business will gold price increase or decrease Gold price will fall in further know experts opinion | Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

ठळक मुद्देइंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, शुक्रवारी म्हणजेच 7 ऑगस्टला 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 56254 रुपयांपर्यंत पोहोचला होता. तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही घसरण आंतरराष्ट्रीय बाजारात, विशेषतः अमेरिकेतील बाजारात झालेल्या घसरणीमुळे आहे.काहीसे असेच 1970 च्या दशकांत आलेल्या मंदीच्या वेळीही पाहायला मिळाले होते. याच प्रकारे 2008मध्ये आलेल्या जागतीक मंदीच्या काळातही दिसून आले होते.

नवी दिल्ली - गेल्या शुक्रवारपासून सोन्याचे दर सातत्याने घसरू लागले आहेत. यावेळी सोने जवळपास 4000 हजार रुपयांनी स्वस्त झाले. गेल्या आठवड्यात सोने 56 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते. आता सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 52 हजार रुपयांच्या जवळपास आहे. सोन्याच्या किमतीत झालेली ही घसरण ऐतिहासिक मानली जात आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, शुक्रवारी म्हणजेच 7 ऑगस्टला 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 56254 रुपयांपर्यंत पोहोचला होता. यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट होत आहे. असोसिएशननुसार, आज सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 52731 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता.

दुसरीकडे चांदीच्या भावात प्रति किलो 10 हजार रुपये एवढी घट झाली आहे. गेल्या शुक्रवारी चांदीचा दर किरकोळ बाजारात 76 हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता. हा दर आज म्हणजेच गुरुवारी 66 हजार रुपये किलोवर आला आहे.

तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही घसरण आंतरराष्ट्रीय बाजारात, विशेषतः अमेरिकेतील बाजारात झालेल्या घसरणीमुळे आहे. कमोडिटी मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते जगात जेव्हा जेव्हा संकट येते, तेव्हा तेव्हा गुंतवणूकदार  सोन्यावरच विश्वास ठेवतात. काहीसे असेच 1970 च्या दशकांत आलेल्या मंदीच्या वेळीही पाहायला मिळाले होते. याच प्रकारे 2008मध्ये आलेल्या जागतीक मंदीच्या काळातही दिसून आले होते.

80 च्या दशकात सोन्याचा भाव सातपटींनी वाढला होता - 
80 च्या दशकात सोन्याचा भाव सातपटीहूनही अधिक वाढला होता. मात्र, यानंतर यात मोठी घसरण झाली. 2008 च्या जागतीक मंदीनंतर 2011 मध्ये अमेरिकेतील बाजारात सोन्याचा दर 1900 डॉलरपेक्षाही पुढे गेला होता. मात्र यानंतर यात मोठी घसरण झाली.

भाव पडणार इतिहासाची पुनरावृत्ती होणार -
अशातच तज्ज्ञ मंडळींनी अंदाज वर्तवला आहे, की कोरोना संकटानंतर कमोडिटी मार्केट पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करेल. सध्या सोन्याच्या भावात होत असलेली घसरण याकडेच संकेत करत आहेत. 

...म्हणून अमेरिकेतील बाजारावर परिणाम - 
रशियाने दावा केला आहे, की त्यांनी कोरोना व्हायरसवरील लस यशस्वीपणे तयार केली आहे. तेथे लवकरच लसीकरणालाही सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे भारतासह इंग्लंड आणि अमेरिकेतही कोरोना लस विकसित करण्याचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. याच बातम्यांचा अमेरिकेतील बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. यामुळेच आता तेथील गुंतवणूकदारांनी सोन्यातील पैसा काढून पुन्हा एकदा शेअर बाजारात गुंतवायला सुरुवात केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

English summary :
Will gold price increase or decrease Gold price will fall in further know experts opinion.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: business will gold price increase or decrease Gold price will fall in further know experts opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.