शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

मविआला मिळणार एकच जागा, शिंदेसेनेच्या वाट्याला दोन जागा, नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी मिळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:38 IST

Vidhan Parishad Election 2026:   विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून एकच जागा विधान परिषदेत निवडून आणता येणार आहे.  २०२० मध्ये या नऊ जागांसाठी निवडणूक झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते.

मुंबई -  विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून एकच जागा विधान परिषदेत निवडून आणता येणार आहे.  २०२० मध्ये या नऊ जागांसाठी निवडणूक झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आमदार होणे अनिवार्य होते. तेव्हाच नऊ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली. 

भाजपचे ४, एकत्रित शिवसेनेचे दोन, एकत्रित राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचे एक आमदार निवडून गेले होते. यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धवसेना व राष्ट्रवादी (शरद पवार) या तीन पक्षांना मिळून एकच जागा मिळेल. शरद पवार गटाला राज्यसभा जागा आधीच मिळाली आहे.

राज्यसभेला आम्ही शरद पवारांच्या  पाठीशी राहिलो आता पवार गट आणि उद्धवसेना यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आणि दुसरीकडे ही जागा उद्धव ठाकरेंसाठीच सोडावी अशी भूमिका घेतली गेली तर मविआत पेच निर्माण होईल. 

दादाराव केचे, केणेकर आणि संदीप जोशी यांना केवळ १४ महिन्यांसाठीच मिळाली आमदारकीभाजपचे दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी या तीन आमदारांना केवळ १४ महिन्यांचाच कार्यकाळ मिळाला. आता त्यांच्यापैकी कोणाला पुन्हा संधी मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे असेल.१४ मे २०२० रोजी बिनविरोध जिंकलेल्या भाजपच्या चार आमदारांपैकी तिघे म्हणजे प्रवीण दटके (मध्य नागपूर), रमेश कराड (लातूर ग्रामीण) आणि गोपीचंद पडळकर (जत) हे नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेवर निवडून गेले. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर दादाराव केचे, संदीप जोशी आणि संजय केणेकर यांना संधी मिळाली पण आमदारकीचा १४ महिन्यांचाच कार्यकाळ त्यांना मिळाला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए राहिलेले सुमित वानखेडे यांना आर्वीमधून भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली. तेव्हा तिथले भाजप आमदार दादाराव केचे यांनी ‘आपण लढणारच’ असे जाहीर केले. तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर दिवे हे केचेंना घेऊन विशेष विमानाने अहमदाबादला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. असे म्हणतात की शाह यांनी केचेंना आदेश दिला की तुम्ही विधानसभा लढू नका, तुमची काळजी मी स्वत: करेन. नंतर १४ महिन्यांची विधान परिषद आमदारकी देत केचेंचे पुनर्वसन करण्यात आले.सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा करून संदीप जोशी यांनी गेल्या जानेवारीमध्ये खळबळ उडवून दिली होती. ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात.संजय केणेकर छत्रपती संभाजीनगरमध्ये तीनवेळा नगरसेवक तर एकवेळा उपमहापौर होते. ३८ वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते आहेत. गेल्यावेळी भाजपकडून आमदार झालेले रणजितसिंह मोहिते पाटील यांना पूर्ण सहा वर्षांचा कार्यकाळ मिळाला. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींमध्ये ते भाजपपासून दुरावले. 

शिंदेसेनेकडून कोण? शिंदेसेनेच्या वाट्याला दोन जागा जातील. गेल्यावेळी एकत्रित शिवसेनेकडून जिंकलेल्या आणि बंडामध्ये एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत आहे. शिंदे हे त्यांना संधी देतील का आणि दिली तर दुसरा उमेदवार कोण याबाबत चर्चा होत आहे. पक्षात दहा ते बारा प्रबळ दावेदार आहेत.  अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी की अन्य कोणी याबाबतही उत्सुकता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : MVA Likely to Get One Seat; Shinde Sena, Two: Who's Next?

Web Summary : MVA may secure one council seat. Shinde Sena gets two; Neelam Gorhe's return uncertain. BJP's ex-MLAs eye comeback after brief tenures. Pawar, Thackeray factions face seat-sharing challenges.
टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी