शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

भाजपाचे नेते धुतल्या तांदळासारखे आहेत का?, मंत्री जयंत पाटील यांचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 08:26 IST

महाआघाडीच्या सत्ता स्थापनेपासूनच आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. त्यानंतरही सत्ताधारी पक्षांचा एकही आमदार फोडता आला नाही.

उरण :

महाआघाडीच्या सत्ता स्थापनेपासूनच आमदार फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. त्यानंतरही सत्ताधारी पक्षांचा एकही आमदार फोडता आला नाही. आमदार फोडण्यात सपशेल अपयशी ठरल्याने केंद्र सरकारच्या सत्तेचा वापर करून राज्यातील फक्त महाआघाडीचे मंत्री, खासदार, आमदार, नेते, नेत्यांवर ईडी, आयकर खात्याच्या धाडी, जप्तीच्या कारवाईला सुरुवात केली. महाराष्ट्रातील भाजपचे नेते धुतल्या तांदळासारखे आहेत का? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उरण येथील परिवार संवाद कार्यक्रमात विचारला. 

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची सुरुवात सोमवारी उरण तालुक्यापासून झाली. उरण येथील यूईएस शाळेच्या सभागृहात झालेल्या संवाद यात्रेस  खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंडे, अंकित साखरे, सुनील गव्हाणे आदी उपस्थित होते.

या संवाद यात्रेप्रसंगी मार्गदर्शन करताना पाटील यांनी भाजपवर टीका केली. महाआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सत्तांतर करण्यासाठी भाजपचे सर्वच प्रयत्न फोल ठरले. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्यांनी एसटी कामगारांना हाताशी धरून थेट शरद पवारांच्या घरावर हल्ला केला आहे. यामागे मोठे षडयंत्र असून, याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी खोलात जाऊन तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

पवारांनी विविध समस्यांवर नेहमीच पुढाकार घेऊन केंद्रातही मोडण्याचे नव्हे तर जोडण्याचेच काम केले आहे. रशिया-युक्रेनमधील सुरू असलेल्या युध्दाच्या अगोदरपासूनच देशात महागाईचा भडका उडाला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काय उत्तर आहे, असा सवालही पाटील यांनी विचारला. प्रत्येक दिवस नव्या संधींचा असतो. त्यामुळे काम करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यालाही सत्तेत न मागताही नक्कीच संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त करून पदाचा हव्यास करणाऱ्यांचे पाटील यांनी कान टोचले.

 ‘मी पुन्हा येईन’मतदारांचे प्रश्न आणि  समस्यांसाठी पक्षाच्या बूथ कमिट्या मजबूत बनवा, त्याचा आढावा घेण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पनवेल येथे सोमवारी राष्ट्रवादी  संवाद यात्रेच्या वेळी केले. या यात्रेच्या निमित्ताने पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सभा झाली. पनवेलमध्ये राष्ट्रवादी पक्ष उभा करायचा आहे. समविचारी पक्षांना संघटित करून पनवेल शहर जिल्हा सक्षम करायचा आहे. पक्षाच्या बूथ कमिटीने भावनिक प्रश्न न हाताळता मतदारांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न कार्यकर्त्यांनी हाताळले पाहिजेत, ते सोडविण्याचा प्रयत्न केला, तर पक्षसंघटना निश्चितच मजबूत होईल, असेही पाटील म्हणाले. 

‘निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून कारवाई’जि.प. सदस्य कुंदा ठाकूर, वैजनाथ ठाकूर यांच्या पाठपुराव्यानंतर कोप्रोली येथे ४ कोटी ८२ लाख रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे. उरण नगरपरिषदेची सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याप्रसंगी चाकणकर, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस