CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 04:36 PM2020-08-12T16:36:16+5:302020-08-12T16:43:34+5:30

संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी कोरोना व्हायरसवरील जगातील पहिल्या लसीची (First Coronavirus Vaccine) घोषणा केली. रशियाच्या या यशाबद्दल एकिकडे दिलासा आणि आनंद असला तरी, दुसरीकडे अनेक देशांनी प्रश्न चिन्हदेखील उपस्थित केले आहे. रशियाने लसीच्या रेसमध्ये आघाडीवर राहण्यासाठी घाई केल्याचा आरोप हे देश करत आहेत.

पश्चिमेकडील देशांतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की ही लस सुरक्षीत आणि परिणामकारक आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पुतिन यांनी म्हटले आहे, की त्यांच्या स्वतःच्या मुलीवर लसीचे परीक्षण करण्यात आले आहे.

रशियातील वैद्यकीय तज्ज्ञांनीही दावा केला आहे, की व्हॅक्सीन तयार करणाऱ्यांनी कसल्याही प्रकारची घाई केलेली नाही. ही लस कशी तयार झाली, ती एवढ्या लवकर कशी तयार केली गेली आणि पश्चिमेकडील देशांच्या दाव्याक किती तथ्य आहे, हे त्यांनी सविस्तर समजून सांगितले.

'पूर्णपणे विश्वासार्ह आहे लस' - मॉस्को सिटी रुग्णालय 52चे डॉक्टर सर्जेई सारेंको यांनी म्हटले आहे, की या तज्ज्ञांनी शंका उपस्थित केल्याने, वैद्यकीय कम्यूनिटीमध्ये, जे कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत आणि ज्यांना कोरोना व्हायरसवरील लस विकसित होण्याची पूर्ण आशा आहे, असे लोक प्रश्न करत आहेत. ते म्हणाले, डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, गंभीर प्रकरणांत काही प्रमाणावरच असे केले जाऊ शकते. यासाठी लस सर्वाधिक परिणामकारक आणि विश्वासार्ह आहे. जेनेकरून मृत्यूच्या प्रमाणाला आळा घालता येईल. तसेच गामलेया रिसर्च इंस्टिट्यूटने तयार केलेल्या लसीवर विश्वास केला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

'अशी झाली इतिहासाची पुनरावृत्ती' - Sputnik V मध्ये दोन भाग आहेत. पहिला भाग adenovirus आहे. तो 'रॉकेट कॅरियर' प्रमाणे दुसरा भाग असलेल्या, 'ऑर्बिटल स्टेशन' COVID-19 जीनोमला शरिरात घेऊन जातो. यामुळेच याला Sputnik नाव देण्यात आले आहे. Sputnik हा जगातील पहिला कृत्रिम उपग्रह होता. याचा अर्थ 'प्रवासातील सोबती' असाही होतो.

सारेंको यांनी सांगितले, की शरीरात 'कॅरियर' आणि 'स्टेशन' दोन्हीविरोधात प्रतिक्रिया विकसित होते. मात्र ती काही वेळासाठीच असते आणि तीन आठवड्यानंतर दुसऱ्या इंजेक्शनची आवश्यकता असते. रशियन तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की ज्या प्रकारे Sputnik सॅटेलाईल लॉन्च केल्यानंतर जगाला आश्चर्य वाटले होते, तशीच स्थिती यावेळीही आहे.

...म्हणून लवकर तयार झाली लस - पश्चिमेकडील देशांचा सर्वात मोठा सवाल आहे, की रशियाने ही लस एवढ्या लवकर कशी विकसित केली. यासंदर्भात सारेंको यांनी सांगितले, की जी पद्धत रशियाने वापरली, व्हायरल व्हेक्टरची, ते संस्थेने आधीच तयार केले होते आणि इबोला, MERS सारख्या प्रकरणांत लसीसाठीही वापरण्यात आले होते.

त्यांचे म्हणणे आहे, की हे अद्याप कुणीही करू शकलेले नाही. गामलेया या पद्धतीवर 1980 च्या दशकापासून काम करत होते. यामुळे त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागली नाही त्यामुळे कोरोना व्हायरसविरोधातील लस लवकर तयार तयार होऊ शकली.

Sputnik V लस सुरक्षीत आणि परिणामकारकही - सारेंको यांनी दावा केला आहे, की Sputnik V लस सुरक्षीत आणि परिणामकारकही आहे. तसेच या लसीला एवढा विरोध का होत आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. त्यांनी प्रश्न केला आहे, की लसीविरोधात बोलणाऱ्या 'स्वतंत्र एक्सपर्ट्स'ना कोन स्पॉन्सर करत आहे. या मागे लसीचे इतर उत्पादक अथवा कंपन्या तर नाही? सारेंको यांनी असेही म्हटले आहे, की अशा शंका उपस्थित केल्याने जे डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत त्यांनाही दुःख होते.

'द्राक्षे अंबट आहेत' - ब्रसेल्सचे राजकीय विश्लेषक गिलबर्ट डॉक्ट्रो यांनी म्हटले आहे, की 'या प्रतिक्रिया द्राक्षे अंबट आहेत सारख्या आहेत. त्यांना वाईट वाटत आहे, लाज्जा वाटत आहे, की रशियाने स्वतःला अमेरिका आणि EU पेक्षाही अधिक चांगलं असल्याचं सिद्ध केलं आहे.'

'परीक्षण अपूर्ण' - पश्चिमेकडील देशांनी आरोप केला आहे, की लस तयार करण्याच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी रशियाने सायंस आणि सुरक्षिततेचा विचार केला नाही. याशिवाय, लसीच्या पहिल्या क्लिनिकल ट्रायलचा सायंटिफिक डेटाही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. WHOच्या यादीनुसार, अजूनही गामलेयाची लस पहिल्याच टप्प्यावर आहे आणि तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यावरील चाचणी होणे बाकी आहे. या टप्प्यावर हजारो लोकांवर लसीची चाचणी केली जाते. यावरून लस किती सुरक्षित आणि परिणामकारक आहे, हे निश्चित केले जाते.

'रशियाने संशोधन चोरले' - याशिवाय, पश्चिमेकडील देशांनी, रशियाने त्यांचे संशोधन चोरून लस तयार केल्याचाही आरोप केला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाच्या संरक्षण संस्थांनी निवेदन जारी करत, आरोप केला होता, की रशियन गुप्तचर संस्थांशी संबंधित हॅकिंग ग्रुप APT29 (Cozy Bear)ने अभियानच सुरू केले आहे. त्यांनी दावा केला आहे, की हा ग्रुप रशियाच्या गुप्तचर संस्थांचा भाग आहे. तसेच तो क्रेमलिनच्या इशाऱ्यावर काम करतो.