शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

नालासोपारा बॉम्ब प्रकरण : दोन दिवसानंतरही भंडारआळी भेदरलेलीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 6:23 AM

नालासोपाऱ्यातील वैभव राऊत याच्या घरावर छापा टाकून एटीएसने २२ बॉम्ब आणि आणखी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त केल्यामुळे हादरलेली भंडारआळी भेदरलेलीच आहे.

- अजय महाडिकनालासोपारा - नालासोपाऱ्यातील वैभव राऊत याच्या घरावर छापा टाकून एटीएसने २२ बॉम्ब आणि आणखी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त केल्यामुळे हादरलेली भंडारआळी भेदरलेलीच आहे.१० आॅगस्टला जेव्हा रात्री छापे सुरू झाले तेव्हा त्या परिसरात जो तो घराबाहेर आला. वैभव आणि त्याच्या कुटुंबियांना भेटण्याची कोणालाच परवानगी नव्हती. त्यांच्या घराच्या पायरीजवळही कोणाला जाऊ दिले जात नव्हते. असे असतानाही अख्खी रात्र आळी जागी राहिली.वैभव गो हत्येच्या विरोधात आहे. याबाबत जागृतीच्या उपक्रमात तो सक्रीय असतो. हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. तो समाजविघातक काम करणार नाही, असे ग्रामस्थ ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे कारवाईच्या दुसºया दिवशी अनेक जण कामावर गेले नाहीत की घरात चूल पेटली नाही. एटीएसच्या कार्यपद्धतीवरनाराज असलेल्या स्थानिकांनी वैभवचा अतिरेकी असा उल्लेख करणाºया मीडियावरही तोंडसुख घेतले.जोपर्यंत एखाद्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत तो दोषी ठरत नसतानाही काही माध्यमे भगवा अतिरेकी, आंतकवादी म्हणत असल्याबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त केला. छापासत्रानंतर त्याचे कुटुंबीयही अद्याप सावरलेले नाहीत. त्याची आई आजारी होती. छाप्याचा तिने धसका घेतला आहे.जेलभरोचा इशारा; सह्यांची मोहीमनालासोपाºयातील साधकांनी, गो रक्षक तसेच हिंदुत्त्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी वैभवच्या समर्थनासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली असून जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात दोन बंद झाल्यामुळे पुन्हा बंद न पाळता हिंदुत्त्ववाद्यांचे एकत्रीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.त्यामुळे शुक्रवारच्या मूक मोर्चावेळी डहाणू ते अलिबाग या पट्ट्यातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, या अटकेच्या निषेधार्थ वैभवच्या घरासमोर रविवारी स्थानिकांनी सभा घेतली. या कारवाईबाबत तीव्र भावना व्यक्त करतानाच या अटकेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी, १७ आॅगस्टला भंडारआळी ते सिव्हिक सेंटरयेथील पंचमुखी मारूतीच्या मंदिरापर्यंत मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. काळ््या फिती बांधून मोर्चात सहभागीहोण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.‘वैभवच्या कबुलीवर विश्वास नाही’सत्य बाहेर येईलच, पण एटीएस म्हणते म्हणून वैभवकडे समाजविघातक वस्तू सापडल्याचे आम्ही मान्य करणार नाही. जर घरात या वस्तू सापडल्या तर एटीएसने गावातील व्यक्तींना पंच म्हणून बोलावून त्या दाखवायला हव्या होत्या. मग आम्ही विश्वास ठेवला असता, असे ग्रामस्थ प्राजक्ता पाटील यांनी सांगितले. वैभवने गुन्हा कबुल केल्याचे आता एटीएसने सांगितले, तरी आम्ही विश्वास ठेवणार नाही. कारण त्याला गुन्हा कबुल करायलाही भाग पाडले जाऊ शकते, असा दावाही जमलेल्या ग्रामस्थांनी केला.‘स्फोटके, बॉम्बची सामग्री बाहेरून आणून ठेवली’एटीएसच्या कार्यपद्धतीवर वैभवची पत्नी लक्ष्मी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एटीएसचे अधिकारी घराच्या एका खोलीत होते, त्यांनी काय सामान आणले? काय नेले? याची कोणतीही माहिती आम्हाला दिली नाही आणि नंतर फोन करुन वैभवला आम्ही अटक केल्याचे सांगितले. ही कामाची कोणती पद्धत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्फोटके, बॉम्ब, त्याची सामग्री पोलिसांनी बाहेरून आणून घरात ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.त्या म्हणाल्या, गुरूवारी मध्यरात्री पावणेचार वाजता पोलीस घरी आले. तुझी चौकशी करायची आहे, असे सांगून त्याला गाडीत घालून घेऊन गेले. वैभवशी बोलण्याची संधीही दिली नाही. आम्हाला दिवसभर एका खोलीत बंद करून ठेवण्यात आले. रात्री दहा वाजता मोठ्या बंदोबस्तात पोलीस वैभवला घरात घेऊन आले. जवळपास पंचवीसपेक्षा जास्त पोलीस पहिल्या मजल्यावरील आमच्या घरात आले. मध्यरात्री दीड वाजता पोलीस गोणी व पिशव्या बाहेरून घेऊन आमच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये आले. सकाळपर्यंत ते चौकशी करत होते. सकाळी सात वाजता पोलिसांनी हे सामान घराबाहेर काढले. तेव्हा ते मुंबईतील पत्रकार सोबत घेऊन आले होते, हे आम्हाला पहिल्यांदा समजले.पाठोपाठ पोलीस वैभवला चेहरा झाकून घराबाहेर घेऊन गेले. तेथे साधा पंचनामाही केला नाही, असा दावा त्यांनी केला. आमचे घर तीन मजली आहे. तळमजल्यावर व दुसºया मजल्यावर चुलते राहतात. मग पोलिसांनी संपूर्ण घराची तपासणी का केली नाही. फक्त आमची खोली तपासण्याचा बनाव का करण्यात आला? असा प्रश्न करून वैभव निरपराध असल्याचा आणि त्याला या प्रकरणात विनाकारण गोवल्याचा दावा त्यांनी केला.शस्त्रांवरील ठशांवरून शोध सुरू मुंबई : नालासोपाºयातून अटक केलेल्या हिंदुत्त्ववादी संघटनेच्या वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकरची राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून कसून (एटीएस) चौकशी सुरू आहे. राऊतकडे सापडलेले बॉम्ब, स्फोटके, बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आणि गोंधळेकरकडे सापडलेल्या शस्त्रसाठ्यावरील बोटांच्या ठशांवरून तपास सुरु आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे विविध ठिकाणी छाप्यांचे सत्र सुरू असल्याने या प्रकरणात आणखी काही व्यक्तींना अटक होण्याची शक्यता आहे.एटीएसच्या पथकाने राऊतच्या नालासोपाºयातील घर आणि दुकानातून २२ गावठी बॉम्बसह सुमारे ५० बॉम्ब बनतील एवढी स्फोटके, बॅटºया, डिटोनेटर्स आदी साहित्य आणि महत्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली. त्यावरील ठसेही तपासले जात आहेत. त्यानुसार, तिघांची एकत्र आणि स्वतंत्र चौकशी सुरु आहे. हे ठसे या तिघांच्या किंवा त्यांच्या नियमित संपकार्तील व्यक्तींशी जुळत आहेत का, तेही तपासले जात आहे. सध्या १५ हून अधिक संशयितांकडे चौकशी सुरु आहे. त्यामुळे आणखी काही जणांना अटक होऊ शकते, अशी शक्यता एटीएसच्या अधिकाºयांनी व्यक्त केली.कोल्हापुरातून कळसकरचे दोन साथीदार ताब्यातकोल्हापूर : स्फोटके बाळगणाºया शरद कळसकरच्या दोघा साथीदारांना कोल्हापुरातून दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी ताब्यात घेतल्याचे समजते. तपासासंबंधी पूर्णत: गोपनीयता पाळली जात आहे.कळसकर याचे चार वर्षांपूर्वी कोल्हापुरात वास्तव्य होते. तो येथील एका औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात लेथ मशीनवर काम करीत होता. कळसकर कोल्हापुरात असताना कोणाच्या संपर्कात होता, त्याचे मोबाईलवर कोणाशी, किती वेळा बोलणे झाले, त्याच्या चर्चेत कोणते मुद्दे होते, पानसरेंच्या खुनाशी त्याचा काही संबंध आहे का?, याची माहिती घेण्यासाठी त्याच्या मोबाईलचे सीडीआर मागवले आहेत. 

टॅग्स :newsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र