शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचे बियाणे व्यापार्‍यांकडे पडून !

By admin | Updated: July 11, 2014 00:41 IST

अकोला जिल्ह्यात पेरण्या लांबल्या: शेतकर्‍यांची बियाणे खरेदीकडे पाठ

अकोला: वर्‍हाडात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश स्थितीचा फटका शेतकर्‍यांसोबतच कृषिसेवा केंद्रांनाही बसला आहे. पावसाअभावी सर्व व्यवहार ठप्प पडले असून, बाजारपेठेत स्मशान शांतता पसरली आहे. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीकडे पाठ फिरविली असून, परिणामी कृषिसेवा केंद्रांचे कोट्यवधी रुपयांचे बियाणे पडून आहे. जुलै महिना सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी वर्‍हाडात पावसाने हजेरी लावली नाही. गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडला. तो सावत्रिक नसल्याने पेरण्या होणे शक्य नाही. याचा प्रभाव कृषी बाजारपेठेवर मोठय़ा प्रमाणात पडला आहे. व्यापार्‍यांनी व कृषिसेवा केंद्र संचालकांनी विक्रीसाठी कोट्यवधीचे बियाणे व खते खरेदी करून ठेवले आहे; मात्र पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांनी बियाणे व खत खरेदीकडे पाठ फिरविली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकर्‍यांनी बियाण्यांची खरेदी केली होती. त्यावेळी बाजारपेठेत वर्दळ होती. आता मात्र शेतकरी पावसाचा रागरंग पाहता हात आवरता घेताना दिसत आहे. यावर्षी जिल्हा कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामात पेरणीसाठी ७५ हजार ८४ क्विंटल सोयाबिन बियाण्यांची मागणी केली होती. त्यापैकी विविध कंपन्यांकडून ६६ हजार ७९ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला. उपलब्ध बियाण्यांपैकी ५२ हजार ५९४ क्विंटल बियाण्यांचीच शेतकर्‍यांनी खरेदी केली आहे. १३ हजार ४८५ क्विंटल बियाणे कृषिसेवा केंद्रांकडे पडून आहे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या पाच लाख बॅग्सची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ६ लाख १६ हजार ४१२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाला. आतापर्यंत केवळ ४ लाख ७३ हजार क्विंटल बियाण्यांचीच विक्री झाली असून, २ लाख १६ हजार ३३९ क्विंटल बियाणे शेतकर्‍यांकडे पडून आहेत. ** दोन हजार रुपये किलोचे बियाणे विकावे लागणार तीन हजार रुपये क्विंटलने न विकल्या गेलेले कपाशी, मुग, उडिदाचे बियाणे कंपन्या परत घेतात; मात्र सोयाबिनचे बियाणे परत घेत नाहीत. त्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होणार असून, २२५0 रुपये किलो असलेले बियाणे त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन हजार रुपये क्विंटलने सोयाबीनच्या भावात विकावे लागणार आहे. ** कृषिसेवा केंद्र मालकांना जबर फटका कृषिसेवा केंद्रांकडे सध्या १३ हजार ४८५ क्विंटल सोयाबीनचे बियाणे पडून आहे. हे बियाणे जवळपास ४0 कोटी रुपयांचे असून, शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याने व्यापार्‍यांना हे बियाणे कृषि उत्पन्न बाजार समितीत विकावे लागणार आहे. अनेक दुकानदार पाचशे ते सहाशे रुपये कमी भावाने बियाण्यांची विक्री करीत आहेत. तसेच कपाशीच्या बियाण्यांची विक्री झाली नसल्यामुळेही व्यापार्‍यांचे नुकसान झाले आहे. आता हे बियाणे मूळ किंमतीतच कंपनीला परत करावे लागणार आहेत.