शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 20:50 IST

Indian Pickleball League : इथं जाणून घेऊयात पिकलबॉल लीगसंदर्भातील खास माहिती

Delhi CM Rekha Gupta Unveils Indian Pickleball League Trophy 6 Team To Participate : दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियममध्ये इंडियन पिकलबॉल लीग (IPVL) स्पर्धेच्या पहिल्या वहिल्या हंगामाची मुहूर्त मेढ रोवली गेली.  क्रीडा मंत्रालयासह इंडियन पिकलबॉल असोसिएशन (IPA) च्या मान्यतेसह आयोजित करण्यात आलेल्या पिकलबॉल लीग स्पर्धेत एकूण सहा फ्रँचायझी संघ जेतेपदासाठी लढताना दिसतील.  दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते  के.डी. जाधव इंडोअर हॉलमध्ये या स्पर्धेतील विजेत्याला दिल्या जाणाऱ्या आकर्षक ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. इथं जाणून घेऊयात पिकलबॉल लीगसंदर्भातील खास माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मुंबई अन् चेन्नई फ्रँचायझीसह पहिल्या हंगामातील सहा संघ कोणते?

पिकलबॉल क्रीडा प्रकार हा टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल-टेनिस यांचा मिश्रित प्रकाराची अनुभूती देणारा आहे. या खेळात टेनिससारखा कोर्ट, बॅडमिंटनसारखे नियम आणि टेबल टेनिसमध्ये असणारे रॅकेट अर्थात पॅडल याचा वापर केला जातो. त्यामुळे भारतातील पहिल्या वहिल्या पिकलबॉल लीगमध्ये क्रीडा रसिकांना तीन वेगवेगळ्या खेळातील कौशल्य एकाच खेळाच्या माध्यमातून पाहण्याची भन्नाट अनुभूती घेता येईल. या स्पर्धेत बंगळुरू ब्लास्टर्स, हैदराबाद रॉयल्स, चेन्नई सुपर वॉरियर्स, मुंबई स्मॅशर्स, कॅपिटल वॉरियर्स आणि लखनऊ लेपर्ड्स हे  ६ संघ सहभागी  आहेत. सोमवारी १ डिसेंबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेचा समारोप ७ डिसेंबरला होणार आहे. यातील कोणता संघ पहिली वहिली ट्रॉफी उंचावत इतिहास रचणार ते पाहण्याजोगे असेल.

पहिल्या-वहिल्या पिकलबॉल लीगची घोषणा! सहा संघ भिडणार; प्रसिद्ध अभिनेत्री बनली मालकीण

शालेय अभ्यासक्रमातही पिकलबॉल खेळाला मिळेल स्थान 

या स्पर्धेच्या ट्रॉफी  अनावरण सोहळ्यात दिल्लीच्या मुख्यमंत्री  रेखा गुप्ता म्हणाल्या की, भारतात खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडा संस्कृतीला एक नवी ओळख दिली आहे. पिकलबॉल या नव्याने लोकप्रिय होत असलेला खेळ आहे. भारतीय खेळाडू या खेळात विशेष छाप सोडतील. दिल्ली सरकार या क्रीडा प्रकाराचा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

ही नव्या युगाची नवी सुरुवात

पिकलबॉल लीग स्पर्धा हा फक्त नव्या क्रीडा प्रकाराचा एक हंगाम नसून ही नव्या युगाची सुरुवात आहे. पिकलबॉलच्या प्रवासाचा हा क्षण खास आणि अविस्मरणीय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आयोजकांनी म्हटले आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi CM unveils Pickleball League trophy; six teams to compete.

Web Summary : Delhi CM Rekha Gupta launched the Indian Pickleball League trophy. Six franchise teams, including Mumbai and Chennai, will compete. The sport blends tennis, badminton, and table tennis, promising a unique experience. Delhi aims to include pickleball in its school curriculum.
टॅग्स :TennisटेनिसTable Tennisटेबल टेनिसBadmintonBadminton