शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएमईआय’ क्रमांक बदलणा-या टोळीचे मुंबई ‘कनेक्शन’ उघड

By admin | Updated: October 13, 2015 22:56 IST

पाचही आरोपींना घेऊन एटीसी मुंबईला रवाना, पोलीस कोठडीत वाढ.

अकोला : आयएमईआय क्रमांक बदलणार्‍या टोळीचे मुंबई कनेक्शन उघड झाले असून, या आरोपींना घेऊन एटीसी मंगळवारी मुंबईला रवाना झाली. या आरोपींनी मुंबईतून चोरीचे मोबाइल खरेदी करून त्याचे आयएमईआय क्रमांक बदलून त्याची विक्री केल्याचे समोर आले आले होते. आयएमईआय क्रमांक बदलण्यार्‍या आरोपींचे मुंबईपर्यंत कनेक्शन असल्याचे 'लोकमत'ने प्रकाशित केले होते.बनावट दस्तऐवजाद्वारे सिमकार्डची खरेदी करून मोबाइल हॅण्डसेटचा आयएमईआय क्रमांक बदलणार्‍या टोळीतील आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करीत त्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बोगस सिमकार्डधारकांची पडताळणी सुरू असतानाच बोगस सिमकार्डधारक मोहम्मद आरिफ मोहम्मद युनूस याला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. अ. मुजाहिद अ. माजिद याचे शहरातील काही मोबाइल दुकानदारांशी साटेलोटे असून, या दुकानांवरूनच सदर चोरीच्या मोबाइलची विक्री करण्याचा गोरखधंदा या टोळीने सुरू केला होता. यामध्ये मोहम्मद आरिफ मोहम्मद युनूस, अ. मुजाहिद अ. माजिद, तेजस्वी मोबाइलचा संचालक प्रवीण प्रल्हाद गुप्ता, इर्शादउल्ला खान अमजदउल्ला खान व सैयद इरफान सैयद उस्मान या पाच जणांचा समावेश आहे. या टोळीने मुंबईतून चोरीचे मोबाईल खरेदी करणे व ते अकोल्यातील काही दुकानावरून विक्री करणे, हा या टोळीचा मोठा व्यवसाय असल्याचेही समोर आल्यानंतर त्यांना मुंबईला नेण्यात आले आहे. आरोपीला कोसळले रडूया पाचही आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी दुपारी ४ वाजता न्यायालयात आणण्यात आले. यावेळी न्यायालयात एका आरोपीचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. कुटुंबीयांना पाहताच या आरोपीला रडू कोसळले.खासगी मोबाईल जप्तआयएमईआय क्रमांक बदलणार्‍या टोळीतील पाचही आरोपींचे खासगी मोबाईल दहशतवाद विरोधी सेलने मंगळवारी जप्त केले. त्यांच्या खासगी मोबाईलचा डाटा काढण्याचे कामही एटीसीने सुरु केले आहे. या आरोपींना मुंबईला घेउन ज्याण्यापूर्वी त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले आहे.