शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 20:12 IST

Maharashtra Local Body Election Results 2025 Live Updates: राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींत चुरशीची लढाई: शिवसेना, भाजप, काँग्रेस — कोण पुढे? पहा लेटेस्ट अपडेट

21 Dec, 25 11:35 PM

'काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका–नगरपंचायत निवडणुकांत विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला'

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका–नगरपंचायत निवडणुकांत विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान 

21 Dec, 25 08:54 PM

जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; आगीचा भडका उडाल्याने दोघे भाजले, १८ जण जखमी

पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे विजयी जल्लोषाच्या मिरवणुकीदरम्यान आगीची घटना घडली. जेजुरी गडाच्या कमानीजवळ सुरू असलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीदरम्यान अचानक मोठा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली.

21 Dec, 25 06:53 PM

जळगाव जिल्ह्यात कोणत्या पक्षांचे नगराध्यक्ष विजयी?

जामनेर - साधना महाजन, भाजप

शेंदुर्णी - गोविंद अग्रवाल, भाजप

धरणगाव - लीलाबाई चौधरी, ठाकरे गट

मुक्ताईनगर - संजना पाटील, शिवसेना शिंदे गट

नशिराबाद - योगेश पाटील, भाजप

सावदा - रेणुका राजेंद्र पाटील, भाजप

वरणगाव - सुनील काळे, अपक्ष (भाजप बंडखोर)

पारोळा - चंद्रकांत पाटील, शिवसेना शिंदे गट

एरंडोल - डॉ. नरेंद्र ठाकूर, भाजप

फैजपूर - दामिनी सराफ, भाजप

भडगाव - रेखा मालचे, शिवसेना शिंदे गट

चोपडा - नम्रता पाटील, शिवसेना शिंदे गट 

यावल - छाया पाटील, ठाकरे गट

पाचोरा - सुनीता पाटील, शिवसेना शिंदे गट 

रावेर - संगीता महाजन, भाजप

अमळनेर - डॉ. परीक्षित बाविस्कर, शिवसेना शिंदे गट

चाळीसगाव - प्रतिभा चव्हाण, भाजप

भुसावळ - गायत्री भंगाळे, शरद पवार गट


भाजप - 8
शिवसेना शिंदे गट - 6
ठाकरे गट - 2
शरद पवार गट - 1
अपक्ष - 1

21 Dec, 25 06:11 PM

हिंगणघाट, आर्वी, सिंदीचा गड राखला

भाजपाने हिंगणघाट, सिंदी रेल्वे आणि आर्वी येथे आपला गड कायम राखला आहे. या तीनही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहे. सोबतच बहुमताने नगरसेवकही निवडून आले आहे. हिंगणघाटमध्ये जिल्ह्यात भाजपाचे सर्वाधिक २७ आणि एक सर्मथक उमेदवार विजयी झाला आहे. सोबतच महायुतीमधील आरपीआय (आठवले) गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहे. तेथे महायुतीच्या पारड्यात ४० पैकी तब्बल ३० जागा पडल्या आहे.

21 Dec, 25 06:11 PM

तीन नगराध्यक्ष गेले तरी जिल्ह्यात भाजपच मोठा भाऊ; १०० जागांवर विजय

वर्धा जिल्ह्यातील सहापैकी तीन नगराध्यक्षपदांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, नगरसेवकपदांच्या १६६ पैकी तब्बल १०० जागा जिंकून भाजपने आपणच जिल्ह्यात मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसने दोन नगराध्यक्षपदांसह नगरसेवकांच्या २५ जागा जिंकून पक्ष अद्याप जिल्ह्यात बाळसे धरून असल्याचे सिद्ध केले आहे. जिल्ह्यात वर्धा आणि देवळी येथील ‘हाय होल्टेज’ निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या दोन्ही ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

21 Dec, 25 06:08 PM

सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत आ. अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व कायम

सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी आपले वर्चस्व कायम राखत दणदणीत यश मिळवले आहे. सिल्लोड नगर परिषद निवडणूक निकालात त्यांच्या नेतृत्वाखालील नगराध्यक्ष तसेच शिवसेनेच्या 28 पैकी 25 जागांवर विजय मिळवत नगर परिषदेवर पुन्हा स्पष्ट पकड निर्माण केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि रोजगाराच्या संधी हे मुद्दे केंद्रस्थानी होते. मतदारांनी आ. अब्दुल सत्तार यांच्या कामगिरीवर विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांना कौल दिला असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

21 Dec, 25 05:21 PM

सुनील केदार यांच्या सावनेर या बालेकिल्ल्यात काँग्रेसला भोपळा

नगर परिषद निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर झाला. आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात विकास कामांचा धडाका बघून सावनेर,कळमेश्वर, खापा येथील जनतेने प्रचंड मतांनी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष तसेच सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून दिले. मुख्य म्हणजे, नागपूर जिल्ह्यात काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का बसला असून सावनेर या त्यांच्या बालेकिल्ल्यात, त्यांच्या मुळ गावात काँग्रेसला भोपळा मिळाला. काँग्रेसचे सर्वच उमेदवार पराभूत झाले. सावनेरमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजना मंगळे विजयी झाल्या. सावनेरमध्ये भाजपचे २३ पैकी  २१ नगरसेवक आणि स्थानिक आघाडीचे ०२ नगरसेवक निवडून आले. आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी नागपूर जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या सुनील केदार यांना दणका दिल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या दमदार नेतृत्वावर आणि विकास कामांवर जनतेने विश्वास दाखविला आहे. 

21 Dec, 25 05:20 PM

दुधनी नगरपरिषदेवर एक हाती सत्ता मिळवल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा जल्लोष

- दुधनी नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाची एक हाती सत्ता 
- दुधनी नगरपरिषदेच्या 20 पैकी 20 जागांवर शिंदे गटाचे नगरसेवक विजयी 
- आम्ही दुधनीकरांची सेवा केली त्यामुळे मोठे यश मिळाल्याचे सिद्धाराम म्हेत्रेनीं व्यक्त केल्या भावना 
-  जनतेच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही 
- अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत दूधनीकरांची सेवा करणार
- माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना आपला गड कायम ठेवण्यात मोठे यश 
- सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे यांची नगराध्यक्ष म्हणून निवड

21 Dec, 25 05:19 PM

वर्धा जिल्हा विजयी नगराध्यक्ष

१) वर्धा : सुधीर भाउरावजी पांगुळ, काँग्रेस 
२) हिंगणघाट : नयना तुळसकर, भाजप
३) सिंदी (रेल्वे) : राणी स्नेहल कलोडे, भाजप
४) पुलगाव : कविता सुनील ब्राम्हणकर, काँग्रेस
५) देवळी : किरण ठाकरे, अपक्ष (देवळी जनशक्ती पार्टी)
६) आर्वी : स्वाती गुल्हाने, भाजप

21 Dec, 25 05:02 PM

जी आश्वासने निवडणूक काळात दिली ती पूर्ण करून दाखवू: जयंत पाटील

जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला त्यामुळेच हा विजय मिळाला. निवडणुकीच्या तोंडावर ज्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले त्यांच्याबद्दल मला सहानभूती सोबत राहिले असते तर बरे झाले असते. जी आश्वासन निवडणूक काळात दिली ती पूर्ण करून दाखवू, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

21 Dec, 25 04:54 PM

शिरपूर-वरवाडे नगरपालिकेत ४० वर्षांनंतर भाजपाचा ऐतिहासिक विजय; ३१ जागांवर कमळ फुलले

शिरपूर-वरवाडे नगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल ४० वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश मिळवत नगरपालिकेवर सत्ता स्थापन केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूर-वरवाडे नगरपालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत भाजपाला बहुमत बहाल केले आहे.

21 Dec, 25 04:53 PM

विरोधकांनी प्रचंड पैशांचा वापर केल्यानेच आमचं मताधिक्य घटलं: संजय मंडलिक

मुरगूडमध्ये फार मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला. त्यामुळे थोडं कमी मताधिक्य मिळालं आहे. मात्र कितीही पैशांचा ढिगारा जरी आला, तरी मुरगूडची जनता त्याला लाथाडते, याचाच अनुभव आला. विरोधकांनी प्रचंड पैशांचा वापर केल्यानेच आमचं मताधिक्य घटलं.

21 Dec, 25 04:48 PM

नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद, पंचायत निवडणुकीत भाजपाची बाजी

नागपूर जिल्हा निकाल 

भाजप - २२

शिंदेसेना - २

कॉंग्रेस - १

शेकाप-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी - १

गोंडवाणा गणतंत्र पार्टी - १

21 Dec, 25 04:46 PM

नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींचा काय निकाल लागला?

१) कामठी नगरपरिषद - भाजपचे अजय अग्रवाल विजयी 

२) उमरेड नगरपरिषद - भाजपच्या प्राजक्ता कारु विजयी 

३) काटोल नगररिषद - शेकाप व राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीच्या अर्चना देशमुख विजयी

४) वाडी नगरपरिषद - भाजपचे नरेश चरडे विजयी 

५) डिगडोह देवी नगरपरिषद - भाजपच्या पुजा अंबादास उके विजयी 

६) नरखेड नगरपरिषद - भाजपचे मनोज कोरडे विजयी 

७) सावनेर नगरपरिषद - भाजपच्या संजना मंगळे विजयी 

८) कळमेश्वर नगरपरिषद - भाजपचे अविनाश माकोडे विजयी 

९) रामटेक नगरपरिषद - शिंदेसेनेचे बिकेंद्र महाजन विजयी 

१०) बुटीबोरी नगरपरिषद - कॉंग्रेस समर्थित गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे सुमित मेंढे विजयी 

११) मोहपा नगरपरिषद - कॉंग्रेसचे माधव चर्जन विजयी 

१२) खापा नगरपरिषद - भाजपचे पियुष बुरडे विजयी 

१३) मोवाड नगरपरिषद - भाजपच्या दर्शना ढोरे विजयी

१४) वानाडोंगरी नगरपरिषद - भाजपच्या सुनंदा बागडे विजयी

१५) कन्हान-पिंपरी नगरपरिषद - भाजपचे राजेंद्र शेंदरे विजयी 

१६) महादुला नगरपंचायत - भाजपच्या हेमलता ठाकूर विजयी 

१७) मौदा नगरपंचायत - भाजपचे प्रसन्ना तिडके विजयी 

१८) भिवापूर नगरपंचायत - भाजपच्या सुषमा श्रीरामे विजयी 

१९) बहादुरा नगरपंचायत - भाजपच्या प्रतीक्षा खंदाडे विजयी 

२०) कांद्री-कन्हान - भाजपचे सुजित पानतावणे विजयी 

२१) बिडगाव तरोडी नगरपंचायत - भाजपचे विरु जामगडे विजयी 

२२) बेसा-पिपळा नगरपंचायत - भाजपच्या किर्ती बडोले विजयी 

२३) पारशिवनी नगरपंचायत - शिंदेसेनेच्या सुनीता प्रकाश डोमकी विजयी 

२४) नीलडोह नगरपंचायत - भाजपच्या भूमिका विजयी 
२५) कोंढाळी नगरपंचायत - भाजपचे योगेश चाफले विजयी 

२६) गोधणी (रेल्वे) नगरपंचायत - भाजपच्या रोशना कोलते विजयी 

२७) येरखेडा नगरपंचायत- भाजपचे राजकिरण बर्वे विजयी

21 Dec, 25 04:45 PM

नवी मुंबईत अजित पवार गटाला धक्का, जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचा शिंदेसेनेत

नवी मुंबईत अजित पवार गटाला धक्का, जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचा शिंदेसेनेत प्रवेश. माजी नगरसेविका तनुजा मढवी,  इंदुमती भगत यांचाही शिंदेसेनेत प्रवेश

21 Dec, 25 04:41 PM

येवला येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसेची ११ जागांवर बाजी

नगराध्यक्ष -  राजेंद्र लोणारी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
नगरसेवक
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 11
- भाजप - 03
- शिवसेना - 10
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 02
एकूण 26 + 1
 

21 Dec, 25 04:40 PM

मनमाड येथे शिवसेना शिंदे गटाचे २१ उमेदवार विजयी, ठाकरे गटाला दणका

नगराध्यक्ष - योगेश पाटील, शिवसेना ( शिंदे गट )
नगरसेवक - 
शिवसेना ( शिंदे गट ) - 21
शिवसेना ( ठाकरे गट ) - 4
आरपीआय - 2
भाजप - 1
काँग्रेस - 1
राष्ट्रवादी ( अजित पवार ) - 1
अपक्ष - 1
एकूण - 33 +1 ( एका प्रभागातील उमेदवार मयत झाल्याने 2 नगरसेवकांची निवडणूक अजून बाकी)

21 Dec, 25 04:38 PM

सटाणा येथे शिवसेना शिंदे गटाच्या हर्षदा राहुल पाटील झाल्या नगराध्यक्षा

नगराध्यक्ष - हर्षदा राहुल पाटील, शिवसेना ( शिंदे गट ) 
नगरसेवक - 
भाजप - 15
शिवसेना ( शिंदे गट ) - 4
अपक्ष - 4
राष्ट्रवादी ( अजित पवार ) - 1
एकूण - 24 +1
 

21 Dec, 25 04:37 PM

चांदवड येथे भाजपाचे वैभव विजय बागुल नगराध्यक्ष

नगराध्यक्ष - वैभव विजय बागुल,  भाजप 
नगरसेवक - 
भाजप - 11
अपक्ष - 5
शिवसेना ( शिंदे गट ) - 2
शिवसेना ( ठाकरे ) - 1
राष्ट्रवादी ( शरद पवार ) - 1
एकूण - 20 + 1

21 Dec, 25 04:36 PM

नांदगाव नगर परिषदेत काय निकाल लागला?

नगराध्यक्ष -  सागर मदनराव हिरे, शिवसेना ( शिंदे गट ) 
नगरसेवक - 
शिवसेना ( शिंदे गट ) - 19 ( 7 बिनविरोध )
अपक्ष - 1
एकूण - 20 + 1

21 Dec, 25 04:34 PM

22 व्या वर्षी एमपीएससी.. सोडून झाली नगरसेविका..

वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी पैठणच्या स्नेहल धुपे नगरसेविका. पैठण येथील ग्रामीण भागातून घेतले शिक्षण. समाजसेवा करण्याची ईच्छा. MPSC ची तयारी करताना लढवली नगरपालिका निवडणूक.

