मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: July 24, 2015 20:30 IST2015-07-24T20:30:52+5:302015-07-24T20:30:52+5:30

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक विस्कळीत झाली असून गेल्या सहा तासांपासून एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Mumbai-Pune expressway traffic disrupted | मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक विस्कळीत

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक विस्कळीत

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक विस्कळीत झाली असून गेल्या सहा तासांपासून एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एक्स्प्रेस वेवर दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे ही वाहतूक  विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐन वीकेंडला प्रशासनाने आज एक्स्प्रेस वेवर दुरूस्तीचे काम सुरू केल्याने वाहतूकीची कोंडी झाली. त्यामुळे  लहान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन लहान गाड्या खोपोली-पेण मार्गावरुन वळवण्यात आल्या, मात्र त्या मार्गावर सुद्धा लहान वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
दरम्यान,  याप्रकरणी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे  काही प्रवाशांनी एक्स्प्रेस वेवरील टोल भरण्यात विरोध केल्याचे समजते. 
 

Web Title: Mumbai-Pune expressway traffic disrupted