शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दावणीला बांधण्याचा मोदींचा डाव!

By admin | Updated: October 8, 2014 03:52 IST

त्यांच्या भुलथापांना महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नसल्याचे चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)

अंबाजोगाई (जि़ बीड) : गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली व दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्रात भाजपाकडे नेतृत्वाचा मोठा अभाव निर्माण झाला. परिणामी शिल्लक असलेल्या शहरी संस्कृतीच्या लोकांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय न राहिल्याने त्यांच्या गावोगावी जाहीर सभा घेतल्या जात आहेत. महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला नेऊन बांधण्याचा नरेंद्र मोदी यांचा कुटील डाव आहे, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केला. चव्हाण म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी मोदींचा आटापिटा सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनता हा दुजाभाव ओळखून आहे. मुंबईतील उद्योगपतींना गुजरातमध्ये उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी बोलावले जात आहे. मुंबईत उद्योग व्यवसायाचे असणारे वर्चस्व मोडीत काढण्याचा मोदींचा डाव आहे. मंगल यानचा निर्णय काँग्रेसचा होता. मात्र, याचे श्रेय मोदी लाटतात. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेला भुलथापा देऊन मते मिळवणे, अच्छे दिन आनेवाले है, असे आश्वासन हवेत विरले. कसल्याही विकासाचा आराखडा अद्यापही जनतेपर्यंत पोहचला नाही. महाराष्ट्रावर सातत्याने अन्याय करण्याचेच काम मोदी यांनी केले आहे. महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातमध्ये पळवायचे व गुजरातचा विकास साध्य करायचा ही कूटनीति त्यांनी आखली आहे. महाराष्ट्रातील पालघरचा प्रकल्प मोदींनी द्वारकेला पळवला. ही त्यांची चालाखी आता महाराष्ट्राने ओळखली आहे. त्यांच्या भुलथापांना महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नसल्याचे चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)