यामुळे ते नाराज आहेत, असे मानण्याचा प्रश्नच येत नाही. पार्थ पवार कुठलाही निर्णय घेणार नाहीत. कुणीही नाराज होण्याचा प्रश्नच नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.

घरवापसीच्या मुद्यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला अनेक नेते इच्छुक आहेत. मात्र, सर्व बाबी विचारात घेऊनच यावर निर्णय घेतला जाईल. याबाबत बोलणी सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

काय आहे नेमकं प्रकरण?बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना आजोबा शरद पवार यांनी, 'मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही. तो अजून इमॅच्युर आहे. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या ५० वर्षापासून ओळखतो, त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे,' असे म्हणत पार्थला नाव न घेता फटकारले होते.

यावर पार्थ पवार यांनी मला पवार साहेबांच्या वक्तव्यावर काहीच बोलायचे नाही. सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि शरद पवार यांच्या वक्तव्यावर विनाकारण मला कोणतेही वक्तव्य करायचे नाही, असे म्हटले होते.

लंबी रेस का घोडा है...थांबू नकोस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादावर भाष्य करत नितेश राणे यांनी, 'आज परत सांगतो..पार्थ.. लंबी रेस का घोडा है...थांबू नकोस मित्रा,' असे म्हटले आहे. तर पद्मसिंह पाटील यांचे नातू तथा भाजपा आमदार राणा जगजितसिंह यांचे पुत्र मल्हार पाटील यांनीही पार्थचे समर्थन केले आहे. 'तुम्ही जन्मत: योद्धे आहात, हे मी माझ्या बालपणापासून पाहात आलोय. मला तुमचा अभिमान आहे. आम्ही उस्मानाबादमधून आहोत... आपल्याला माहीत आहे कसे लढायचे,' अशी फेसबुक पोस्ट मल्हार पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

पंतप्रधान मोदींनी वाजपेयींचा विक्रम मोडला, ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवारJayant Patilजयंत पाटीलMaharashtraमहाराष्ट्र