शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत भाजपाचा परप्रांतीय नेत्यांवर भर

By admin | Updated: October 12, 2014 02:46 IST

मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील परप्रांतीय मते भाजपाकडे पक्षाने आखली आहे. शिवसेनेसोबतची गेल्या 25 वर्षाची युती भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशावरून तोडली.

मुंबई : मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील परप्रांतीय मते भाजपाकडे पक्षाने आखली आहे. शिवसेनेसोबतची गेल्या 25 वर्षाची युती भाजपाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशावरून तोडली. अमित शहा यांना मुंबईवर कब्जा करायचा असल्याने भाजपाने हे कृत्य केले, असा प्रचार सुरु आहे. त्याचा मराठी माणसावर किती प्रभाव पडला आहे याचा भाजपाला अंदाज येत नसल्याने परप्रांतातून नेते आणून त्यांना प्रचारात उतरवण्याचा सपाटा लावला आहे. वसुंधराराजे सिंधिया, आनंदीबेन पटेल, सुषमा स्वराज, येड्डीयुरप्पा, मनोहर र्पीकर, सुशील मोदी असे नेते सध्या मुंबई व परिसरात प्रचार करीत आहेत. वसुंधराराजे मारवाडी, आनंदीबेन गुजराती, येड्डीयुरप्पा कानडी, सुशील मोदी बिहारी मतांकरिता प्रयत्न करीत आहेत. 
भाजपाने आपल्या गुजरातमधील सर्व आमदारांना मतदानाच्या दिवशी मुंबईत राहुन गुजराती मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे फर्मान काढले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील भाजपाचे काही बाहुबली नेते मतदानाच्या दिवशी मुंबईत येतील व शिवसेनेकडून भाजपा मतदारबहुल विभागात दहशत बसवण्याचा प्रयत्न झाला तर त्यास आडकाठी करणार असल्याचे कळते. कुठल्याही परिस्थितीत साम, दाम, दंड, भेद या मार्गाचा वापर करून मुंबईत यश मिळविण्याचे भाजपाने ठरवले आहे.  भाजपाने परप्रांतीय नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने मतदानाच्या तोंडावर मुंबईत गुजराती विरुद्ध मराठी असा भाषिक वाद निर्माण होऊ शकतो आणि शिवसैनिकांकडून आक्रमक प्रतिक्रिया रस्त्यावर उमटू शकते, अशी भीती राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. (विशेष प्रतिनिधी)