मुंडेंच्या मृत्यूची चौकशी भाजपाच्याच हातात

By Admin | Updated: June 5, 2014 22:43 IST2014-06-05T21:53:45+5:302014-06-05T22:43:26+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे अधिकार केंद्र शासनालाच आहेत.

Munde's inquiry into the death of BJP is in the hands of the BJP | मुंडेंच्या मृत्यूची चौकशी भाजपाच्याच हातात

मुंडेंच्या मृत्यूची चौकशी भाजपाच्याच हातात

मुंडेंच्या मृत्यूची चौकशी भाजपाच्याच हातात
राज्य सरकारवरील रोष अनाठायी
विश्वास पाटील/कोल्हापूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे अधिकार केंद्र शासनालाच आहेत. सध्या केंद्रात भाजपाचेच सरकार आहे. त्यामुळे त्यांनी मनात आणले तर या चौकशीचा निर्णय चुटकीसरसा होऊ शकतो, परंतु त्यासाठी अंत्यंसंस्कारासाठी आलेल्या नेत्यांच्या गाडीवर दगडफेक करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.
एखाद्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायची झाल्यास त्यासाठी हे प्रकरण कोणत्या राज्यात घडले त्या राज्याची सहमती अत्यावश्यक असते. त्यांनी अशी सहमती दिल्यासच केंद्र शासन सीबीआय चौकशीचा निर्णय घेवू शकते. मुंडे यांचा अपघाती मृत्यू दिल्ली विमानतळावर जाताना झाला. त्याचा तपासही दिल्ली पोलिस करत आहेत. दिल्लीचे गृहखाते केंद्र शासनाकडे आहे. मुंडे यांच्या अपघातामागे काही घातपात आहे असे वाटत असल्यास केंद्र सरकार या प्रकरणाची सीबीआय चौकशी करू शकते़ ही वस्तुस्थिती असताना राज्य सरकारवर व त्यातही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गाडीवर दगडफेकीचा प्रकार घडला, ते चुकीचेच होते अशी प्रतिक्रिया आता भाजपमधूनही व्यक्त होवू लागली आहे.

Web Title: Munde's inquiry into the death of BJP is in the hands of the BJP