Join us  

अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 5:05 PM

Sonakshi Sinha : अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार'मध्ये सोनाक्षी सिन्हाने जियाची भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल येणार असून यातून सोनाक्षीचा पत्ता कट झाला आहे.

यावर्षी अजय देवगण(Ajay Devgan)चे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. एक म्हणजे 'शैतान' (Shaitan Movie) आणि दुसरा 'मैदान' (Maidan Movie). शैतान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. तर मैदानला हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. पुढील काही महिन्यात त्याचे ३ मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. ज्यात औरों में कहां दम था, रेड २ आणि सिंघम अगेन या चित्रपटाचा समावेश आहे. याशिवाय आणखी काही चित्रपटांचे सीक्वल पाइपलाइनमध्ये आहे. यातील एक चित्रपट म्हणजे सन ऑफ सरदार २. या चित्रपटाचा पहिला भाग २०१२ साली आला होता. चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, सलमान खान आणि जुही चावला व्यतिरिक्त आणखी काही कलाकार पाहायला मिळाले होते. सध्या अजय देवगण त्याच्या दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या आठवड्यापासून तो दे दे प्यार देचं शूट करणार आहे. यादरम्यान सन ऑफ सरदार चित्रपटासंदर्भात माहिती समोर आली आहे. पहि्ल्या भागात मुख्य भूमिकेत झळकलेली सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha)चा सीक्वलमधून पत्ता कट झाल्याचे समजते आहे.

अजयच्या चित्रपटातून सोनाक्षी सिन्हाचा कट!अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार'मध्ये सोनाक्षी सिन्हाने जियाची भूमिका साकारली होती. आणि आता त्याचा सीक्वल येणार आहे. या चित्रपटाची घोषणा खूप आधी झाली आहे. दरम्यान, झूम टीव्हीच्या रिपोर्टनुसार, सोनाक्षी सिन्हाला 'सन ऑफ सरदार'च्या सिक्वेलमधून वगळण्यात आले आहे. तिच्या जागी मृणाल ठाकूर आता या चित्रपटात अजय देवगणसोबत दिसणार आहे.   

'सन ऑफ सरदार २'च्या शूटिंगला होणार सुरूवातअजय देवगण पुढील महिन्यापासून म्हणजेच जूनपासून 'सन ऑफ सरदार २'चे शूटिंग सुरू करू शकतो, अशी माहिती मिळाली आहे. सध्या हा चित्रपट पोस्ट प्रोडक्शनच्या टप्प्यात आहे. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचीही निर्मात्यांची योजना आहे. मात्र, पहिल्या भागापासून या चित्रपटाची कथा कितपत समान किंवा वेगळी आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. हा ॲक्शन कॉमेडी चित्रपट पूर्वीपेक्षा मोठ्या स्तरावर बनवला जात आहे. या चित्रपटात अजय देवगणने राजवीर सिंगची भूमिका साकारली होती.

सोनाक्षी सिन्हा वर्कफ्रंटसोनाक्षी सिन्हाचेही या वर्षी दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अलीकडेच ती अक्षय कुमारच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये दिसली होती. यानंतर संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी' या वेबसीरिजमध्ये दिसला.

टॅग्स :अजय देवगणसोनाक्षी सिन्हामृणाल ठाकूर