Join us  

पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी अखेर आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 8:59 PM

Open in App

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी अखेर आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. बाबर आजमच्या नेतृत्वाखाली हा संघ १ ते २९ जून या कालावधीत अमेरिका व कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या स्पर्धेत खेळणार आहे.  इमाद वासीम, उस्मान खान, शाहीन आफ्रिदी, इफ्तिखार अहमद व मोहम्मद आमीर यांचा या संघात समावेश केला गेला आहे. पण, अन्य संघांप्रमाणे पाकिस्तानने एकही राखीव खेळाडू अद्याप जाहीर केलेला नाही. 

१५ खेळाडूंमध्ये अब्रार अहमद, आझम खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, सईम आयुब आणि उस्मान खान हे प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार आहेत. मोहम्मद अमीर आणि इमाद वसीम हे अनुक्रमे २०१६ आणि २०२१ च्या स्पर्धेत शेवटचे खेळले होते. इतर आठ खेळाडू २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत सहभागी झाले होते. “ही एक अत्यंत प्रतिभावान आणि संतुलित बाजू आहे ज्यामध्ये तरुणाई आणि अनुभव यांचे मिश्रण आहे. हे खेळाडू काही काळापासून एकत्र खेळत आहेत आणि पुढच्या महिन्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी सज्ज आणि सेटल झालेले दिसत आहेत. हारिस रौफ पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि नेटमध्ये चांगली गोलंदाजी करतो.”असे पीसीबीने सांगितले. 

युनूस खानच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये पाकिस्तानने वर्ल्ड कप जिंकला होता. शोएब मलिक ( २००७) आणि बाबर आझम ( २०२२) यांच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरी गाठली होती. 

 पाकिस्तानचा संघ - बाबर आजम ( कर्णधार), अब्रार अहमद, आजम खान, फखर जमान, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम आयुब, शाबाद खान, शाहिन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

पाकिस्तानच्या सामन्यांचे वेळापत्रक :६ जून – अमेरिका विरुद्ध, ग्रँड प्रेरी क्रिकेट स्टेडियम, डॅलस९ जून – भारत विरुद्ध, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क११ जून - कॅनडा विरुद्ध, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क१६ जून – आयर्लंड वि. सेंट्रल ब्रोवर्ड पार्क आणि ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024पाकिस्तानबाबर आजम