शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोदी ‘नीति’मुळे फटका

By admin | Updated: July 18, 2015 02:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजन आयोगाचा गाशा गुंडाळून नीति आयोगाची स्थापना केल्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत घसघशीत वाढ झाल्याचा दावा केला गेला असला

- संदीप प्रधान,  मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजन आयोगाचा गाशा गुंडाळून नीति आयोगाची स्थापना केल्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत घसघशीत वाढ झाल्याचा दावा केला गेला असला, तरी प्रत्यक्षात २० योजनांमधील राज्याचा हिस्सा ५० टक्के केल्याने आणि २६ योजनांकरिता निधी देणे केंद्राने बंद केल्याने राज्याला मिळणाऱ्या निधीत ३ हजार ५६४ कोटी रुपयांची घट झाली आहे. राज्यातील सरकार बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करीत असताना मोदी नीतीचा बसलेला फटका राज्याला डोकेदुखी ठरू शकतो. सीएसएस योजनेंतर्गत केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणारा निधी २०१४-१५ या वर्षात १०,८३३.६३ कोटी रुपये इतका प्राप्त झाला. २०१५-१६ या आर्थिक वर्षात ७,२६८.९३ कोटी इतका प्राप्त होणार आहे. निधीतील ही घट ३,५६४.७० कोटी रुपये आहे. मात्र त्याचवेळी वित्त आयोगाकडून महाराष्ट्राला २,९०६१.९४ कोटी रुपये मिळणार असल्याने राज्याला ५,२८४.१६ कोटी रुपये अतिरिक्त निधी प्राप्त होणार असल्याचा दावा केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने केला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राने वित्त आयोगामार्फत देऊ केलेल्या रकमेत वाढ केली असली तरी केंद्रीय अर्थसाहाय्यावरील बहुतांश योजनांमधील राज्याचा हिस्सा जो पूर्वी केवळ २०% होता तो ५०% केल्याने राज्यावरील बोजा किती वाढेल ते स्पष्ट झालेले नाही. ३४ योजनांना केंद्र सरकार यापूर्वी देत होता तेवढा निधी देणार आहे. २० योजनांकरिता राज्याचा वाटा २० टक्क्यांवरून ५० टक्के झाल्याने यापूर्वी या योजनांवर देशपातळीवर १ लाख ३८ हजार कोटी रुपये खर्च करणारे केंद्र सरकार ७८ हजार २३० कोटी रुपये खर्च करील. २६ योजनांना निधी देणे सरकारने पूर्णपणे बंद केले आहे. त्याचबरोबर गाडगीळ-मुखर्जी सूत्रानुसार योजनांतर्गत योजना चालवण्याकरिता दिला जाणारा निधी बंद केल्याने राज्याला किती पैसे द्यावे लागतील याचा अंदाज आला नसल्याने केंद्रीय अर्थ खात्याचा महाराष्ट्राला ५,२८४. १६ कोटी रुपये अतिरिक्त प्राप्त होतील हा दावा फोल ठरु शकतो, असे राज्य सरकारच्या अर्थ खात्याला वाटते. ३४ योजनांना केंद्र सरकार यापूर्वी देत होता तेवढा निधी देणार आहे. २० योजनांकरिता राज्याचा वाटा २० टक्क्यांवरून ५० टक्के झाल्याने यापूर्वी या योजनांवर देशपातळीवर १ लाख ३८ हजार कोटी रुपये खर्च करणारे केंद्र सरकार ७८ हजार २३० कोटी रुपये खर्च करील.मिळालेल्या योजना राज्याला हिस्सा ५० % झालेल्या योजना-राष्ट्रीय कृषी विकास योजना-राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम-स्वच्छ भारत अभियान-राष्ट्रीय आरोग्य मिशन-सर्व शिक्षा अभियान-जलयुक्त शिवार योजना-राष्ट्रीय ग्रामीण माध्यान्ह भोजन योजना-इंदिरा आवास योजनाकेंद्र सरकारने निधी देणे बंद केलेल्या योजना-राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान-मागास विभाग विकास निधी-राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स प्लान-पोलीस दलाचे आधुनिकीकरण-६००० आदर्श शाळांची उभारणी-राष्ट्रीय अन्न प्रक्रिया मिशनकोणत्या योजनेकरिता केंद्र सरकार किती निधी देणार त्याबाबत स्पष्टता नाही. जोपर्यंत याबाबतचे निर्देश येत नाहीत तोपर्यंत किती रक्कम कमी झाली किंवा वाढली त्याचा हिशेब करता येणार नाही. कृषी, राष्ट्रीय आरोग्य योजना, सर्व शिक्षा अभियान अशा वेगवेगळ््या योजनांकरिता केंद्र किती निधी देणार ते स्पष्ट नाही. सध्या महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीचे प्रमाण ३२ टक्क्यांवरून ४२ टक्के झाले आहे, एवढेच स्पष्ट झाले आहे. - सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री,