जुन्नर (जि. पुणे) : जुन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना मारहाणप्रकरणी आमदार शरद सोनवणे यांची शुक्रवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. सोनवणे यांनी जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष वारुळे व नगर अभियंता विवेक देशमुख यांना गुरुवारी मारहाण केली होती. याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी सोनवणे यांना अटक केली. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका केली, अशी माहिती पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिली. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}