मोदींच्या मंत्रिमंडळात भ्रष्ट मंत्री -सोमय्या

By Admin | Updated: May 31, 2014 05:35 IST2014-05-31T05:35:46+5:302014-05-31T05:35:46+5:30

भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भूमिका घेत भाजपा नेते खा. किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी पक्षाला घरचा अहेर दिला

In the Modi cabinet, the corrupt minister -Somayya | मोदींच्या मंत्रिमंडळात भ्रष्ट मंत्री -सोमय्या

मोदींच्या मंत्रिमंडळात भ्रष्ट मंत्री -सोमय्या

मुंबई : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भूमिका घेत भाजपा नेते खा. किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी पक्षाला घरचा अहेर दिला. भ्रष्टाचाराचा आरोप असणारे इंद्रजित राव यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच भाजपाने लोकसभा निवडणुका लढविल्या. भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे भाजपाची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यायला हवी आणि ते घेतील, असे सोमय्या यांनी सांगितले. मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री असणार्‍या इंद्रजित राव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. राव यांनी कांदिवली येथील संरक्षण मंत्रालयाची जमीन खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप केला होता. राव यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आणि निवडूनही आले. त्यांना मोदी सरकारमध्ये स्थान देण्यात आले. सोमय्या यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. याबाबत पदाची अपेक्षा नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: In the Modi cabinet, the corrupt minister -Somayya