शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मुंबापूर !

By admin | Updated: June 19, 2015 22:47 IST

चोवीस तासांपासून सातत्याने तुफान बरसणाऱ्या धारा... दर्याला आलेले उधाण... मिठी नदीने ओलांडलेली धोक्याची पातळी... अशा स्थितीने मुंबापुरीचे रूप अक्षरश:

मुंबई ठप्प : चोवीस तास मुसळधार; जून महिन्यातील सरासरीचा नवा विक्रम, आज शाळा बंद

मुंबई : चोवीस तासांपासून सातत्याने तुफान बरसणाऱ्या धारा... दर्याला आलेले उधाण... मिठी नदीने ओलांडलेली धोक्याची पातळी... अशा स्थितीने मुंबापुरीचे रूप अक्षरश: ‘मुंबापूर’ असे करून टाकले. तुंबलेले नाले, जलमय झालेले रस्ते तसेच रेल्वे ट्रॅक हे रूप नवे नसले तरी ही स्थिती करोडो मुंबईकरांच्या मनाला २६ जुलैच्या त्याच भयाचा स्पर्श करून गेली. मुख्य म्हणजे, यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही ही पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीची वल्गना अक्षरश: एका सरीत वाहून गेली. अर्थात स्वत: नखशिखांत भिजल्यानंतर पावसालाही छत्रीत घेण्याचे औदार्य दाखवणाऱ्या मुंबईकरांनी या पूरस्थितीचाही पुरेपूर आनंद लुटला.मिठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काठावरील रहिवाशांना जवळच्या शाळांत स्थलांतरित करण्यात आले. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यास पालिका प्रशासनातर्फे २६२ पंप लावण्यात आले. त्यापैकी १७० पंप कार्यान्वित करण्यात आले.दोघांचा मृत्यूवडाळ्यातील इमारत क्रमांक ११ येथे इलेक्ट्रिक शॉक लागल्याने रणजीत कुमार गुप्ता (६०) आणि कर्णिक गौरव धामीर (५) या दोघांचा मृत्यू झाला.खबरदारीचा उपाय म्हणून नौदल महापालिका प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या संपर्कात होते. मदतीसाठी कुलाबा येथे ‘सी किंग’ हेलिकॉप्टर सज्ज होते. रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडे प्रवाशांची लूटही चालविली. बेस्टने मारत्र आपली सेवा अविरतपणे दिली. दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे मुंबईतील ८० टक्के बाजार बंद होता. त्यामुळे ५०० कोटींचा तोटा10 तासांहून अधिक काळ लोकलही कोलमडली.20 जून रोजी दुपारी ३:१० वा. भरती, ४.३३ मीटर उंच लाटा उसळतील.24तासांत जोरदार पावसाची शक्यतारस्ते ठप्प... पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्ग, आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री व सायन-पनवेल मार्ग पावसामुळे ठप्प.मेट्रो दहा मिनिटे विलंबाने धावत होती.येथे साचले पाणीमुंबई सेंट्रल, हिंदमाता, गांधी मार्केट, वडाळा, हिंदू कॉलनी, माटुंगा स्थानक, अ‍ॅन्टॉप, वरळी, मुलुंड, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, मानखुर्द, वांद्रे, सांताक्रूझ, खार, अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसर, बोरीवली.