शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

'निर्लज्जपणाचा कळस!', आसाममधील पूरस्थितीवरून शिंदे आणि भाजपवर पटोलेंचा हल्लोबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 2:48 PM

Nana Patole : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडीत भाजपचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे.

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेनेला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्षातूनच आव्हान मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडीत भाजपचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. त्याला एकनाथ शिंदे यांनीही काल एका व्हिडिद्वारे अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला आहे. यावरून कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. 

यासंदर्भात नाना पटोले यांनी एक ट्विट केले आहे. "एकनाथ शिंदेंनी काल भाजपाचा अप्रत्यक्षपणे स्वतःहून उल्लेख केला. आसाममध्ये महापूर आला असतानाही त्यांची 'महाशक्ती' मात्र बंडखोर आमदारांना सांभाळण्यातच व्यस्त आहे. निर्लज्जपणाचा कळस!" असे ट्विट करत घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षांच्या आता आपापल्या नेत्यांसोबत सतत बैठका सुरू केल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आता शरद पवार यांची भेट घेतली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण आणखी तापले आहे.

काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा काल एक व्हिडीओ माध्यमांमध्ये झळकला आहे. या व्हिडिओत बंडखोर आमदार एकमताने एकनाथ शिंदे यांना गटनेता बनवत असल्याचे घोषित करत आहेत. त्यानंतर शिंदे आमदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जे सुख-दुःख आहे, ते आपले सगळ्यांचे एक आहे. काही असेल तर आपण एकजुटीने पुढे जाऊ, विजय आपलाच आहे. तुम्ही जे म्हणालात ते नॅशनल पार्टी आहे, महाशक्ती आहे, अख्ख्या पाकिस्तान काय परिस्थिती होती माहिती आहे. त्यांनी मला सांगितले आहे की, तुम्ही जो हा निर्णय घेतला आहे, हा देशातला ऐतिहासिक निर्णय आहे. तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठेही काही लागलं तर कधीही कमी पडणार नाही, याची प्रचिती आपल्याला जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा येईल, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाचा पाठिंबा असल्याचे सूतोवाच केले आहेत. 

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, बचावकार्य सुरूचमुसळधार पावसामुळे ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने आसाममध्ये पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. आतापर्यंत ३२ जिल्ह्यांतील ५५ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. पुरामुळे गेल्या २४ तासांत आणखी १२ जणांचा मृत्यू झाला.  मे महिन्याच्या मध्यापासून सुरु असलेल्या पुराच्या थैमानात आतापर्यंत १०१ जणांचे बळी गेले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएने आतापर्यंत २७६ नौकांच्या मदतीने ३,६५८ जणांची सुखरूप सुटका केली आहे. एनडीआरएफ पूरग्रस्त १२ जिल्ह्यांत ७० नौका आणि ४०० जवानांच्या मदतीने बचावकार्य राबवित आहे. आसाममधील कामरूप, बारपेटा, होजाई, नलबारी, दरांग, तामूलपूर कच्चर आदी जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफकडून मदत व बचावकार्य राबविले जात आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाAssamआसामPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेस