Join us  

राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने आखलेले सर्व डावपेच यशस्वी ठरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 9:12 PM

Open in App

RR vs SRH, Qualifier 2 Marathi Live Update : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने आखलेले सर्व डावपेच यशस्वी ठरले. ट्रेंट बोल्टने अपेक्षित सुरुवात करून देताना पहिल्याच स्पेलमध्ये ३ विकेट्स घेतल्या. राहुल त्रिपाठी आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संघर्ष केला, परंतु सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज RR च्या जाळ्यात सहज अडकले. युझवेंद्र चहलची आज शॉर्ट थर्डवर कॅचिंग प्रॅक्टीस झाली. त्याने ३ झेल घेतले. आवेश खानने सलग दोन चेंडूंवर धक्के देऊन SRH च्या अडतणीत आणखी वाढ केली. हेनरिच क्लासेनच्या अर्धशतकी खेळीमुळे SRH ने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.  RR च्या संदीप शर्मानेही २ विकेट्स घेऊन हातभार लावला. 

RRने नाणेफेक जिंकून SRHला प्रथम फलंदाजीला बोलावले आणि ट्रेंट बोल्ट पुन्हा एकदा कर्णधाराच्या विश्वासावर खरा उतरला. बोल्टने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ३ षटकांत ३२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. अभिषेक शर्मा ( १२) पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. राहुल त्रिपाठीने SRH च्या धावांची गती वाढवली होती, परंतु बोल्टने त्यालाही चालते केले. राहुलने १५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ३७ धावा चोपल्या.  त्याच षटकात एडन मार्करम ( १)  यालाही बोल्टने माघारी पाठवले. हैदराबादला पॉवर प्लेमध्ये ३ बाद ६८ धावा करता आल्या. यंदाच्या पर्वात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक १२ विकेट्स बोल्टने घेतल्या, तर आयपीएल इतिहासात पॉवर प्लेमध्ये भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ७१ विकेट्स घेतल्या आहेत आणि बोल्ट ( ६२) दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

आतापर्यंत संयमी खेळ करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने हात मोकळे करण्यास सुरुवात केली आणि SRH च्या धावांची गती कायम राखताना १० षटकांत ४ बाद ९९ धावांवर पोहोचवले. संदीप शर्माने १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चतुराईने संथ चेंडू टाकला आणि युझवेंद्र चहलने थर्ड मॅनवर सोपा झेल टिपला. ट्रॅव्हिस ३४ धावांवर बाद झाला आणि हेनरिच क्लासेनसह त्याची ४२ धावांची ( ३० चेंडू) भागीदारी तुटली. १४व्या षटकात आवेश खानच्या चेंडूवर रिव्हर्स फटका मारण्याच्या प्रयत्नात नितिश कुमार रेड्डीने ( ५) शॉर्ट थर्डवर चहलला झेल दिला. आवेशने पुढच्याच चेंडूवर अब्दुल समदचा त्रिफळा उडवला. १२० धावांवर सहावी विकेट पडल्यानंतर SRH ने शाहबाज अहमद याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर आणले.

१५ षटकांत SRH ने ६ बाद १३२ धावा केल्या. चहलने त्याच्या ४ षटकांत ३४ धावा दिल्या, परंतु त्याने महत्त्वाच्या ३ विकेट्स घेतल्या. क्लासेनने शेवटच्या षटकांत फटकेबाजी सुरू केली आणि ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ दी मॅच आर अश्विन ( ४३ धावा) महागडा ठरला. १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संदीप शर्माने अप्रतिम यॉर्कवर क्लासेनचा ( ५०) त्रिफळा उडवला. क्लासेन व अहमदने २५ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी केली. बोल्टने ४-०-४५-३ अशी स्पेल टाकली. संदीपनेही ४-०-२५-२ असा मारा केला. आवेशने २०व्या षटकात ७ धावा दिल्या आणि हैदराबाद ९ बाद १७५ धावांपर्यंत पोहोचू शकले. शाहबाज १८ धावांवर झेलबाद झाला.  आवेशने २७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२४राजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबाद