Rohit Pawar : "सरकार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याऐवजी विरोधीपक्षांना फोडून राजकीय टोळ्या करण्यात व्यस्त"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 12:07 PM2023-07-08T12:07:21+5:302023-07-08T12:15:32+5:30

NCP Rohit Pawar Slams Maharashtra Government : जेजुरीच्या माजी नगरसेवक खूना प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

NCP Rohit Pawar Slams maharashtra government Over mehbub pansare case | Rohit Pawar : "सरकार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याऐवजी विरोधीपक्षांना फोडून राजकीय टोळ्या करण्यात व्यस्त"

Rohit Pawar : "सरकार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याऐवजी विरोधीपक्षांना फोडून राजकीय टोळ्या करण्यात व्यस्त"

googlenewsNext

पुण्यातील धालेवाडी गावाच्या हद्दीत नाझरे धरणाच्या शेजारील शेतात जमिनीच्या जुन्या वादातून जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूबभाई सय्यदलाल पानसरे वय ४८ यांच्यासह तिघांवर पाच जणांनी कुऱ्हाड व कोयत्याने वार केले. यात माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि ७ रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

जेजुरी पोलिसांनी कुऱ्हाड व कोयत्याने मारहाण करणाऱ्या वनेश प्रल्हाद परदेशी, किरण वनेश परदेशी, स्वामी वनेश परदेशी  व इतर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जेजुरीच्या माजी नगरसेवक खून प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सरकार गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी विरोधी पक्षांना फोडून राजकीय टोळ्या तयार करण्यात व्यस्त" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "गेल्या काही दिवसांतील परिस्थिती बघितली तर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचाच खून झालाय, हे स्पष्ट आहे.. पण सरकार मात्र गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी विरोधी पक्षांना फोडून राजकीय टोळ्या तयार करण्यात व्यस्त आहे... निषेध!" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

नेमकं काय घडलं? 

या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची नाझरे धरण परिसरात शेती आहे. या शेतात ट्रकटरद्वारे शेतीची मशागत सुरू होती. मेहबूब पानसरे व त्यांचे बरोबर इतर तिघेजण हे शेतातील मशागतीचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी वनेश परदेशी यांचे मेहबूब पानसरे यांच्यात जमिनीच्या जुन्या वादाच्या कारणावरून भांडण झाले. यावेळी वनेश परदेशी त्यांची दोन मुले, इतर पाच जणांनी मेहबूब पानसरे व इतर दोघांवर कुऱ्हाड व कोयत्याने वार केले. 

यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून मेह्बूब पानसरे मानेवर खोलवर वार झाल्याने त्याच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विभागीय पोलीस अधिकारी तानाजी भरडे, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास सुरू आहे.
 

Web Title: NCP Rohit Pawar Slams maharashtra government Over mehbub pansare case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.