मुंबई पालिका घोटाळ्यांवर ब्लॅकपेपर प्रसिद्ध करणार - किरीट सोमय्यांची घोषणा

By Admin | Updated: January 27, 2017 08:38 IST2017-01-27T08:03:33+5:302017-01-27T08:38:17+5:30

शिवसेना-भाजपाची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर आता भाजपाने सेनेला घेरण्याचा डाव रचला आहे.

The Mumbai Municipal Corporation will publish a blackpaper on scams - Kirit Somaiya's announcement | मुंबई पालिका घोटाळ्यांवर ब्लॅकपेपर प्रसिद्ध करणार - किरीट सोमय्यांची घोषणा

मुंबई पालिका घोटाळ्यांवर ब्लॅकपेपर प्रसिद्ध करणार - किरीट सोमय्यांची घोषणा

>ऑनलाइन लोकमत
मुंबई , दि. 27 - गेल्या 25 वर्षांपासून भाजपासोबत असलेल्या शिवसेनेने अखेर युती तुटल्याचे जाहीर करत भाजपाशी काडीमोड घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल ही घोषणा केली आणि शिवसैनिकांनी या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. 
मात्र शिवसेनेच्या या निर्णयानंतर भाजपाने सेनेला घेरण्याची तयारी केली असून मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांची ‘काळी पत्रिका’ जाहीर करण्याची घोषणा भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.
 
(आता यापुढे जे काही असेल ते स्वबळावर- उद्धव ठाकरे)
(जे येणार नाही त्यांच्याशिवाय परिवर्तन होणारच- देवेंद्र फडणवीस)
 
महापालिकेतील दहा घोटाळ्यांचा ‘ ब्लॅक पेपर’ लवकरत बाहेर काढणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. ते विक्रोळीमधील सभेत बोलत होते. महापालिकेतील घोटाळ्यांची मालिका थांबता थांबत नसल्यानेच आपण ही पोलखोल करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. पाणी, रस्ते, नालेसफाई अशा विविध दहा घोटाळ्यांचा समावेश या ब्लॅक पेपरमध्ये असल्याचे सोमय्यांनी नमूद केले आहे. 

Web Title: The Mumbai Municipal Corporation will publish a blackpaper on scams - Kirit Somaiya's announcement