शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

“मला ‘या’पैकी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल”; नरहरी झिरवाळ यांनी यादीच वाचली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:54 IST

NCP AP Group Minister Narhari Zirwal News: राज्यातील पालकमंत्रिपदाची नावे लवकरच जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू असून, त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली आहे.

NCP AP Group Minister Narhari Zirwal News: महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार यांवरून अनेक आमदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. तर अद्याप काही मंत्र्यांनी आपल्या विभागाच्या मंत्रि‍पदाचा पदभारही स्वीकारलेला नाही. यातच आता पालकमंत्री पदावरूनही महायुतीत मानापमान नाट्य रंगू शकते, असे कयास बांधला जात आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल, याबाबत मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही कोणकोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल, याबाबत मन की बात बोलून दाखवली.

मला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यासाठी लोकांचा आग्रह आहे. पण मी सांगितले आहे की, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद नको. कारण पुणे, नाशिक हे नागपूरच्याही खूप पुढे विकासाच्या बाबतीत आहेत. विकासाच्या बाबतीत नाशिक तर एक नंबरला आहे. तसेच नाशिक जिल्हा आर्थिक सक्षम आहे. त्यामुळे मागणी केली आहे की, मला एक किंवा दोन छोटे-छोटे जिल्हे द्या. मात्र, आदिवासी जिल्हे द्या, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. 

मी आदिवासी आहे म्हणून...

खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते की, मला गोंदिया जिल्ह्याला घेऊन जायचे आहे. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. आता गडचिरोली जिल्ह्यासाठी भरपूर लोकांची मागणी आहे. मात्र, या दोन ते चार जिल्ह्यापैकी मागणी केलेली आहे. तसेच पालघर द्या, ठाणे द्या, नंदुरबार द्या, कोणताही जिल्हा द्या, पण आदिवासींचा जिल्हा द्या. मी आदिवासी आहे म्हणून नाही. पण मी समाजाचे काहीतरी देणे लागतो, ते देणे त्यानिमित्ताने परत करण्याची संधी मिळेल, असे झिरवाळ यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्यातील पालकमंत्रिपदाची नावे लवकरच जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू असून, त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात चुरस आहे. नाशिकमधून दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यात पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा होईल, असा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा अंदाज होता. मात्र, भुजबळ यांना धक्कादायकरीत्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांचा समावेश झाल्यानंतर कोकाटे आणि भुसे यांच्यात स्पर्धा सुरू झाली, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती