शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची शिवसेनेवर कुरघोडी, मंत्रिपदं मिळवण्यात आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 10:03 IST

अनेक महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनं सर्वाधिक मंत्रिपदं पदरात पाडून घेण्यात यश मिळवलं आहे. मंत्रिमंडळातल्या एकूण ४३ मंत्रिपदांपैकी १६ मंत्रिपदं मिळवण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. यामध्ये उपमुख्यमंत्रीपदाचादेखील समावेश आहे. याशिवाय इतरही महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचा वरचष्मा असेल.महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडे १५ मंत्रिपदं असतील. तर राष्ट्रवादीकडे १६ आणि काँग्रेसकडे १२ मंत्रिपदांची जबाबदारी असेल. गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर काँग्रेसच्या नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्ष म्हणून सूत्रं स्वीकारली. त्यामुळे आता राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रिपदं कोणाला देणार याबद्दल मोठी उत्सुकता आहे. बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार की शरद पवार त्यांना बाजूला सारुन दुसऱ्या नेत्याला संधी देणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला १५ मंत्रिपदं मिळतील. यामध्ये १२ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदांचा समावेश असू शकतो. तर राष्ट्रवादीला १० कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ८ कॅबिनेट आणि ४ राज्यमंत्रिपदं मिळू शकतात. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असलं तरी राष्ट्रवादी अनेक महत्त्वाची मंत्रिपदं स्वत:कडे ठेवू शकते. २००४ मध्येदेखील राष्ट्रवादीनं अशाच प्रकारे अनेक महत्त्वपूर्ण खाती घेतली होती. त्यावेळी निवडणुकीत राष्ट्रवादीला ७१, तर काँग्रेसला ६९ जागांवर यश मिळालं होतं. काँग्रेसपेक्षा जास्त उमेदवार निवडून आल्यानं पक्षानं मुख्यमंत्रिपदावर दावा करावा, अशी राष्ट्रवादीतील अनेकांची इच्छा होती. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडून अनेक महत्त्वाची खाती मिळवली होती.  

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस