शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला अटक नाही तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार नाही, पवईत तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 16:38 IST

आरोपीला जोपर्यंत पोलीस अटक करत नाही तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका आरेमध्ये लैंगिक अत्याचारानंतर मृत्यू झालेल्या तेरा वर्षीय मुलाच्या पालकांनी घेतली आहे.

मुंबई, दि. 25 - आरोपीला जोपर्यंत पोलीस अटक करत नाही तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका आरेमध्ये लैंगिक अत्याचारानंतर मृत्यू झालेल्या तेरा वर्षीय मुलाच्या पालकांनी घेतली आहे. मुलाचा मृतदेह पोलीस चौकीसमोर ठेऊन स्थानिकांनी पोलिसांना घेराव घातला आहे. यामुळे पवईत तणावाचे वातावरण आहे.
आरेमध्ये लैंगिक अत्याचार झाल्यानंतर विष प्राशन केलेल्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे.  13 वर्षीय मुलाचा मंगळवारी सकाळी साडे चार वाजता केईम हॉस्पिटलमध्ये पीडित मुलाचा मृत्यू झाला. गेले पंधरा दिवस या मुलाची केईएम हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज सुरू होती. 
आरेमधील मोरारजी नगरमध्ये आसिफ (नाव बदलले आहे) आणि सुनील (नाव बदलले आहे) ही दोन्ही पिडीत मुले राहत होती. यातील एक मुलगा दहा वर्षांचा तर दुसरा तेरा वर्षांचा आहे.  12 जुलै रोजी या मुलांनी उंदीर मारायचे विष प्राशन केले. ही बाब त्यांच्या पालकांना समजली तेव्हा त्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, यात आसिफचा मृत्यू झाला. तर,  सुनीलला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी तो चार दिवस होता. मात्र, त्याचे लिव्हर निकामी झाल्यामुळे त्याला तातडीने परळच्या केईम रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. पण मंगळवारी सकाळी उपाचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. 
माझ्यावर आणि माझ्या मित्रासोबत सुद्धा अत्याचार झाला आहे आणि याच लाजेमुळे आम्ही दोघांनीही विष प्यायलो आहे, असं या मुलाने सांगितलं होतं. हा धक्कादायक प्रकार आरे परिसरात घडला असून याप्रकरणी पवई पोलीस चौकशी करत आहेत.
नेमके काय घडले ?
सुनीलच्या वडिलांनी 'लोकमत'ला दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास त्याला अचानक उलटी झाली. तेव्हा त्यांनी मुलाची चौकशी केली. तेव्हा मी उंदीर मारायचे विष प्यायलोय असे सांगितले. त्यानंतर आम्ही त्याला सायन रुग्णालयात हलविले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला केईम रुग्णालयात हलविण्यात आले. इथे त्याचे लिव्हर पूर्णपणे निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, सुनील वेदनेने कण्हत असताना वडिलांना म्हणाला की, तुम्ही मला ओरडलात म्हणुन मी विष प्राशन केले नाही, तर माझ्यावर लैगिंक अत्याचार झालेत. आरेच्या गौतमनगरमध्ये एका खोलीत नेऊन माझ्यासह माझ्या मित्रासोबत हा प्रकार घडल्याचे सुनीलने आपल्या वडिलांना सांगितले. 
ट्युशन टिचरला आला संशय !
सुनील गेल्या काही दिवसांपासून भेदरलेल्या अवस्थेत होता. ही बाब त्याच्या ट्युशन टिचरच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावून याबाबत सांगितले. तसेच त्याचा मोठा भाऊ देखील त्याला वारंवार याबद्दल विचारत होता. मात्र त्याने भावलाही काहीच सांगितले नाही आणि अखेर विष प्यायले, असे सुनीलच्या वडिलांनी सांगितले.