शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 6:49 PM

1 / 10
इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर अनेक फीचर्स मिळतात. काही धमाकेदार फीचर्सबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे. अशाच एका महत्त्वाच्या फीचरबाबत जाणून घेऊया...
2 / 10
WhatsApp सिक्रेट कोड हे एक असंच भन्नाट फीचर आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं चॅट हाईड म्हणजेच लपवू शकता. सीक्रेट कोडशिवाय कोणीही तुमचं चॅट एक्सेस करू शकणार नाही.
3 / 10
हे फीचर चॅट लॉकचं एक्सटेंडेड व्हर्जन आहे. ते वापरण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला चॅट लॉक वापरावं लागेल आणि नंतर ते लॉक केलेलं चॅट्स सीक्रेट कोडसह हाईड करावं लागेल.
4 / 10
WhatsApp ने गेल्या वर्षी हे फीचर जारी केलं होतं. चॅट लॉक करण्यासाठी, तुम्हाला ते लाँग प्रेस करावं लागेल.
5 / 10
यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करावं लागेल. येथे तुम्हाला लॉक चॅटचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करावं लागेल.
6 / 10
आता तुम्हाला Continue वर क्लिक करावं लागेल. यानंतर, फेस लॉक किंवा फिंगरप्रिंट वापरून सिस्टम ऑथेंटिकेशन पूर्ण करावं लागेल.
7 / 10
लॉक्ड चॅट बटणावर क्लिक करून तुम्ही हे चॅट्स एक्सेस करू शकता. येथे युजर्सना सीक्रेट कोड सेट करण्याचा पर्याय देखील मिळेल.
8 / 10
हा कोड तुमच्या डिव्हाइस पिनपेक्षा वेगळा असेल आणि तुम्हाला तो मॅन्युअली सेट करावा लागेल. सीक्रेट कोड सेट करण्यासाठी, तुम्हाला लॉक केलेल्या चॅट विंडोवर जावे लागेल.
9 / 10
यानंतर तुम्हाला सिक्रेट कोडवर क्लिक करावे लागेल. तुम्हाला एक कोड तयार करावा लागेल. हा कोड कोणताही इमोजी, शब्द किंवा नंबर असू शकतो.
10 / 10
कोड क्रिएट केल्यानंतर, तुम्हाला OK वर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्ही या कोडद्वारेच हाईड केलेलं चॅट शोधू शकता.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप