शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

मनसे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिवलीसाठी इच्छुक?

By admin | Updated: June 2, 2014 05:21 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य शनिवारच्या मुंबईतील सभेत केले.

अनिकेत घमंडी, डोंबिवली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य शनिवारच्या मुंबईतील सभेत केले. आणि त्यानंतर ते नेमके कुठून उभे राहणार, या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेत मुंबई-ठाण्यातील कार्यकर्त्यांनी ते डोंबिवलीतून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली. डोंबिवलीतील पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी मात्र सावध पवित्रा घेत याबाबत ठाम भाष्य करणे टाळून ‘असू शकते’ एवढीच प्रतिक्रिया देत नकळतपणे त्यास दुजोरा दिला. त्यादृष्टीने डोंबिवलीतील दिग्गज, प्रतिष्ठित यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांची मते, त्यांच्या समस्या, तक्रारी, पक्षांतर्गत कुरबुरी जाणून घेण्यासाठी ते लवकरच दोन दिवस येथे तळ ठोकणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. तेव्हाच कल्याण-डोंबिवली महापालिकेतील त्यांच्या तब्बल २८ नगरसेवकांचे प्रगतीपुस्तकही ते तपासतील का, या दडपणामुळे नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. येथे आल्यावर त्यांच्याशीही चर्चा करून येथील मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न ते करतील. आगामी आठवडा-पंधरवड्यात ते येथे येणार असल्याच्या वृत्तालाही दुजोरा देण्यात आला. डोंबिवलीकरांनीही गेल्या महापालिका निवडणुकीत आणि कल्याण पश्चिम आणि ग्रामीणच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना कौल दिला होता. त्यामुळेच या ठिकाणी एक प्रमुख घटक पक्ष अशी त्यांची ख्याती झाली. महापालिकेत मिळालेल्या सर्वाधिक जागांमध्ये डोंबिवलीतून जास्ती नगरसेवक त्यांचे निवडून आले. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत त्यांना विरोधकाच्या बाकड्यावर बसून फारसे काहीही साध्य करता आले नसले तरीही मतदारांचे प्रेम असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्याप आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराने सपाटून मार खाल्ला असला तरीही डोंबिवलीसह ग्रामीणच्या विधानसभा मतदारसंघातून त्यांना अनुक्रमे ३१,४८४ आणि २६,५३९ मते मिळाल्याने येथे विधानसभा निवडणुकीत चुरस होऊ शकते, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. डोंबिवली विधानसभेत सुमारे साडेतीन लाख मतदार असून, लोकसभा निवडणुकीत एकूण १,४७,११७ एवढे मतदान झाले होते. त्यापैकी त्यापैकी शिवसेनेला (महायुतीला) ९०,३५९, मनसे २६,५३९, तर राष्ट्रवादी काँग्रेस १८,१७४ एवढी मते पडली असून अन्य मते ही विभिन्न पक्ष-अपक्ष उमेदवारांना पडली आहेत. या सार्‍याचा विचार करता गेल्या महापालिका अथवा विधानसभा निवडणुकीचा ट्रेंड हा वेगळा होता आणि सध्याची मतदारांची मानसिकता ही ‘नमो’ची असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातही डोंबिवली आणि कल्याण हा पूर्वीचा जनसंघाचा आणि सध्याचा भाजपाचा गड असून, तो काबीज करणे मुश्कील असल्याचे काही वर्षांच्या निवडणुकांमधून स्पष्ट होत आहे. परिवर्तन आणि तरुणांची मानसिकता याचा जरी विचार केला तरीही मनसेला येथून विधानसभा त्यांच्या पारड्यात पाडून घेणे कठीण आहे. वास्तविक पाहता एकूण मतदानापैकी अवघे ४१ टक्केच मतदान लोकसभेत झाले होते. मतदारांचा प्रचंड उत्साह असल्याने सकाळच्या वेळेत आणि संध्याकाळी ५-६ या वेळेत झालेले मतदान असून, त्यातील बहुतांशी मतदारांनी महायुती-भाजपाला कौल दिला आहे. त्यातच ज्यांना चढत्या पार्‍यामुळे येता आले नाही ते मतदार विधानसभेची संधी सोडणार नाहीत. त्यामुळे डोंबिवलीची भाजपाची सीट ही विक्रमी मतांनी विजयी होईल, असा विश्वास महायुतीला आहे. त्यामुळे मनसेला येथे विजयश्री मिळवण्यासाठी संघ स्वयंसेवकांसह पांढरपेशा समाज, सध्याच्या आमदारांना असलेला जनाधार, त्यांचा थेट जनसंपर्क या सर्व आव्हानांना तोंड देत पक्षांतर्गत असलेली फूट व गळतीवर अंकुश ठेवावा लागेल. या सर्वांबरोबर कार्यकर्त्यांची भक्कम फळी तयार करावी लागणार असल्याचे मत पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.