शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक ‘आनंदीबाई’नं म्हणो समेट ‘बि’घडविला !

By admin | Updated: October 4, 2014 02:03 IST

पुण्याचा शनिवारवाडा परिसर. वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते ‘दुर्बीण’ अन् ‘भिंग’ घेऊन काहीतरी हुडकत निघालेले. त्यामुळं रस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’ झालेलं. तसं तर.. रोजचंच असतं, हा भाग वेगळा.)

(स्थळ : पुण्याचा शनिवारवाडा परिसर. वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते ‘दुर्बीण’ अन् ‘भिंग’ घेऊन काहीतरी हुडकत निघालेले. त्यामुळं रस्त्यावर ‘ट्रॅफिक जाम’ झालेलं. तसं तर.. रोजचंच असतं, हा भाग वेगळा.)
पुणोरी दुचाकीस्वार : (हेल्मेटमधूनच जोरात बडबडत) शीùù ट. काय कटकट आहे बुवा या कार्यकत्र्याची. मंडपात पत्ते कुटायचं सोडून रस्त्यावर का कडमडलेत, कुणास ठाऊक?
दुचाकीस्वाराची पत्नी : (तोंडाला बांधलेल्या स्कार्फमधूनच पुटपुटत) या आऊटडोअर लोकांनी आपल्या पुण्याची सिस्टिम पाùùर बिघडवलीय हो. टोटली फुलीùùशनेस  बघा.
पहिला कार्यकर्ता : (दुर्बिणीतून नजर न हटवता) प्युअर इंग्लिशमधून पुणोरी संस्कृती जपणारी ही मंडळी लईùù भारी राव. 
दुसरा कार्यकर्ता : (शनिवार वाडय़ालगतच्या पुस्तक दुकानातील एका जुनाट ग्रंथावर भिंग फिरवत) हा बघा दुर्मीळ दस्तऐवज. ‘शिवशाही’ नष्ट का झाली, याचा शोध लागेल, या जुन्या  पुस्तकातून.
तिसरा कार्यकर्ता : (कपाळावर बडवून घेत) अरे लेकाùù. त्याला ‘पिवळं पुस्तक’ म्हणतात पुण्याच्या भाषेत. कशाला हात लावतोयस त्याला? आधीच मोबाइलमधल्या इंटरनेटमुळं कमी बिघडलात की काय तुम्ही?
पहिला कार्यकर्ता : .पण आपल्याला तर ‘आनंदीबाई’ची माहिती हवीय नां. तिचा ‘शिवशाही’शी काय संबंध? तिनं तर म्हणो ‘पेशवाई’ची वाट लावलेली.
दुसरा कार्यकर्ता : (खोचकपणो) आपल्याला सध्याची महायुतीची ‘शिवशाही’ मोडीत काढणारी ‘आधुनिक आनंदीबाई’ हुडकायचीय रे.
तिसरा कार्यकर्ता : (कागदांच्या बंडलातून कोणत्यातरी ज्योतिषाचं पुस्तक हुडकून काढत) अरे हे बघùù. ‘नॉस्ट्रा का फेमस’ पुस्तकात तर लिहिलंय की, एकविसाव्या शतकातली ‘नियोजित शिवशाही’ संपवायला ‘नागपुरी पेशवाई’च कारणीभूत ठरणारेय. फक्त फरक इतकाच की, तीनशे वर्षापूर्वीची पेशवाई पुण्याच्या शनिवारवाडय़ात नांदलेली. या ‘नव्या पेशवाई’ची सूत्रं मात्र, थेट ‘सुरत’मधून हलणारी.
पहिला कार्यकर्ता : (हळहळत) खरंतर,   ‘पेशवाई’नं डाव साधल्यानंतरही दोन भावांना नवी ‘शिवशाही’ स्थापण्याची संधी पुन्हा आली होती रे; पण या दोघांमध्ये नेहमी ‘ध’चा ‘मा’ करणारी ‘आनंदीबाई’ म्हणो पुन्हा जिंकली. ‘कृष्णकुंज’चा तडफडाट पाहून ‘मिनी मातोश्री’ हळूच हसली.
 दुसरा कार्यकर्ता : समेट ‘घ’डवावा, हा पाठविलेला निरोप म्हणो समेट ‘बि’घडवावा, असाच पोहोचला.
तिसरा कार्यकर्ता : (गंभीरपणो) अशा  ‘आनंदीबाई’ तर अनेक पक्षांत ठाण मांडून बसल्यात. आपला ‘रिमोट’ तोकडा पडू नये म्हणून, त्या ‘राजा’ला कधीच मोठं होऊ देत नाहीत.
पहिला कार्यकर्ता : (गालातल्या गालात हसत) म्हणूनच आपल्या महाराष्ट्राला ‘तोड मोड के जोड’वाल्या कुबडय़ांच्या सरकारची परंपरा लाभलीय वाटतं.
                                    - सचिन जवळकोटे