कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 09:32 PM2020-08-11T21:32:02+5:302020-08-11T22:05:11+5:30

देशात सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. लोकांना कोरोना झाल्यानंतर कराव्या लागणाऱ्या उपचारांसाठी लागणाऱ्या खर्चाची भीती वाटू लागली आहे. अनेक लोक सरकारी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यामुळे अनेक सरकारी रुग्णालयांत बेड उपलब्ध होणे अवघड झाले आहे. परिणामी अनेकांना खासगी रुग्णालयांत जावे लागत आहे. मात्र खासगी रुग्णालयांतील उपचार प्रचंड महागडे आहेत.

खासगी रुग्णालयांत उचार घ्यायचे म्हटले, की लोकांची चिंता वाढते. मात्र, विमा कंपन्या आरोग्य विम्यात कोरोनावरील उपचाराचा खर्चदेखील समाविष्ट करतील, असे इर्डाने म्हटले आहे. याशिवाय कंपन्यांकडून 'कोरोना कवच पॉलिसी'देखील सुरू करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसवरील उपचारांसाठी लागण्याऱ्या खर्चाला घाबरण्याची गरज नाही. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) विमा कंपन्यांना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना कवच प्रिमियमवर पाच टक्के सुट देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच पॉलिसीच्या अटीनुसार रुग्णालयांनी विमाधारक व्यक्तीवर कॅशलेस उपचार करण्यास नकार देऊ नये, हेही निश्चित करण्यास सांगितले आहे.

अशी आहे कोरोना कवच पॉलिसी - इर्डाच्या निर्देशामुसार अनेक विमा कंपन्यांनी कोरोना कवच पॉलिसी बाजारात लॉन्च केली आहे. 50 हजारपासून 5 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर असलेल्या या पॉलिसीचे प्रीमियम 447 रुपयांपासून सुरू होते.

किती अवधी - विमा नियामक इर्डाने सर्व विमा कंपन्यांना कोविड-19 वरील उपचारांसाठी विशेष विमा पॉलिसी लॉन्च करण्याचे निर्देश दिले होते. या पॉलीसीचा कालावधी 3.5 महिने ते 9.5 महिन्यांपर्यंतचा असेल. तसेच संक्रमित व्यक्तीला घरी करण्यात आलेल्या उपचारांसाठी झालेल्या कर्जाचाही क्लेम दिला जाईल.

रुग्णालयाचा खर्चही समाविष्ट - एचडीएफसी एर्गोने एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, सरकारी केंद्रांवर तपासात संक्रमित आढलून आलेल्या व्यक्तींवरील रुग्णालयांतील खर्चदेखील या पॉलिसीत समाविष्ट असेल.

याशिवाय संक्रमणामुळे झालेल्या इतर आजारांचा आणि रुग्णवाहिकेचा खर्चही यात सामील असेल. तसेच यात 14 दिवसांपर्यंत घरीच उपचारांचीही व्यवस्था असेल.

असे असेल प्रीमियम - बजाज आलायन्सने दिलेल्या माहितीनुसार, प्रीमियम 447 रुपयांपासून 5,630 रुपये आणि जीएसटी असेल. यात रुग्णालयाच्या रोजच्या खर्चाचेही पर्यायी कव्हर असले. याचे प्रीमियम 3 रुपयांपासून 620 रुपये आणि जिएसटी, असे असेल. 35 वर्षांपर्यंत वय असलेल्या व्यक्तीला 50 हजार रुपयांपर्यंतचा विमा 447 रुपये आणि जीएसटीच्या प्रीमियमवर मिळू शकेल. सर्व प्रीमियम एकाच वेळी जमा केले जातील. तसेच देशभरात याची किंमतही सारखीच असेल.

फॅमिली प्लॅन स्वस्त - मॅक्स बूपा आरोग्य विमा पॉलिसीचे एमडी-सीईओ कृष्णन रामचंद्रन यांनी दिलेल्या माहिती नुसार, त्यांची पॉलिसी स्वस्त आहे. 31 ते 55 वर्षांच्या व्यक्तीसाठी 2.5 लाख रुपयांचे कवच केवळ 2,200 रुपयांच्या प्रीमियमवरच दिले जात आहे.

जर दोन वयस्क आणि एका मुलाचा एकत्रित विमा केला, तर याचे प्रीमियम 4,700 रुपये पडेल. म्हणजेच कुटुंबाचा एकत्रित विमा केल्यास प्रीमियम स्वस्त पडेल.

आयसीआयसीआय लोम्बार्डनेही कोरोना कवच आरोग्य विमा पॉलिसी शुक्रवारी जारी केली. ते 50 हजारपासून 5 लाख रुपयांपर्यंत कव्हर देणार आहेत.

Read in English