21 Dec, 25 03:58 PM

बुलढाणा नगर परिषदेत आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी विजयी

आज लागलेल्या निकालात आ.संजय गायकवाड यांच्या एकहाती नेतृत्वात शिवसेना शिंदे गट पक्षाने आपली ताकद दाखवून देत विरोधकांची चांगलीच दाणादाण उडवली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नगराध्यक्षपदाच्या लढतीत पूजा संजय गायकवाड यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर दणदणीत विजय मिळवला. निवडणुकीच्या रिंगणात आ. संजय गायकवाड यांच्या अर्धांगिनी तथा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार पूजा गायकवाड, काँग्रेसच्या लक्ष्मी दत्ता काकस आणि भाजपच्या अर्पिता विजय शिंदे यांच्यात चुरस होती. 

21 Dec, 25 03:57 PM

पुसद पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय; अॅड. मोहिनी इंद्रनील नाईक नगराध्यक्षपदी विजयी

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अॅड. मोहिनी इंद्रनील नाईक यांनी विजय मिळवला आहे. अटीतटीच्या लढतीत अॅड. मोहिनी नाईक यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. मोहम्मद नदीम यांचा ६४५ मतांनी पराभव केला आहे.

अॅड. मोहिनी नाईक या राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी असून, त्यांच्या विजयानंतर पुसद शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे.

21 Dec, 25 03:41 PM

अमळनेरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे डॉ. परीक्षित बाविस्कर विजयी

अमळनेरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे डॉ. परीक्षित बाविस्कर विजयी झाले आहेत. अमळनेरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप (शहर विकास आघाडी) चे जितेंद्र ठाकूर यांचा पराभव. अमळनेर मध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांना मोठा धक्का.

21 Dec, 25 03:40 PM

मोहोळमध्ये विजयानंतर शिवसेना शिंदे गटाकडून जल्लोष

मोहोळ नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत.  अवघ्या २२ वर्षाच्या सिद्धी वस्त्रे या मोहोळच्या नगराध्यक्षपदी विजयी. लोक विकासाला मतदान करतात आणि आम्ही कामातून विरोधकांना उत्तर दिले. मोहोळ मध्ये विजयानंतर शिवसेना शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात आलाय.

21 Dec, 25 03:28 PM

Maharashtra Local Body Election 2025 : राज्यात भाजपा शंभरी पार, शिवसेना दोन आकड्यावर; वाचा कुणाला किती जागा?

राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकल समोर आले आहेत. यामध्ये भाजपाला मोठे यश मिळाले आहे. तर काँग्रेसनेही चांगली कामगिरी केली आहे.

भाजपा-१२०

शिवसेना (शिंदे गट)- ५४

राष्ट्रवादी (शरद पवार गट)- ४०

काँग्रेस- ३४

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष- ७

शिवसेना( ठाकरे गट)- ८

इतर- २५

 

 

21 Dec, 25 02:45 PM

पारोळा नगराध्यक्ष पदी शिंदेसेनेचे चंद्रकांत पाटील

नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार चंद्रकांत भिकनराव पाटील हे १८१८६ मते मिळवत निवडून आले. त्यांना ९४८६ मताधिक्य मिळाले.  त्यांच्या प्रतिस्पर्धी जनाधार विकास पार्टीच्या  अंजली करण पाटील यांना ८७०० मते मिळाली आहेत.

21 Dec, 25 02:43 PM

Maharashtra Local Body Election 2025 : गडचिरोली जिल्हा नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार

गडचिरोली जिल्हा नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार
गडचिरोली : ॲड. प्रणोती निंबोरकर, भाजप 
आरमोरी : रुपेश पुणेकर, भाजप 
देसाईगंज : लता सुंदरकर, भाजप

21 Dec, 25 02:15 PM

नागपूर जिल्हा - नगरपरिषद, नगरपंचायत निकाल

नागपूर जिल्हा - नगरपरिषद, नगरपंचायत निकाल 

१) कामठी नगरपरिषद - कॉंग्रेसचे शकुर नागानी आघाडीवर 

२) उमरेड नगरपरिषद - भाजपच्या प्राजक्ता कारु आघाडीवर 

३) काटोल नगररिषद - शेकाप व राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीच्या अर्चना देशमुख विजयी

४) वाडी नगरपरिषद - भाजपचे नरेश चरडे आघाडीवर 

५) डिगडोह देवी नगरपरिषद - भाजपच्या पुजा अंबादास उके विजयी 

६) नरखेड नगरपरिषद - भाजपचे मनोज कोरडे विजयी 

७) सावनेर नगरपरिषद - भाजपच्या संजना मंगळे विजयी 

८) कळमेश्वर नगरपरिषद - भाजपचे अविनाश माकोडे विजयी 

९) रामटेक नगरपरिषद - शिंदेसेनेचे बिकेंद्र महाजन विजयी 

१०) बुटीबोरी नगरपरिषद - कॉंग्रेस समर्थित गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे सुमित मेंढे  विजयी 

११) मोहपा नगरपरिषद - कॉंग्रेसचे माधव चर्जन विजयी 

१२) खापा नगरपरिषद - भाजपचे पियुष बुरडे विजयी 

१३) मोवाड नगरपरिषद  - भाजपच्या दर्शना ढोरे  विजयी

१४) वानाडोंगरी नगरपरिषद - भाजपच्या सुनंदा बागडे आघाडीवर 

१५) कन्हान-पिंपरी नगरपरिषद - भाजपचे राजेंद्र शेंदरे आघाडीवर 

१६) महादुला नगरपंचायत - भाजपच्या हेमलता ठाकूर विजयी 

१७) मौदा नगरपंचायत - भाजपचे प्रसन्ना तिडके विजयी 

१८) भिवापूर नगरपंचायत - भाजपच्या सुषमा श्रीरामे विजयी 

१९) बहादुरा नगरपंचायत - भाजपच्या प्रतीक्षा खंदाडे विजयी 

२०) कांद्री-कन्हान -  भाजपचे सुजित पानतावणे विजयी 

२१) बिडगाव तरोडी नगरपंचायत - भाजपचे विरु जामगडे विजयी 

२२) बेसा-पिपळा नगरपंचायत - भाजपच्या किर्ती बडोले विजयी 

२३) पारशिवनी नगरपंचायत - शिंदेसेनेच्या सुनीता प्रकाश डोमकी विजयी 

२४) नीलडोह नगरपंचायत - भाजपच्या भूमिका मंडपे आघाडीवर 

२५) कोंढाळी नगरपंचायत - भाजपचे योगेश चाफले विजयी 

२६) गोधणी (रेल्वे) नगरपंचायत - भाजपच्या रोशना कोलते विजयी 

२७) येरखेडा नगरपंचायत- भाजपचे राजकिरण बर्वे विजयी

21 Dec, 25 01:55 PM

Nagar Palika Election Results 2025 : एका नजरेत कोल्हापूर जिल्हा नगराध्यक्ष निकाल

नगराध्यक्ष विजयी उमेदवार 

१.जयसिंगपूर : संजय पाटील यड्रावकर : शाहू विकास आघाडी
२.मुरगूड : सुहासिनी पाटील : शिंदेसेना 
३.कागल : सविता माने (राष्ट्रवादी-शाहू आघाडी)
४.वडगाव : विद्याताई पोळ (काँग्रेस पुरस्कृत यादव आघाडी)
५.शिरोळ : योगिता कांबळे (शिवशाहू आघाडी-पृथ्वीराज यादव,राजू शेट्टी,गणपतराव पाटील)
६.पन्हाळा : जयश्री पोवार (जनसुराज्य पक्ष)
७.गडहिंग्लज : महेश तुरबतमठ (राष्ट्रवादी)
८.चंदगड : सुनील काणेकर (भाजप)
९.कुरुंदवाड : मनीषा डांगे (शाहू आघाडी - यड्रावकर)
१०.मलकापूर (जि.कोल्हापूर) : रश्मी कोठावळे : जनसुराज्य, भाजप, दलित महासंघ आघाडी)
११.हातकणंगले : अजितसिंह पाटील (शिंदेसेना)
१२.हुपरी : मंगळराव माळगे (भाजप)
१३.आजरा : अशोक चराटी (भाजप-शिंदेसेना पुरस्कृत ताराराणी आघाडी..)

21 Dec, 25 01:52 PM

खामगाव नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; अपर्णा सागर फुंडकर विजयाकडे, कार्यकर्त्यांचा जल्लोष

 बुलढाणा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खामगाव नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार अपर्णा सागर फुंडकर या विजयाकडे वाटचाल करत असून, त्यांच्या या संभाव्य विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.​​अपर्णा सागर फुंडकर या राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी आहेत. फुंडकर परिवाराचा खामगाव मतदारसंघात असलेला दबदबा आणि गेल्या काही काळात केलेली विकासकामे यामुळे सुरुवातीपासूनच त्यांचे पारडे जड मानले जात होते. मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये त्यांनी घेतलेली आघाडी पाहता, त्यांचा विजय आता केवळ औपचारिकता उरल्याचे चित्र आहे. ​विजयाचे वृत्त समजताच खामगाव शहरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला आहे. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत आहे.

21 Dec, 25 01:51 PM

Maharashtra Local Body Election 2025 : बुलढाण्यात शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड यांची विजयाकडे वाटचाल

बुलढाणा येथे सुरू असलेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड या आघाडीवर असून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

21 Dec, 25 01:50 PM

Maharashtra Local Body Election 2025 : धामणगाव रेल्वे नगरपरिषदेत भाजपचा क्लीन स्वीप; २० पैकी २० जागांवर विजय

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना अडसड रोठे या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ होत भाजपने सर्वच्या सर्व २० जागांवर विजय मिळवत क्लीन स्वीप केला आहे.

या दणदणीत विजयामुळे भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांकडून एकच जल्लोष सुरू असून धामणगाव रेल्वेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

21 Dec, 25 01:49 PM

Nagar Palika Election Results 2025 : देवरूख आणि गुहागर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा

 रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर महायुतीचा दबदबा काय आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड नगरपरिषदेवर शिवसेनेचा( शिंदे सेना) झेंडा. देवरूख आणि गुहागर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा. लांजा नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा. रत्नागिरी शिवसेनेनी आपला गड राखला.

21 Dec, 25 01:44 PM

Maharashtra Local Body Election 2025 : अमरावतीच्या चांदूरबाजारमध्ये बच्चू कडूंची एकाहाती सत्ता

प्रहार जनशक्ती पक्ष – 11 जागा
भाजप – 4 जागा
काँग्रेस – 1 जागा
शरद पवार गट – 1 जागा
अजित पवार गट – 1 जागा
अपक्ष – 2 जागा

नगराध्यक्ष पदाच्या
प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार मनीषा नागलिया विजयी

21 Dec, 25 01:40 PM

Maharashtra Local Body Election 2025 : अमरावती जिल्हा नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार

अमरावती जिल्हा नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार

भाजप ६, काँग्रेस २, शिंदेसेना, उबाठा, प्रहार व अपक्ष प्रत्येकी १


१) वरूड  नगरपरिषद:  ईश्वर सलामे (भाजप)
२) मोर्शी नगरपरिषद:   प्रतीक्षा गुल्हाने (शिंदेसेना)
३) धारणी नगरपंचायत: सुनील चौथमल (भाजप)
४) चिखलदरा नगरपरिषद: शेख अब्दूल शेख हैदर (काँग्रेस)
५) अचलपूर नगरपरिषद : रूपाली माथने (भाजप)
६) अंजनगाव सुर्जी नगरपरिषद: अविनाश गायगोले (भाजप)
७ ) दर्यापूर नगरपरिषद: मंदाकिनी भारसाकडे (काँग्रेस)
८) शेंदूरजना घाट नगरपरिषद: हरिभाऊ वरखडे (भाजप)
९) धामणगाव रेल्वे नगरपरिषद: अर्चना राेटे (भाजप)
१०) चांदूर रेल्वे नगरपरिषद: प्रियंका विश्वकर्मा (अपक्ष,आपलं चांदूर पॅनल)
११) नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत : प्राप्ती मारोटकर (उबाठा)
१२) चांदूर बाजार नगरपरिषद: मनीषा नांगलिया (प्रहार)

21 Dec, 25 01:39 PM

Nagar Palika Election Results 2025 : सिन्नर नगराध्यक्ष निकाल आला समोर

सिन्नर नगराध्यक्ष निकाल

अखेरच्या सहाव्या फेरीत सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल उगले ५६०२ मतांची विजयी. उबाठा शिवसेनेचे प्रमोद चोथवे आणि भाजपचे हेमंत वाजे पराभूत.

21 Dec, 25 01:39 PM

Maharashtra Local Body Election 2025 : साकोली नगरपालिकेचा निकाल आला समोर

साकोली नगरपालिका

प्र. क्र. 1
1) पुष्कर करंजकर.. शिवसेना - विजयी 
 2) वैशाली लांजेवार .. काँग्रेस - विजयी 

प्र. क्र. 2
1) राजकुमार पोगडे.. भाजपा - विजयी 
 2) त्रिवेणी चौधरी .. काँग्रेस - विजयी 

प्र. क्र. 3
1) कुणाल राऊत काँग्रेस - विजयी 
2) रोहिणी मुंगुलमारे अपक्ष - विजयी 

प्र. क्र. 4
1) भाजपा पंकज मुंगुलमारे - विजयी 
2) भाजपा प्रीती डोंगरवार - विजयी 

प्र. क्र. 5
1) संदीप बावनकुडे काँग्रेस - विजयी 
2) मेघा बडवाईक भाजपा - विजयी 

प्र. क्र. 6
1) भाजपा प्रमोद गजभिये - विजयी 
2) काँग्रेस साईली दोनोडे - विजयी 

प्र. क्र. 7
1) किशोर पोगडे भाजपा - विजयी 
2) सौ. रेणू गणवीर भाजपा - विजयी 

प्र. क्र. 8
1) राष्ट्रवादी नयन पटेल - विजयी 
2) काँग्रेस निर्मला नंदेश्वर - विजयी
प्र. क्र. 9
1)सोनू बैरागी अपक्ष
2)मिनाबाई लांजेवार भाजपा
प्र. क्र. 10
1) सपनभाऊ शरद कापगते अपक्ष
2) हेमलता परसगडे विजयी भाजपा

21 Dec, 25 01:36 PM

Nagar Palika Election Results 2025 : नागपूर जिल्हा: मोहपा नगरपरिषदेत भाजपा आघाडीवर

नागपूर जिल्हा:  मोहपा नगरपरिषद 

नगराध्यक्ष पदासाठी माधव चर्जन काॅंग्रेस विजयी 

काॅंग्रेस नगरसेवक ९
भाजपा १०
अपक्ष १

21 Dec, 25 01:28 PM

Nagar Palika Election Results 2025 : येवला नगराध्यक्षपदी अजित पवार गटाचे राजेंद्र लोणारी ११६२ मतांनी विजयी

नाशिक जिल्हा नगराध्यक्षपद
येवला नगराध्यक्षपदी अजित पवार गटाचे राजेंद्र लोणारी ११६२ मतांनी विजयी.
चांदवडला भाजपचे वैभव बागुल २३०३ मतांनी नगराध्यक्षपदावर विजयी
इगतपुरीच्या नगराध्यक्षपदी शिंदेसेना- अजित पवार गटाच्या शालिनी खातळे विजयी  
त्र्यंबकेश्वरला भाजपचे कैलास घुगे  आघाडीवर
सिन्नरला अजित पवार गटाचे विठ्ठल उगले आघाडीवर  
सटाण्याला शिंदेसेनेच्या हर्षदा पाटील आघाडीवर

21 Dec, 25 01:19 PM

Maharashtra Local Body Election 2025 : नगरमध्ये सात नगरपरिषदेत कमळ फुलले

अहिल्यानगर: जिल्ह्यातील बारापैकी सात नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदावर भाजपने मारली आहे. शेवगाव व नेवासा नगरपरिषदेत शिंदेसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला आहे. संगमनेरचे नगराध्यक्ष पद राखण्यात आमदार सत्यजित तांबे यांच्या संगमनेर सेवा समितीला यश आले आहे. राहुरी नगरपरिषदेत महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष झाला आहे. कोपरगाव नगराध्यक्षपदासाठी अटीतटीची लढत झाली. अखेरच्याक्षणी भाजपचे पराग संधान ४०९ मतांनी विजयी झाले. 

21 Dec, 25 01:10 PM

Nagar Palika Election Results 2025 : मोवाड नगरपरिषदेत भाजपा आघाडीवर

नगरपरिषद - मोवाड
अ.क्र. नगराध्यक्षपदाचे उमेदवार पक्ष मिळालेली मते 
१) दर्शना हरीश ढोरे - भाजप          
             3871

२) प्रतीभा साहेबराव ढोके -राष्ट्रवादी (अजित पवार)     216
३) सीमा चंद्रशेखर साठोने -  2079 राष्ट्रवादी (शरद पवार)
---
एकूण प्रभाग/एकूण सदस्य - १०/२०
पक्षीय बलाबल - 
भाजप -   18
कॉंग्रेस -   00
राष्ट्रवादी (शरद पवार) - 00
राष्ट्रवादी (अजित पवार) -00
शिंदेसेना -  01
उद्धवसेना - 00
इतर -       01

21 Dec, 25 01:08 PM

Maharashtra Local Body Election 2025 : वर्धा पालिका विजयी उमेदवार

वर्धा पालिका विजयी उमेदवार
प्रभाग -१
- सतीश मिसळ (भाजप)
- उज्वला पेठे (भाजप)
प्रभाग-२
- विजय उईके (भाजप)
- नाझिया शेख (काँग्रेस)
प्रभाग-३ 
- सचिन होले (भाजप)
- सोनल त्रिवेदी (भाजप)
प्रभाग-४
- वंदना चांबटकर (भाजप)
- सोहम ठाकूर (शरद पवार गट)
प्रभाग-५
- विलास आगे (भाजप)
- निशा गोसावी (भाजप)
प्रभाग-६
- तरुननुम शेख (भाजप)
- प्रदीप जग्याशी (शरद पवार गट)
प्रभाग-७
* मुन्ना झाडे (शरद पवार गट)
* श्वेता पाठक (शरद पवार)
प्रभाग-८
* डब्बू शर्मा (भाजप)
* वैभवी मेघे (भाजप)
प्रभाग- ९
* प्रदीप ठाकूर (भाजप)
* शुभांगी कोलते (भाजप)
प्रभाग-१०
* वंदना भुते (भाजप)
* पवन राऊत (भाजप)
प्रभाग -११
* प्रदीप तलमले (भाजप)
* स्वाती गव्हाणे (भाजप)
प्रभाग-१२
* मोहिनी आडे (भाजप)
* अभिषेक त्रिवेदी (भाजप)
प्रभाग- १३
* यशवंत झाडे (माकप)
* दीपिका आडेपवार (शरद पवार)
प्रभाग-१४
* संतोषसिंग ठाकूर (अजित पवार)
* स्नेहा आकरे (अजित पवार)
प्रभाग-१५
* सुनील चावरे (भाजप)
* प्रियांका खंगार (भाजप)

21 Dec, 25 01:01 PM

Nagar Palika Election Results 2025 : आष्टा नगर परिषदेत शहर विकास आघाडीचा दणदणीत विजय

आष्टा : आष्टा ( जि. सांगली) नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार विलासराव शिंदे व आमदार जयंत पाटील व जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील आष्टा शहर विकास आघाडीने २४ पैकी २३ जागी विजय खेचून आणला आहे. विरोधी महायुती गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. नगराध्यक्ष पदासाठी आष्टा शहर विकास आघाडीचे विशाल विलासराव शिंदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजपचे उमेदवार प्रवीण उर्फ सतीश माने यांचा दणदणीत पराभव केला. विशाल शिंदे यांच्या विजयानंतर सर्वत्र जल्लोष व्यक्त करण्यात येत आहे.

21 Dec, 25 12:58 PM

Nagar Palika Election Results 2025 : भुसावळ पालिकेत भाजपा आघाडीवर

 भुसावळ येथे प्रभाग नऊमधील काका-पुतण्याच्या लढतीत भाजपाचे युवराज लोणारी यांनी पुतण्या जयंत लोणारी यांचा पराभव केला.  युवराज दगडू लोणारी 2231 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी पुतण्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जयंत लोणारी यांचा 1585 मतांनी पराभव केला.

21 Dec, 25 12:44 PM

Nagar Palika Election Results 2025 : येवला नगराध्यक्षपदी अजित पवार गटाचे राजेंद्र लोणारी ११६२ मतांनी विजयी

चांदवडला भाजपचे वैभव बागुल २३०३ मतांनी नगराध्यक्षपदावर विजयी
इगतपुरीच्या नगराध्यक्षपदी शिंदेसेना- अजित पवार गटाच्या शालिनी खातळे विजयी  
त्र्यंबकेश्वरला भाजपचे कैलास घुगे  आघाडीवर
सिन्नरला अजित पवार गटाचे विठ्ठल उगले आघाडीवर  
सटाण्याला शिंदेसेनेच्या हर्षदा पाटील आघाडीवर

21 Dec, 25 12:31 PM

नंदुरबार पालिकेत शिंदे सेना आघाडीवर

नंदुरबार पालिका...
  
आतापर्यंत मतमोजणी...
12 प्रभाग... जागा 24
शिंदेसेना - 21
भाजप - 1
एम आय एम - 2

नगराध्यक्ष...
रत्ना रघुवशी (शिंदेसेना ) लीड...
8,527

21 Dec, 25 12:30 PM

Maharashtra Local Body Election 2025 : पलूसमध्ये काँग्रेसच्या विजयाचा डंका विश्वजीत कदम यांचा विरोधकांना धोबीपछाड; विरोधी भाजपला केवळ एका जागेवर समाधान

सांगली : पलूसमध्ये चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने नगररिषदेतील सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. भाजपला याठिकाणी केवळ एका जागेवर विजय मिळविता आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाला चार जागांवर विजय मिळविला. पलूस नगरपरिषदेत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देत यंदा भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाने जोरदार प्रयत्न केले होते.

21 Dec, 25 12:20 PM

जालना : अंबड येथे भाजपा आमदार नारायण कुचेर यांनी राखला गड

अंबड शहरातील नागरिकांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला व माझ्या उमेदवारांना निवडून दिले त्या बद्दल मी आभार मानतो. अंबड शहराचा पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार. विरोधकांच्या कुठल्याही भूलथापाला बळी न पडता मतदार राजांनी मला या शहराचा सर्वांगीण विकस करण्याची संधी दिली..

21 Dec, 25 12:15 PM

Maharashtra Local Body Election 2025 : ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व २३ जागा जिंकत विरोधी पक्षांना दिला झटका

सांगली : इस्लामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी वर्चस्व राखण्यात यश मिळविले. नगराध्यक्ष पदासह २३ जागा जिंकत त्यांनी सत्तांतर घडविले. विरोधात एकवटलेल्या भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट तसेच काँग्रेसच्या विकास आघाडीच्या पदरात केवळ ८ जागा मिळाल्या. 

21 Dec, 25 12:11 PM

Maharashtra Local Body Election 2025 : परळी नगरपालिका प्रभाग निकाल 2025

परळी नगरपालिका प्रभाग निकाल 2025
फेरी -6

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

1:- पद्मश्री धर्माधिकारी (राष्ट्रवादी, अप) - 12681

2:-संध्या देशमुख (राष्ट्रवादी,शप) - 6305

3:- काँग्रेस - 4849

अजित पवारर गट लीड - 6376

प्रभाग क्रमांक 1
मुंडे दीपक प्रल्हाद विजयी
आघाव वंदन अश्विनकुमार विजयी

प्रभाग 2
अनंत इंगळे विजयी 
अल्ताफ पठाण विजयी 
(महायुती)

प्रभाग 4
अपक्ष उमेदवार केशव नागरगोजे विजयी    

प्रभाग 5
वैजनाथ सोळंकेविजयी
अश्विन मोगरकर विजयी 
(महायुती)

प्रभाग 6
अंजली माळी विजयी
व्यंकटेश शिंदे विजयी 
(महायुती)

प्रभाग क्रमांक 6 मधून नगरसेवक पदासाठी दीपक देशमुख पराभूत

प्रभाग 8
अपक्ष उमेदवार मंगलदादा विजयी
अपक्ष सौ. अर्चना महेंद्र रोडे विजयी

21 Dec, 25 12:10 PM

Maharashtra Local Body Election 2025 : भोकरदन नगरपालिकेत शरद पवार गट आघाडीवर

भोकरदन नगरपालिका:

 राष्ट्रवादी SP मिरझा समरीन मिर्झा 830 मातांनी विजय...

भाजपाच्या आशा माळीयांचा पराभव...

विजय नगरसेवक
भाजपा- 9 
राष्ट्रवादी- 9
काँग्रेस- 2

21 Dec, 25 12:04 PM

शिराळ्यात शिवसेनेचा मोठा विजय

शिराळा (जि. सांगली) नगरपंचायत निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट महायुतीला ११ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक २७३ मतांनी विजयी.

21 Dec, 25 12:01 PM

Maharashtra Local Body Election 2025 : सिल्लोड नगर परिषद निवडणूक, शिंदे सेना आघाडीवर

आतापर्यंत ४ प्रभागाचा निकाल लागला त्यात शिंदेंसेनेचे ८ पैकी ८ उमेदवार विजयी. तर भाजपला आणखी खातेही उघडता आले नाही.
तर सर्व चार प्रभागातून शिंदेंसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर 4500 मतांनी आघाडीवर
=============
शिंदेंसेनेचे विजयी उमेदवार असे, 
प्रभाग क्रमांक 1 अ सुधाकर बाबुराव गायकवाड विजयी (शिंदेंसेना)
प्रभाग क्रमांक 1 ब पार्वताबाई सुखदेव दुधे विजयी (शिंदेंसेना)
प्रभाग क्रमांक 2 अ विठल म्हतारजी सपकाळ विजयी (शिंदेंसेना)
प्रभाग क्रमांक 2 ब वैशाली नरेंद्र पाटील विजयी (शिंदेंसेना)
प्रभाग क्रमांक 3 अ : शेख आसिफ शेख नबी बागवान :-शिदेसेना (विजयी)
प्रभाग क्रमांक 3 ब: पठाण तहेसीनखान फेरोजखान - :-शिदेसेना (विजयी)
प्रभाग 4 अ: मिरझा साजेदा बेग चांद - :-शिदेसेना( विजयी)
प्रभाग 4 ब: आहेर सिद्धेश्वर माणिकराव :-शिदेवसेना (विजयी)

21 Dec, 25 11:51 AM

Maharashtra Local Body Election 2025 : संगमनेरात तांबे–थोरात गटाचा बोलबाला; विजयाचा जल्लोष

संगमनेर येथे आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थक तसेच निवडून आलेल्या विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. संगमनेर सेवा समितीच्या निवडणुकीत तांबे–थोरात गटाचे बहुसंख्य उमेदवार विजयी झाले आहेत.

दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे या आघाडीवर असल्याची माहिती आहे. निकालानंतर तांबे यांच्या निवासस्थानाबाहेर विजयी उमेदवारांवर गुलालाची उधळपट्टी करण्यात आली. यावेळी समर्थकांकडून आमदार सत्यजित तांबे यांच्या नावाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

21 Dec, 25 11:48 AM

Maharashtra Local Body Election 2025 : अंबड नगर परिषदेत भाजपा आघाडीवर

अंबड नगर परिषद निवडणूक निकाल:
 
नगराध्यक्ष: देवयानी कुलकर्णी (भाजप) 5910 मताने विजयी 

नगरसेवक: 

भाजप: 14
RSP: 02
राष्ट्रवादी शरद पवार: 04
काँग्रेस: 01
राष्ट्रवादी काँग्रेस: 01

21 Dec, 25 11:40 AM

Nagar Palika Election Results 2025 : राष्ट्रवादी शप गटाचे उमेदवार चाऊस 143 मतांनी आघाडीवर

माजलगाव नगर परिषद: अध्यक्षपदाची दुसरी फेरी
राष्ट्रवादी अप-  मेहरूबी पटेल  2762
राष्ट्रवादी शप - शिफा चाऊस   3404
भाजप- संध्या मेंढके  3261 
ठाकरेसेना- संध्या पैंजने  90

राष्ट्रवादी शप गटाचे उमेदवार चाऊस 143 मतांनी आघाडीवर

21 Dec, 25 11:37 AM

Maharashtra Local Body Election 2025 : जेजुरी नगरपरिषदेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर

जेजुरी नगरपरिषद मतमोजणी निकाल

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई विजयी 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे 17 उमेदवार विजयी 
भाजपा गटाचे दोन उमेदवार विजयी 
तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयी.

21 Dec, 25 11:33 AM

Maharashtra Local Body Election 2025 : चिपळूण नगर परिषदेमध्ये शिंदे सेनेचे उमेश सकपाळ विजयी

बहुचर्चित चिपळूण नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी आमदार रमेश कदम पराभूत शिंदे सेनेचे उमेश सकपाळ विजयी.

21 Dec, 25 11:26 AM

Maharashtra Local Body Election 2025 : देवरुख नगरपंचायतीमध्ये 17 जागांपैकी नऊ जागांचे निकाल

देवरुख नगरपंचायतीमध्ये 17 जागांपैकी नऊ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. सात जागांवर शिंदे सेना आणि भाजप युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. एका जागी अपक्ष तर एका जागी भाजप बंडखोर विजयी.

21 Dec, 25 11:23 AM

Maharashtra Local Body Election 2025 : विटा नगर परिषदेमध्ये शिंदेसेना आघाडीवर

सांगली : विटा नगर परिषदेमध्ये दुसऱ्या फेरी अखेर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार  काजल संजय म्हेत्रे 1248 मतांनी आघाडीवर आहेत.

21 Dec, 25 11:22 AM

Maharashtra Local Body Election 2025 : यावल नगरपालिकेमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर

यावल नगरपालिकेमध्ये ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छाया अतुल पाटील या आघाडीवर. त्यांना ४३६८ मते तर भाजपच्या रोहिणी उमेश फेगडे यांना १९४१ मते.

21 Dec, 25 11:21 AM

Maharashtra Local Body Election 2025 : जव्हार नगर परिषदेत नगरध्यक्ष पूजा उदावंत भाजप विजयी 

जव्हार नगर परिषद 
नगरध्यक्ष पूजा उदावंत भाजप विजयी 

 नगरसेवक २० पैकी १४ भाजप
राष्ट्रवादी अजित पवार गट - ३
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - १
शिवसेना शिंदेगट - २

21 Dec, 25 11:20 AM

Nagar Palika Election Results 2025 : नंदुरबार पालिकेमध्ये शिंदेसेना आघाडीवर

नंदुरबार पालिकेमध्ये शिंदेसेना आघाडीवर आहे. 

प्रभाग= 1ते 6
सर्व जागा शिंदेसेना

नगराध्यक्ष लीड...
रत्ना रघुवशी (शिंदे सेना)= 3800

21 Dec, 25 11:16 AM

Nagar Palika Election Results 2025 : गेवराई नगर पालिकेत भाजपाचे उमेदवार आघाडीवर

बीड अपडेट

गेवराई नगर पालिका 

प्रभाग १,२,३ मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीताभाभी बाळराजे पवार आघाडीवर

21 Dec, 25 11:16 AM

Maharashtra Local Body Election 2025 : बीड नगरपालिकेत भाजपा आघाडीवर

बीड नगरपालिका 
प्रभाग १ 
राष्ट्रवादी SP गटाचे दोन्ही उमेदवार विजयी

प्रभाग २ 
भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी 

प्रभाग ३
राष्ट्रवादी AP गटाचे दोन्ही उमेदवार विजयी 

प्रभाग ४ 
राष्ट्रवादी SP गटाचे दोन्ही उमेदवार विजयी

नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार ज्योती घुंबरे आघाडीवर..

21 Dec, 25 11:13 AM

Maharashtra Local Body Election 2025 : आष्टा नगरपरिषदेत विशाल शिंदे आघाडीवर

आष्टा (जि. सांगली) नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे आष्टा शहर विकास आघाडीचे उमेदवार विशाल शिंदे पहिल्या फेरी अखेर १४६१ मतांनी आघाडीवर.

21 Dec, 25 11:12 AM

Nagar Panchayat Election Results 2025: शिराळा नगरपंचायतमध्ये सहा जागांवर भाजपा विजयी

शिराळा (जि. सांगली) येथील नगरपंचायतीच्या निवडणूकीचा नऊ जागांवरील निकाल घोषित झाला आहे. यामध्ये सहा जागांवर भाजप तर तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय झाले आहेत.

21 Dec, 25 11:08 AM

Maharashtra Local Body Election 2025 : बदलापूर नगरपरिषद निवडणूक; पहिल्या फेरीत भाजपा आघाडीवर

बदलापूर नगरपरिषद निवडणूक

 पहिल्या फेरीत पडलेली मते 

रुचिता घोरपडे (भाजप) मिळालेली मते ६८७८

वीणा म्हात्रे (शिंदे सेना) मिळालेली मते ५०८७

प्रिया गवळी (उद्धव सेना) मिळालेली मते ४८९

भाजपाच्या रुचिता घोरपडे १७९१ मतांनी आघाडीवर

21 Dec, 25 11:06 AM

Nagar Palika Election Results 2025 : मुक्ताईनगरमध्ये शिंदेसेनेचे गणेश टोंगे १३ मतांनी विजयी

नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये शिंदेसेनेचे गणेश टोंगे १३ मतांनी विजयी.  नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना महाजन यांचे पती  ललित महाजन यांचा तेरा मतांनी पराभव झाला आहे.

21 Dec, 25 11:02 AM

Maharashtra Local Body Election 2025 : कणकवली नगरपंचायत निवडणूक; पहिल्या पाच प्रभागांचा निकाल हाती

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच आज मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रथम पाच प्रभागांचा निकाल हाती आला आहे.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांना १४६१ एवढी मते मिळाली तर संदेश पारकर यांना १४६४ एवढी मते मिळाली आहेत. संदेश पारकर अवघ्या काही मतांनी पुढे आहेत.

प्रभाग क्रमांक - १

राकेश राणे  ( भाजप ) - ४४४
तेजस राणे ( शहर विकास आघाडी ) - ३१०

प्रभाग क्रमांक - २ 

प्रतीक्षा सावंत ( भाजप ) - ३४३
साक्षी आमडोसकर ( शहर विकास आघाडी ) - ३१५

प्रभाग क्रमांक - ३

स्वप्निल राणे ( भाजप ) - २५७
 सुमित राणे (शहर विकास आघाडी ) - १९३

प्रभाग क्रमांक - ४ 

माधवी मुरकर ( भाजप ) - २२९ 
जाई मुरकर ( शहर वि. आघाडी ) - २८८

प्रभाग क्रमांक -५ 

मेघा गांगण ( भाजप ) - ३२२
स्नेहा वाळके ( शहर वि. आघाडी ) - २७०

21 Dec, 25 10:57 AM

Nagar Palika Election Results 2025 : सांगोला नगरपरिषदेत शहाजीबापूंचे उमेदवार आघाडीवर

सोलापूर : सांगोला नगरपरिषद निवडणूक; शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने पहिल्या फेरीत 1360 मताने आघाडीवर आहेत.

21 Dec, 25 10:57 AM

Maharashtra Local Body Election 2025 : मैंदर्गी नगर परिषदेत भाजपाने ८ जागा जिंकल्या

सोलापूर : मैंदर्गी नगर परिषद आठ जागांवर भाजपा विजयी स्थानिक गटाला दोन जागा.

21 Dec, 25 10:55 AM

वर्धा नगरपरिषदेत काँग्रेसच्या उमेदवार आघाडीवर

वर्धा नगरपरिषदेमध्ये पहिली फेरीत सुधीर पांगुळ काँग्रेस ३३४७, निलेश किटे भाजप २७६६ सुधीर पांगुळ काँग्रेस ५८१ मतांची आघाडी आहेत.

21 Dec, 25 10:54 AM

मानवतमध्ये नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार राणी अंकुश लाड आघाडीवर

मानवत : नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार राणी अंकुश लाड या 572 मताने आघाडीवर.

21 Dec, 25 10:52 AM

Maharashtra Local Body Election 2025 : मालवणमध्ये पहिल्या फेरीत शिंदेसेना आघाडीवर

मालवण नगरपालिकेमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेच्या ममता वराडकर १७२ मतांनी आघाडीवर आहेत. 

पूजा करलकर 689
शिल्पा खोत - 809 
ममता वराडकर 981

21 Dec, 25 10:48 AM

Nagar Palika Election Results 2025 : सावंतवाडीत उध्दव सेना काँग्रेस ने खाते उघडले भाजप चार जागांवर आघाडीवर

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणूकीत भाजप चार जागांवर आघाडीवर असून, काँग्रेस व उद्धवसेना यांची प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत. भाजपचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगरसेवक सुधीर आडवडेकर दुलारी लागणेकर मोहिनी मडगावकर यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.

21 Dec, 25 10:38 AM

Maharashtra Local Body Election 2025 : नंदूरबार पालिकेत शिंदेसेना आघाडीवर

नंदुरबार पालिकेमध्ये प्रभाग 1 मध्ये दोन्ही जागा शिंदेसेना आघाडीवर आहे,  नगराध्यक्ष लीड... रत्ना रघुवशी = 600 आहे.

21 Dec, 25 10:36 AM

Maharashtra Election Results 2025: सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे विठ्ठल उगले आघाडीवर

सिन्नर (जि. नाशिक) पहिल्या फेरीअखेर नगराध्यक्षपदाचे अजित पवार गटाचे विठ्ठल उगले 1098 मतांनी आघाडीवर आहेत.

21 Dec, 25 10:23 AM

Nagar Palika Election Results 2025 : बीडमध्ये पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीमार

बीडमध्ये मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी उमेदवार प्रतिनिधींचा प्रवेशद्वारावर गोंधळ झाल आहे.  पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीमार. काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होत असून मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी प्रवेशद्वारावर गर्दी झाली आहे. प्रतिनिधीचे ओळखपत्र तपासून पोलिसांकडून आत प्रवेश दिला.

21 Dec, 25 10:28 AM

Maharashtra Election Results 2025: चंदगडमध्ये राष्ट्रवादीचे ६ जण विजयी

कोल्हापूर: चंदगड भाजपाचे सुनील काणेकर ३०० मतांनी आघाडीवर तर भाजपा ३ व राष्ट्रवादी ६ जण विजयी झाले आहेत.

21 Dec, 25 10:27 AM

Maharashtra Local Body Election Results 2025: चोपडामध्ये भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना चौधरी आघाडीवर

चोपडा( जि.जळगाव):  भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार  साधना चौधरी यांना 700 ते 800 मतांची आघाडी आहेत.

21 Dec, 25 10:26 AM

Nagar Parishad Election Results 2025 : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे निवडणूक अधिकाऱ्याचे नियोजन शून्य; मतमोजणी केंद्रात प्रतिनिधींची गर्दी

 भुसावळ तालुक्यातील वरणगाव निवडणूक अधिकाऱ्याचे नियोजन शून्य, मतमोजणी केंद्रात शिरण्यासाठी प्रतिनिधींची केंद्रावर एकच गर्दी, त्यामुळे उडाला गोंधळ उडाला आहे.  मुक्ताईनगर मतमोजणी केंद्रावर टपाली मतदान उघडले. टपाली मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे.

21 Dec, 25 10:17 AM

सांगोल्यात वेळेत स्ट्रॉंग रूम न उघडल्याने उमेदवारांमधून नाराजी

सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी नऊ वाजून गेले तरी अद्याप स्ट्रॉंग रूम उघडली नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने, मारुती बनकर आणि विश्वेश झपके या तिन्ही उमेदवारांनी एकत्रित येऊन आयोगाच्या विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. वेळेत स्ट्रॉंग उघडली गेली नाही त्यामुळे उमेदवार नाराज असून मतमोजणी पूर्वीच सांगोल्यात आता उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणेतील कलगीतुरा पाहायला मिळत आहे.

21 Dec, 25 10:10 AM

मालवणात कडेकोट पोलिस बंदोबस्त

मालवणात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 5 मधील उमेदवार मतमोजणी कक्षात दाखल झाले आहेत.  ठीक 10 वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. पालिकेच्या आवारात तणावपूर्ण शांतता आहे. सर्व उमेदवार आणि प्रतिनिधींचे आगमन झाले आहे.

21 Dec, 25 10:01 AM

Nagar Palika Election Results 2025 : सांगोल्यात स्ट्राँग रूमचे दरवाजे उघडले

आज दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सांगोल्यातील स्ट्राँग रुमचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.२० ते २५ मिनिटात लता मोजणी प्रक्रिया सांगोल्यातून सुरू होणार आहे.

21 Dec, 25 09:26 AM

सोलापूर जिल्ह्यात ११ पैकी ९ नगरपालिका भाजपा जिंकेल : सचिन कल्याणशेट्टी

सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी पहिल्यांदाच सर्व नगरपालिका लढत आहे. जिल्ह्यात ११ नगरपालिकापैकी किमान ९ नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल.  जिल्ह्यात भाजपाला चांगल यश मिळेल असं वाटतंय. अक्कलकोट, मैंदर्गी आणि दुधनी या तिन्हीही नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा चांगल्या मताधिक्याने फडकेल.

21 Dec, 25 09:15 AM

Nagar Parishad Election Results 2025 : कोकणातही मोठी लढत, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

कोकणातही यावेळी नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी चुरशीने मतदान झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा आणि एक नगरपंचायत यासाठी निवडणूक मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सावंतवाडी नगरपरिषदेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात खरी स्पर्धा दिसून येईल.

21 Dec, 25 08:58 AM

Maharashtra Local Body Election Results 2025: गडचिरोलीतही मतमोजणीची तयारी पूर्ण; १० वाजता सुरुवात होणार

गडचिरोली जिल्ह्यात तीन नगर परिषदेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. कृषी महाविद्यालयात स्ट्राँग रुम तयार असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.

21 Dec, 25 08:48 AM

Maharashtra Election Results 2025: पंढरपुरातही मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार

पंढरपुरात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

21 Dec, 25 08:42 AM

Maharashtra Election Results 2025: कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिकांची मतमोजणी

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानासाठी आज मतमोजणी होणार आहे. सर्वच मतमोजणी केंद्रावरील तयारी पूर्ण झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी ५६ उमेदवारांनी, तर २६३ सदस्यपदांच्या जागांसाठी ८०९ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. जयसिंगपूरला पाच, कागल-हातकणंगलेला सात फेऱ्या होणार आहेत. निकालासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज आहे.

21 Dec, 25 07:49 AM

Maharashtra Election Results 2025: काही ठिकाणी महायुतीमध्येच लढती

कोकणात भाजप-शिंदेसेनेने एकमेकांचे नेते पळविल्याने दोन पक्षांमध्ये कमालीची कटूता आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, असे चित्र प्रकर्षाने दिसले. शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे विरुद्ध भाजप असा संघर्ष टोकाला गेला. मराठवाड्यात काही ठिकाणी भाजपचे आणि शिंदेसेनेचे नेते एकमेकांना भिडले.

21 Dec, 25 07:26 AM

एक्झिट पोल'च्या अंदाजात भाजप अग्रेसर

तीन मराठी वृत्तवाहिन्यांनी नगरपरिषद निवडणुकीचा एक्झिट पोल दिला असून, त्यात भाजप हा निर्विवादपणे क्रमांक एकचा पक्ष राहील असे म्हटले आहे. दोन वृत्तवाहिन्यांनी दुसऱ्या क्रमांकावर शिंदेसेना, तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असेल. त्यानंतर अजित पवार गटाला यश मिळेल, असा अंदाज वर्तविला आहे. अन्य एका वृत्तवाहिनीने भाजपकडे १४७ नगरपरिषदांची अध्यक्षपदे जातील, असे म्हटले असून, शिंदेसेना क्रमांक २ वर, अजित पवार गट क्रमांक ३ वर, तर काँग्रेस क्रमांक ४ वर राहील, असे म्हटले आहे. एक्झिट पोलचे हे अंदाज कितपत खरे ठरतात याची उत्सुकता असेल.

टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५Electionनिवडणूक 2025Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६PuneपुणेSolapurसोलापूर