मुंबई गुन्हे शाखा युनिट ३ ने ज्वेलर्सना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीतील तीन सदस्यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी सोन्याचे दागिने देऊन त्याऐवजी पॉलिश केलेले पितळेचे बिस्किटे देऊन फसवणूक केल्याचे उघड झाले.
आरोपी सोन्याच्या मागणीनुसार खरे दागिने घेऊन, त्यांना उच्च दर्जाचे स्टँडर्ड सोने देण्याचे आश्वासन द्यायचे. मात्र, प्रत्यक्षात सोन्यासारखे दिसणारे पॉलिश केलेले पितळेचे बिस्किटे देऊन ज्वेलर्सची फसवणूक करायचे. आरोपींनी माझगावमधील ज्वेलर्सची फसवणूक केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल ट्रॅकिंग आणि पाळत ठेवून पोलिसांनी नालासोपारा आणि मीरा रोड येथे सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक केली. आरोपींकडून माझगावमधील तक्रारदाराचे ४० लाख रुपये किमतीचे ३५४.४६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे योगेश गोठणकर, राकेश लिलानी आणि मोहित शर्मा अशी आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, या टोळीने केवळ मुंबईतच नव्हे, तर जोधपूर आणि कोलकाता येथेही अशाच प्रकारची फसवणूक केल्याची कबुली दिली. टोळीतील मोहित शर्मा हा आरोपी बनावट सोने पुरवत असल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांचा पुढील तपास सुरू
या तिघांनाही पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी भायखळा पोलिस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या टोळीने आणखी कोणाकोणाची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
Web Summary : Mumbai police arrested three individuals for defrauding jewelers. The gang exchanged gold jewelry with polished brass biscuits, cheating jewelers out of lakhs. Police seized gold worth ₹40 lakhs.
Web Summary : मुंबई पुलिस ने ज्वैलर्स को धोखा देने के आरोप में तीन लोगों को गिरफ्तार किया। गिरोह ने सोने के गहनों को पॉलिश किए हुए पीतल के बिस्कुटों से बदलकर ज्वैलर्स को लाखों का चूना लगाया। पुलिस ने ₹40 लाख का सोना जब्त किया।