शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2024 13:54 IST

हाके व वाघमारे यांची प्रकृती खालावली; उपोषणाचा चौथा दिवस

वडीगोद्री ( जालना ) : ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यावं, या मागणीवर ठाम असलेल्या लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांची प्रकृती  खालावली आहे. हाके यांचा बीपी वाढला असून उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या पथकाने सकाळी  दोन्ही उपोषणकर्त्यांची तपासणी केली. यामध्ये लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढल्याची माहिती गोंदी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बिराजदार यांनी दिली. काही वैद्यकीय चाचण्या आणि एक्सपर्ट डॉक्टरांची ओपिनियन आवश्यक आहे मात्र उपचार व इतर तपासणी करण्यास हाके यांनी नकार दिला आहे असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, असे जोपर्यंत  मुख्यमंत्री व राज्यपालांकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचे हाके यांनी सांगितले. 

"कसा धक्का लागणार नाही, हे महाराष्ट्राला सांगा" मुख्यमंत्र्यांनी फोन करून ओबीसी आरक्षणाला धक्का  लागणार नाही,  असे सांगितले असले तरी तो कसा लागणार नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगणं आवश्यक असून कायद्याला धरून नसलेल्या कुणबी नोंदी सरकार देत असेल तर ओबीसींचे मूळ आरक्षण कसे टिकेल, हे देखील त्यांनी महाराष्ट्राला सांगावं, असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्याचा आलेला फोन हा विषय नौटंकी - नवनाथ वाघमारेमुख्यमंत्र्यांना ओबीसी एससी, एसटी समाजाचा द्वेष आहे का असा सवाल केला आहे. मुख्यमंत्री यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा आरोप उपोषण करते नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यावर केला आहे. मुख्यमंत्री हा सर्व जाती धर्माचा असतो, पण हे मुख्यमंत्री इतिहासातील सर्वात जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मुख्यमंत्र्याचा आलेला फोन हा विषय नौटंकी आहे, त्यांना जर काळजी असती तर त्यांनी त्यांचे प्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकारी जिल्हाधिकारी पाठवले असते, असे नवनाथ वाघमारे म्हणाले. 

टॅग्स :JalanaजालनाOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण