शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठ इंडियन सायन्ससाठी सज्ज

By admin | Updated: December 25, 2014 02:15 IST

शतकपूर्ती झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यंदाचे यजमानपद मुंबई विद्यापीठाला लाभले असून, विद्यापीठ प्रशासन या भव्य कार्यक्रमासाठी सज्ज झाले

मुंबई : शतकपूर्ती झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यंदाचे यजमानपद मुंबई विद्यापीठाला लाभले असून, विद्यापीठ प्रशासन या भव्य कार्यक्रमासाठी सज्ज झाले आहे. विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये ३ ते ७ जानेवारीदरम्यान पार पडणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ११ नोबेल पारितोषिक विजेत्यांसह १२ हजारांहून अधिक वैज्ञानिक सहभागी होणार आहेत.मानवी विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान (सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी फॉर ह्युमन डेव्हलपमेंट) ही या वेळच्या सायन्स काँग्रेसची थीम आहे. या विज्ञान परिषदेमध्ये ३२ सिंपोझिया आणि १४ सेशन्स असणार आहेत, ज्यामध्ये अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड फोरेस्ट्री सायन्स, अ‍ॅनिमल, व्हेटर्नरी अ‍ॅण्ड फिशरी सायन्स, एन्थ्रोपॉलॉजी अ‍ॅण्ड बिहेवियर सायन्स, केमिकल सायन्स, अर्थ सिस्टीम सायन्स, इंजिनीअरिंग सायन्स, एन्व्हायर्नमेंट सायन्स, इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, मटेरीअल सायन्स, मॅथेमेटिकल सायन्स, न्यू बॉयोलॉजी, फिजिकल सायन्स, प्लांट सायन्स असे १४ विभाग आहेत. तसेच ३२ सिंपोझिया असणार आहेत. ज्यामध्ये देश-विदेशातील जवळपास १५० हून अधिक वैज्ञानिक मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेत राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलन, विज्ञान संचारक संमेलन, भव्य विज्ञान परिषद, वूमन सायन्स काँग्रेस आदी कार्यक्रमांचेही आयोजित केले आहे. राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलनाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर वैज्ञानिक प्रदर्शन भरविले आहे.विज्ञान परिषदेत सहभागी होण्यासाठी सुमारे ९ हजार ५00 विज्ञानप्रेमींनी परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. यामध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ५४ वर्षांनी मुंबई विद्यापीठाला विज्ञान परिषदेचा बहुमान मिळाला आहे. (प्रतिनिधी)