शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

उच्चभ्रू सोसायटीतील क्लबवर मुलुंडमध्ये धाड

By admin | Updated: September 8, 2014 03:13 IST

मुलुंड पश्चिमेकडील हिल रेसिडेन्सीसारख्या उच्चभ्रू सोसायटीतील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर समाजसेवा शाखेने धाड टाकत हा अड्डा उधळला.

मुंबई : मुलुंड पश्चिमेकडील हिल रेसिडेन्सीसारख्या उच्चभ्रू सोसायटीतील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर समाजसेवा शाखेने धाड टाकत हा अड्डा उधळला. यात १७ जणांसोबत ६ महिलांना जुगार अ‍ॅक्टखाली गजाआड केले आहे. त्यांच्याकडून साडेतीन लाखांची रोकडही जप्त केली. मुलुंड हिल रेसिडेन्सीमधील सहाव्या मजल्यावरील बंद घरात हा प्रकार सुरू होता. शनिवारी रात्री ८च्या सुमारास समाजसेवा शाखेने हा जुगाराचा अड्डा उधळून लावत २३ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ अटक केली. यामध्ये ६ महिलांचाही समावेश आहे. या छाप्यात साडे तीन लाखांची रोकडही जप्त करण्यात आली. कलावंती जसवंत कोठारी (६५) या महिलेने ज्योतीबेन भरत शहा या महिलेस हा फ्लॅट भाड्याने दिला होता. ज्योतीबेन शहाने क्लबच्या नावाखाली येथे जुगार खेळविणे सुरू केले. आरोपी महिला मेकपमन असून ठाणे, डोंबिवली परिसरात अशा प्रकारे भाड्याच्या घरात एका दिवसासाठी क्लबच्या नावाखाली जुगार भरविते. ज्योतीबेन शहा ही मुलुंडमध्येच राहण्यास आहे. या महिलेसह एकूण २३ जणांवर जुगार अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)